वसई– महाविद्यालयीन विद्यार्थींनींना मॉडेल बनविण्याचे आमिष दाखवून त्यांचे लैगिक आणि आर्थिक शोषण करणार्या एका तरुणाला वसईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्ष कारावासाठी शिक्षा ठोठावली आहे. २०१६ मध्ये हे प्रकरण उघडकीस आल्याननंतर त्याला अटक करण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
संदीप उर्फ रिंकू यादव (२६) हा तरुण नालासोपारा येथील संतोषभुवन परिसरातील झोपडपट्टीत राहतो. २०१६ मध्ये त्याने बनवाट फेसबुक खाते बनवून सिनेसृष्टीत मॉडेल पुरविण्याचे (मॉडेल को-ऑर्डीनेटर) चे काम करत असल्याचे त्याने भासवले होते. फेसबुकवरून वसई विरार मधील अनेक महाविद्यालयीन तरुणांनी संपर्क करत होता आणि त्यांना मॉडलिंगची ऑफर द्यायचा. तरुणींचा त्याच्यावर विश्वास बसायचा. मग तो या तरुणींना ऑडीशनसाठी वसईच्या कळंब समुद्रकिनार्यावर बोलवायचा. तेथे काही फोटो काढल्यानंतर इनडोअर शूटसाठी लॉजवर न्यायचा. तेथे तरुणींचे कमी कपड्यात अर्धनग्न छायाचित्रे काढायचा. मॉडलिंगसाठी हे करणं जरूरीचे आहे असे सांगून त्यांना अशी छायायित्रे काढण्यास भाग पाडत होता. अनेकदा मुलींना शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करत होता. नंतर याच छायाचित्रांच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करत खंडणी उकळत होता. एका तरुणीने तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. शंभर पेक्षा जास्त मुलींना अशाप्रकारे त्याने फसवणूक करून लैंगिक अत्यातार आणि आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप होता.
हेही वाचा >>> वसई विरार महापालिकेचा ३ हजार ११२ कोटींचा अर्थसंकल्प सादर, करवाढ नाही, विकास कामात भरघोस वाढ
त्याच्यावर बलात्कार (कलम ३७६), गुंगीकारक औषधे देणे (कलम ३२८), खंडणी (कलम ३८५) फसवणूक (कलम ४२०) धमकी देणे (कलम ५०४, ३४) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनयमाच्या (पोक्सो) ४, ८, १२ अन्वये गुन्हाय दाखल करून अटक करण्यात आली होती. तेव्हा पासून तो तुरूंगात होता. तत्कालीन पोलीस अधीक्षिका शारदा राऊत आणि तुळींज पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी सखोल तपास करून आरोपीवरोधात भक्कम पुरावे जमा केले होते.या प्रकरणाची सुनावणी वसई सत्र न्यायालयात झाली सरकारी अभियोक्ता जयप्रकाश पाटील यांनी युक्तीवाद केला. पुरावे सिध्द झाल्याने न्यायालयाने त्याला दोषी ठरवले वसई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.व्ही, खोगल यांनी यादव याला १० वर्ष कारावासा आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
धाडसी तरुणीने असे रंगेहाथ पकडले….
विरारच्या नामांकित महाविद्यालयात शिकणार्या एका तरुणीच्या मैत्रीणिला रिंकू यादवने आपले सावज बनवले होते. तिच्यावर बलात्कार करून अश्लील छायाचित्रांच्या आधारे तिच्या करून पैसे उकळत होता. पोलीस दीदी उपक्रमाअंतर्गत पोलीस महाविद्यालयात आले होते. तेव्हा या तरुणीला पोलिसांचे नंबर मिळाले होते. त्यामुळे पीडित तरुणीच्या मैत्रीणीने यादवला पकडण्याचे ठरवले. तिने यादवला कॉल करून मॉडेल बनवायचे आहे असे सांगितले. आयते सावज आल्याने रिंकू खूष होता. ती तरुणी भेटायला कळंब समुद्रकिनाऱ्यावर गेली. त्यावेळी तिने पोलिसांना कॉल करून बोलावले आणि रिंकू रंगेहाथ सापडला. या धाडसी तरुणीचा नंतर पोलिसांनी सत्कार केला होता.