बाहेरच्या प्रदूषणाविषयी तावातावाने चर्चा करणारे आपण आपल्या घरातील हवेच्या प्रदूषणाविषयी अनभिज्ञच असतो. आपल्या घरात शुद्ध हवा खेळते आहे अशी आपली समजूत असते परंतु प्रत्यक्षात तसे नाही. घरातील प्रदूषित हवेविषयी आढावा घेणारे लेख..
बाहेर खूप प्रदूषण आहे आणि आपण घरात खूपच मोकळय़ा आणि शुद्ध वातावरणात आपण श्वास घेत आहोत, असा तुमचा समज असेल तर जरा थांबा. कारण आपल्या घरात निव्वळ शुद्ध हवा खेळतेय, असं समजण्याचं काहीएक कारण नाही. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार घरातली हवा ही बाहेरील हवेच्या तुलनेत २२०० पट प्रदूषित असते.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) काढलेल्या निष्कर्षांनुसार भारतामध्ये दरवर्षी ५,००,००० लोकांचं आरोग्य घरातील प्रदूषित हवेमुळे बिघडतं. यात स्त्रिया व मुलांचं प्रमाण जास्त आहे. घरातील प्रदूषित हवेमुळे दक्षिण-पूर्व आशियामध्ये वर्षांला जवळजवळ ६,००,००० लोक अकाली मृत्यू पावतात. भारतात याचं प्रमाण सुमारे ८० टक्के इतकं आहे. घरातील प्रदूषित हवा ही आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची प्रमुख बाब आहे. ‘द वर्ल्ड बँक’नं म्हटलं आहे की, विकसनशील देशातील घरातील प्रदूषित हवा ही चार प्रमुख जागतिक पर्यावरणीय समस्यांपकी एक आहे.
घरातील हवा प्रदूषित होण्याची कारणे म्हणजे घरातील कोंदट हवा आणि अत्याधुनिक व्हेन्टिलेशन सिस्टीम्स. याचा अर्थ असा की धूळ, बुरशी, विषाणू, सिगारेटचा धूर, विविध रसायनं आणि इतर विषारी द्रव्ये यांच्यात वाढ होत आहे. त्यांचं प्रमाण वाढतं आहे. टीव्ही, कॉम्प्युटर, सिगारेटचा धूर, स्वयंपाकाचा धूर, हवा खेळती ठेवण्याची अयोग्य पद्धती, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या द्रवपदार्थातील फíनिशग्ज ही घरातील हवा प्रदूषित करण्यामागील महत्त्वाचे घटक आहेत. शहरात होणाऱ्या मोठय़ा प्रमाणावरील बांधकामांच्या कामामुळे आपण श्वास घेत असलेली घरातील आणि बाहेरील या दोन्हीकडील हवा धुळीने युक्त असते. ज्यामुळे आपल्या फुफ्फुसांवर याचा हळूहळू परिणाम होतो.
घरातील हवेच्या प्रदूषणाचे मुख्य स्रोत-
स्प्लिट एसी, सेन्ट्रलाइज्ड एअर कंडिशिनग किंवा हीटिंग, फॅन्स किंवा डिहय़ुमिडिटीफायर्स यांसारख्या आधुनिक व्हेन्टिलेशन सिस्टीम्स धूळ आणि बुरशी साठवण्याच्या जागा बनतात. याव्यतिरिक्त उपकरणं, चित्रं, चिकटणारे पदार्थ, विद्रावक पदार्थ, पडदे, काप्रेट्स, गाद्यांमधील कापूस, स्प्रे कॅन्स, क्लोदिंग, क्लििनग केमिकल्स आणि द्रव, डिओड्रन्ट्स कॉपी मशीन इत्यादी जागा जिथे धुळीच्या कणांमुळे घरातील हवेची प्रदूषण पातळी वाढते.
घरातील प्रदूषित हवा अनारोग्याला आमंत्रण
* सतत वाढणाऱ्या घरातील हवेच्या प्रदूषणामुळे अस्थमा असणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ होत आहे.
* गरोदर स्त्रियांसाठी ही समस्या अधिकच बिकट बनत चालली आहे. त्यांना अकाली प्रसूतीच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे.
* स्टीलबर्थचा धोका या केसेसमध्ये अधिक आहे.
* हवेतील प्रदूषणामुळे पोटातील बाळाचा आयक्यू कमी होऊ शकतो. तसेच नवजात बालकाचा मृत्यू आणि त्याच्यात जन्मदोष निर्माण होऊ शकतो.
