ध्रुव त्रिगुनायत

सुताराकडून तयार करून घेतलेले स्वयंपाकघर हा बहुतांश घरांमध्ये लोकप्रिय असलेला पर्याय आहे. अनेक वर्षांपासून लोक या पारपंरिकरीत्या तयार केलेल्या स्वयंपाकघरांना पसंती देत आले आहेत. यामध्ये अनेक कॅटलॉग्ज बघून तसेच वाजवी बजेटसाठी वेगवेगळय़ा सुतारांशी संपर्क साधून स्वयंपाकघराबाबतचे निर्णय घेतले जातात. परंतु यामध्ये मर्यादित प्रकार उपलब्ध आहेत हेही तितकेच खरे! याला दुसरा पर्याय म्हणजे मॉडय़ुलर किचन.

Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
mhada bolinj loksatta news
वसई : बोळींज म्हाडा घरांच्या स्वस्ताईवर आधीचे खरेदीदार नाराज, फसवणूक केल्याचा आरोप
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
semi conductor lab
चिप चरित्र: चिपपुरवठा साखळी आणि भारत
Loksatta lokrang Hindustani Classical Music Zakir Hussain Music Tabla Playing 
झाकीरभाई…

आज मॉडय़ुलर किचनमध्ये मोठी प्रगती झाल्यामुळे सुसूत्रता असलेलेले स्वयंपाकघर ही संकल्पना पारंपरिक स्वयंपाकघराची जागा जलद गतीने घेत आहे. यामध्ये स्वयंपाकघरांच्या विविध शैलींचे पर्याय असतात आणि आधीपासून डिझाइन केलेल्या फर्निचर युनिट्ससह ही स्वयंपाकघरे तयार केली जातात. ही स्वयंपाकघरे आधुनिक घरांसाठी डिझाइन करण्यात आली असल्याने ती शैलीदार जास्त उपयुक्त असतात. बदलत्या काळातनुसार सोयीसुविधांचा विचार आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ग्राहकाभिमुख स्वयंपाकघर आखले जाते. त्यामुळे मॉडय़ुलर किचन हा ग्राहकांमध्ये पसंतीचा पर्याय ठरत आहे. मॉडय़ुलर किचनची लोकप्रियता वाढत असली तरीही अशा प्रकारचे किचन खरेदी करण्याचा निर्णय घेताना ग्राहकांमध्ये काही गैरसमज दिसून येतात.

निकृष्ट दर्जाचे साहित्य :

मॉडय़ुलर किचनबाबतच्या सामान्यपणे आढळणाऱ्या गैरसमजांपैकी एक म्हणजे ही स्वयंपाकघरे निकृष्ट दर्जाची उत्पादने वापरून तयार केली जातात. तसेच मॉडय़ुलर किचन बांधण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य दीर्घकाळ टिकणारे नसते, त्यामुळे

उत्पादनाचा दर्जा कालांतराने घसरतो. मात्र, मॉडय़ुलर किचन्स निकृष्ट दर्जाची अजिबातच नसतात. टिकाऊपणाची खात्री देणाऱ्या उच्च दर्जाच्या साहित्यापासून ती तयार केली जातात. याउलट सुतारकामाद्वारे तयार केलेली स्वयंपाकघरे पूर्णपणे हाताने तयार केलेली असतात आणि त्यात अनेक दोष राहू शकतात. अनेकदा सफाईचा (फिनिशिंग) अभाव दिसून येतो.

मॉडय़ुलर किचन्स महागडी असतात :

मॉडय़ुलर किचन्स महागडी असतात अशी एक धारणा तयार झाली आहे, त्यामुळे ग्राहक त्यात पैसा गुंतवण्याबाबत साशंक असतात. यामुळे ग्राहकांचा नैसर्गिक कल हा सुतारांकडून स्वयंपाकघर तयार करून घेण्याकडे असतो. ही स्वयंपाकघरे मॉडय़ुलर किचनच्या तुलनेत बऱ्यापैकी परवडण्याजोगी समजली जातात. मात्र, सुतारांकडून तयार करून घेतली जाणारी स्वयंपाकघरं ही प्रत्येक सुतारकामाच्या मागणीनुसार बदलत असतात. याउलट मॉडय़ुलर किचनमध्ये थ्रीडी डिझाइन्सच्या माध्यमातून स्वयंपाकघरांचे विविध प्रकार दाखवले जातात आणि बजेटमध्ये तुलनेने कमी बदल करून, ग्राहकांच्या गरजा व अपेक्षांनुसार त्यांची आखणी केली जाते.

किचनच्या रचनेचे मर्यादित पर्याय :

मॉडय़ुलर किचन या संकल्पनेत रचनांचे पर्याय मर्यादित असतात हा आणखी एक गैरसमज दिसून येतो. मॉडय़ुलर किचनच्या रचना या वैविध्यपूर्ण रचनांचे थ्रीडी प्रेझेंटेशन यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांचा वापर करून तयार केल्या जातात. यामुळे अंतिम उत्पादन हे रचनेच्या प्रतिमेशी तंतोतंत जुळणारे असते.

