साडेतीन शुभ मुहूर्तापकी एक शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया! गृहप्रवेश आणि सुवर्णखरेदी यासाठी अतिशय उत्तम दिवस! अनेकजण या दिवशी नव्या घरात राहायला जातात. आपलंही जवळचं कुणी येत्या अक्षय्य तृतीयेला गृहप्रवेश करणार असेल तर पिवळ्याधम्मक सुवर्णाने सजलेली एखादी छानशी भेटवस्तू देऊन त्यांचा हा अक्षय्य आनंद आपल्याला नक्कीच द्विगुणित करता येईल.  
साडेतीन शुभमुहूर्तामधला अर्धा शुभमुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया, म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीया! गृहप्रवेश, वास्तुशांती, सोने खरेदी यासाठी हा दिवस इतर मुहूर्ताप्रमाणेच अतिशय शुभ मानला जातो. नवी सुरुवात करण्याचा हा दिवस, म्हणूनच अनेक जण यादिवशी नव्या वास्तूची चावी हातात घेऊन गृहप्रवेश करतात. आपल्या आप्त-स्वकीयांपकी किंवा जवळच्या मित्रमत्रिणींपकी कुणी येत्या अक्षय्य तृतीयेला नव्या घरात राहायला जाणार असेल तर त्यांचा हा अक्षय आनंद त्यांना ‘सुवर्ण’ भेटवस्तू देऊन द्विगुणित करता येईल. छे, छे, असं गोंधळून जाण्याची गरज नाही. सोन्याचे भाव किंचित उतरले असले तरी ते अजूनही आपल्या आवाक्यात आलेले नाही. पण अस्सल सोन्याचा मुलामा (१८ कॅरेट आणि २४ कॅरेट) दिलेल्या किती तरी सुंदर वस्तू बाजारात आज सहज उपलब्ध आहेत. ही ‘सुवर्ण’ भेट नक्कीच खास ठरेल.
मुख्य बाजारपेठा, उंची मॉल्स याबरोबरच आपल्या घराजवळच्या मार्केटमध्येही भेटवस्तूंच्या दुकानांची रेलचेल आहे. अशा दुकानांमधून सोन्याचा मुलामा दिलेल्या किती तरी सुरेख भेटवस्तू आपलं लक्ष वेधून घेतात. १८ कॅरेट किंवा २४ कॅरेट गोल्ड प्लेटेड अर्थात सोन्याचा मुलामा दिलेल्या या भेटवस्तू इतर भेटवस्तूंच्या मानाने नक्कीच हटके आणि वजनदार दिसतात आणि मुख्य म्हणजे या वस्तू आपल्या खिशाला आरामात परवडणाऱ्या आहेत. साधारणत: अशा वस्तूंच्या किमती या हजार-बाराशे रुपयांपासून ते तीन ते पाच हजारांच्या पुढे आहेत. या वस्तूंमध्ये निवडीला भरपूर चॉइस पाहायला मिळतो. आपल्या आवडीनुसार व बजेटनुसार आपल्याला भेटवस्तूची निवड सहज करता येते. सोन्याचा मुलामा दिलेल्या या भेटवस्तूंच्या लेबलवर ते किती कॅरेट सोन्याचा मुलामा असलेले आहे ते लिहिलेले असते. शिवाय ते दोन ते तीन वर्षे अगदी सहज पिवळे धम्मक राहते. एक मात्र आहे की याची लेखी पावती (सोन्यासंदर्भातली) मिळत नाही. म्हणून अशा वस्तू या खात्रीच्या आणि चांगल्या भेटवस्तूच्या दुकानांमधूनच घ्याव्यात.
यातील वैविध्यता पाहून तर चक्रावून जायला होते. हत्ती, घोडा, उंट, राजहंस, डॉल्फिन, भरारी घेणारा गरुड, अशा पशुपक्ष्यांबरोबरच शिडाचे जहाज, गुलाबाचे फुल, लोंबते घडय़ाळ,
फुलांची परडी, बग्गी असे किती तरी प्रकार यात आहेत. सुवर्णाची पिवळी
धम्मक लकाकी या वस्तूंना दिल्यामुळे त्या अधिकच उठावदार व मोहक
दिसतात. साधारणत: पाचेक वर्षांपूर्वी सोन्याचा मुलामा दिलेल्या वस्तूंमध्ये
पेन सेट, घडय़ाळे, मनगडी घडय़ाळाचा पट्टा, चष्म्याची फ्रेम, िपपळाच्या पानावरचे गणपती, कृष्ण असे काही मोजकेच प्रकार बघायला मिळायचे. पण आज
मात्र यात खूप पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळेच निवडीला भरपूर
स्वातंत्र्य असून ते परवडणारेसुद्धा आहे. शिवाय आपण ज्या जिवलगांना अशा
वस्तू देतो त्यांच्यासाठीसुद्धा ते एक युनिक गिफ्ट ठरेल. असे एखादे
गिफ्ट त्यांच्या वॉल युनिटमध्ये त्यांना नक्कीच ठेवता येईल, जे खात्रीने लक्षवेधी ठरेल!      

Story img Loader