लोकांचा विश्वास असतो की एअर कंडिशनर्समुळे हवा शुद्ध होते, पण हे सत्य नाही. सामान्यत: एअर कंडिशनर्समध्ये फिल्ट्रेशनचे १ किंवा २ टप्पे असतात आणि त्यामुळे हवा पूर्णपणे शुद्ध होऊ शकत नाही. तसेच एअर कंडिशनर्स तीच हवा प्रवाहित करतात, ज्यामध्ये सोबतच्या सहकाऱ्याला ताप आला आहे तर त्याच्या बाजूला बसणाऱ्यालाही लगेच होतो. एसी फिल्टर्सदेखील रोगविषाणू वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात, कारण यामुळे प्रदूषकं घरातंच राहण्यास साहाय्यभूत ठरतात. एका संशोधनात असं निरीक्षण नोंदवलं गेलं आहे की, एसीच्या सततच्या वापरामुळे श्वसनामध्ये अडथळा निर्माण होतो आणि यामुळे डोकेदुखी, घसा खवखवणं आणि सर्दी यांसारखे त्रास सतत उद्भवतात. एसीतून निघणाऱ्या कोरडय़ा आणि थंड हवेमुळे तुमची त्वचा शुष्क होते.
घरातील हवेच्या प्रदूषणामुळे होणारे तात्पुरते व दीर्घकालीन परिणाम
तात्पुरते परिणाम- डोळे, नाक व घशाचा त्रास, डोकेदुखी, अस्थमा, श्वसनाशी निगडीत समस्या, अॅलर्जीयुक्त मळमळ इ. परतु कधीकधी या छोटय़ा त्रासांतूनच तीव्र स्वरूपाचे आजार उद्भवू शकतात.
दीर्घकालीन परिणाम : घरातील हवेच्या प्रदूषणामुळे यकृत, किडनी आणि मध्यवर्ती मज्जासंस्था निकामी होऊ शकते. अस्थमा, तीव्र स्वरूपाचे फुफ्फुसाचे आजार, वात, हृदयरोग, श्वसनाशी निगडीत समस्या इत्यादी आजार होऊ शकतात.
घरातील प्रदूषित हवेमुळे तणावाच्या पातळीमध्ये वाढ होते; ज्यामुळे तुम्हाला थकवा, अस्वस्थ वाटू शकते.
घरातील प्रदूषित हवेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाची निवड करणं अत्यावश्यक आहे. घरातील प्रदूषित हवेपासून आपलं संरक्षण करण्यामध्ये एअर प्युरिफायर्स महत्त्वाची भूमिका बजावतात. आधुनिक एअर प्युरिफिकेशन सिस्टीम्समधील अद्ययावत फिल्ट्रेशन तंत्रज्ञान मानवी डोळ्यांना दिसणारे व न दिसणारे धूलिकण आणि प्रदूषकं फिल्टर करण्याच्या घरगुती वापरासाठी डिझाइन केले आहेत. ७ टप्प्यांच्या मल्टिपल प्युरिफिकेशन प्रक्रियेमध्ये गॅजेट्समधील ‘आयन बॅलन्स’ तंत्रज्ञानासह विषाणू, रोगजंतू, परागकण, धूलिकण आणि व्होलाटाइल ऑर्गनिक केमिकल्स आणि घरातील धुराचे कण इत्यादींसारख्या हवेतून पसरणाऱ्या हानिकारक जैविक अशुद्धतांचा नाश होतो.
घरातील प्रदूषित हवा ही सायलंट किलरसारखं काम करते. जर वेळेवर योग्य काळजी घेतली नाही तर आजारांना आमंत्रण मिळू शकते. घरातील प्रदूषित हवा घालविण्यासाठी योग्य तंत्रज्ञान गरजेचं आहे. आजूबाजूची हवा शुद्ध करण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे एअर प्युरिफायर्स. खरेदी केलेला योग्य एअर प्युरिफायर अस्थमा व अॅलर्जीचा त्रास असणाऱ्यांना हवेतल्या प्रदूषकांपासून मुक्त ठेवतो आणि आपले आरोग्य उत्तम ठेवतो.
प्रमुख शास्त्रज्ञ, युरेका फोर्ब्स लिमिटेड
घरातलं हवेचं प्रदूषण
बाहेरच्या प्रदूषणाविषयी तावातावाने चर्चा करणारे आपण आपल्या घरातील हवेच्या प्रदूषणाविषयी अनभिज्ञच असतो. आपल्या घरात शुद्ध हवा खेळते आहे अशी आपली समजूत असते परंतु प्रत्यक्षात तसे नाही. घरातील प्रदूषित हवेविषयी आढावा घेणारे लेख..बाहेर खूप प्रदूषण आहे आणि आपण घरात खूपच मोकळय़ा …
आणखी वाचा
First published on: 03-05-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air pollution of house