वेळखाऊ प्रक्रिया :

मॉडय़ुलर किचन तयार करण्याची प्रक्रिया खूपच वेळखाऊ आहे आणि यात काम कधीच वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण होत नाही हाही एक गैरसमज आहे. पण तसे नाही. याउलट,  सुतारकामातून तयार होणाऱ्या स्वयंपाकघरांची प्रक्रियाच वेळखाऊ आणि दीर्घकाळ चालणारी असते. यात खूप आवाज येतो, धूळ होते आणि ग्राहकाला प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी लक्ष ठेवणे अत्यावश्यक असते. याउलट, मॉडय़ुलर किचन्सचे उत्पादन कारखान्यात होते आणि ती घरात स्थापित करण्यास तयार स्थितीत येतात. यामुळे ग्राहकासाठी मॉडय़ुलर किचन बसवण्याची प्रक्रिया विनाकटकट व सोयीस्कर होते. मॉडय़ुलर किचनच्या  प्रक्रियेसाठी साधारणपणे ४५ दिवसांचा कालावधी लागतो. याउलट सुताराकडून तयार होणारी स्वयंपाकघरे कोणत्याही निश्चित वेळापत्रकाशिवाय हाताने पूर्ण केली जातात. यामुळे ग्राहकाच्या बजेटवरही परिणाम होतो. त्याला अधिक पैसे मोजावे लागतात.

मॉडय़ुलर किचन्स टिकाऊ नसतात :

सुतारकामाद्वारे तयार करण्यात आलेल्या स्वयंपाकघरात कपाटे लाकडापासून तयार केली जातात, त्यामुळे त्यांना वाळवी किंवा अन्य कीटकांपासून धोका असतो. मात्र, मॉडय़ुलर किचन्स अन्य वैविध्यपूर्ण पर्यायांचा वापर करून तयार केली जातात. यात उच्च दर्जाचे प्लायवूड व स्टील यांचा समावेश असतो. या साहित्याचा दर्जा अधिक चांगला असतो. शिवाय उकळत्या पाण्याचा यावर काहीही परिणाम होत नाही, आद्र्रतेचे व्यवस्थापन हे साहित्य अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते. म्हणूनच मॉडय़ुलर किचन हे ग्राहकांसाठी सुतारांकडून तयार केलेल्या स्वयंपाकघराच्या तुलनेत अधिक शाश्वत व टिकाऊ ठरते.

ग्राहकांना विक्रीउत्तर सेवा न मिळणे :

ग्राहकांनी सुतारांद्वारे तयार केलेल्या स्वयंपाकघराच्या तुलनेत मॉडय़ुलर किचनचा पर्याय निवडण्यामागील सर्वात प्रमुख व महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे, वेगवान व सोयीस्कर विक्रीउत्तर सेवा आणि दिली जाणारी वॉरंटी होय. या सुविधा सुतारकामाद्वारे तयार करण्यात आलेल्या स्वयंपाकघरात कधीच मिळत नाहीत. मॉडय़ुलर किचन उत्पादक, ग्राहकांच्या सर्व मागण्या पूर्ण करणारी तसेच त्यांना खूश ठेवणारी सुसंघटित व वक्तशीर, विक्रीउत्तर सेवा पुरवतात. याउलट सुतारकामाद्वारे तयार केल्या जाणाऱ्या स्वयंपाकघरात दुरुस्तीच्या किंवा देखभालीच्या कोणत्याही आश्वासनाशिवाय काम पूर्ण केले जाते. सुतार सहसा मदतनीसांच्या छोटय़ा असंघटित टीमसह काम करतात, प्रोफेशनल किचन मेकर्स जी जलद सेवा देऊ शकतात, ती ते देऊ शकत नाहीत. इन्स्टॉलेशन व विक्रीउत्तर सेवांची जबाबदारी घेणारी व्यावसायिक व कुशल तंत्रज्ञांची टीम उपलब्ध असते.

सुताराकडून तयार केली जाणारी स्वयंपाकघरे व मॉडय़ुलर किचन्स या तुलनेत मॉडय़ुलर किचन हा ग्राहकांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कारण, यात कौशल्यपूर्ण काम केलेले असते, तसेच सुबक व व्यावसायिक पद्धतीने डिझाइन केलेल्या किचन्सचे विस्तृत वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध असतात. स्वयंपाकघराच्या जागेत बदल न करता कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने मॉडय़ुलर किचन्स तयार केली जातात, तसेच अगदी छोटय़ा घरांमध्येही प्रभावी साठवणीच्या सुविधा देऊन ही किचन्स सुलभता व संघटितपणा आणतात.

(लेखक अल्ट्राफ्रेश मॉडय़ुलर सोल्युशन्स लिमिटेडचे सीईओ आहेत)

Story img Loader