मनोज अणावकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपल्या रोजच्या प्रचंड धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या आयुष्यात जर मनावरचा ताण हलका करायचा असेल, तर अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याइतकीच मनोरंजन ही प्राथमिक गरज झाली आहे. केवळ मनावरचा ताण हलका करायचंच काम मनोरंजन क्षेत्र करत नाही, तर आजच्या काळात जरी डिजिटल साधनांनी जग जवळ आलं असलं, तरी पती-पत्नीला एकमेकांना आणि मुलांना द्यायला वेळ नसल्यामुळे नाती काहीशी दुरावत चालली आहेत. अशा वेळी सगळं कुटुंब वीकएंडला एखादा चित्रपट पाहून किंवा संध्याकाळी एखादी मालिका सोबत बघून एकमेकांच्या सहवासाची उणीव याद्वारे भरून काढताना दिसतात. त्या दृष्टीने चित्रपट मालिकांचं हे क्षेत्र माणसं सांधण्याचं महत्त्वाचं काम समाजात करताना दिसतं. म्हणूनच देशाच्या विकासाच्या दृष्टीनं विचार केला तर, केवळ लेखक, अभिनेते, दिग्दर्शक, गायक, संगीतकार, नेपथ्यकार, अशा कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या कलाकारांनाच नाही, तर इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन्स इंजिनीअर, व्हिडीओ एडिटर, ग्राफिक डिझाइनर अशा तंत्रज्ञांसोबतच लाइटमन, स्पॉटबॉय आणि अनेक कलाकारांचे साहाय्यक म्हणून काम करणारे अशा कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कामगारांनाही मनोरंजनाचं हे क्षेत्र रोजगार पुरवतं. अशा या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चित्रपट दिग्दर्शकाचं ऑफिस कसं असतं, याची उत्सुकता अनेकांना असते. दुनियादारी, प्यार वाली लव्ह स्टोरी, तू ही रे, आणि गुरू यांसारखे गाजलेले चित्रपट आणि दिल दोस्ती दुनियादारी तसंच दुहेरी यांसारख्या लोकप्रिय टी.व्ही. मालिकांचे दिग्दर्शक संजय जाधव यांनी दिग्दर्शकाच्या ऑफिसची रचना कशी असते, त्यावर प्रकाश टाकला..
एका दिग्दर्शकाचं ऑफिस म्हटलं की, तिथल्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि त्याला अनुसरून ऑफिसची रचना कशी केली?
हे एक क्रिएटिव्ह ऑफिस आहे. त्यामुळे एका अर्थाने ही क्रिएटिव्ह आर्टस्टिची स्पेस आहे. पण आमच्या कामाचं स्वरूप हे एकटय़ादुकटय़ाने स्वतंत्रपणे करण्यासारखं नाही. त्यामुळे बऱ्याचदा एकत्रितपणे चर्चा, गप्पा, प्रेझेंटेशन्स याची गरज असते. म्हणूनच सर्वसाधारण ऑफिसमध्ये असतात, तशी क्युबिकल्स या ऑफिसमध्ये आम्ही केली नाहीत. पण असं असलं तरी लेखकांना मात्र लिहीत असताना एकाग्रतेची गरज असते. त्याकरता या ऑफिसमध्ये दोन केबिन्स केवळ लेखकांसाठी राखून ठेवल्या आहेत. ऑफिसमध्ये आत शिरल्यावर कोपऱ्यातल्या दोन केबिन्सनंतर लगेचच लेखकांच्या या केबिन्स ठेवल्या आहेत. (छायाचित्र १) यात पूर्णपणे शांतता मिळेल याची दक्षता घेतली आहे. बाकी क्रिएटिव्ह टीम, मार्केटिंग टीम आणि पब्लिक रिलेशन्सची टीम अशा इतर ज्या टीम्स आहेत, त्यांच्यासाठी ऑफिसच्या मध्यभागी त्यांची टेबलं ठेवली आहेत. (छायाचित्र १) पण या टेबलांना भिंती नाहीत. कारण एकमेकांचं काम हे एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे या सगळ्यांना आपापसात बोलणं, चर्चा करणं गरजेचं असतं. त्यामुळे त्यांच्या संभाषणातल्या भिंती काढून टाकून त्यात मोकळेपणा आणला आहे. हा मोकळेपणा आणि क्रिएटिव्हिटी जपण्यासाठी आम्ही आणखी एका गोष्टीचा वापर करतो आणि ती म्हणजे आमच्या ऑफिसमधल्या केबिन्सच्या काचेच्या भिंती! या भिंतींवर वेगवेगळ्या टीम्समध्ये काम करणारी ही मुलं मार्करने लिहितात. यात कधी एकमेकांसाठीचे निरोप असतात, तर कधी त्यांच्या कामाच्या संदर्भातल्या नोट्स असतात, तर कधी त्यांची एखाद्या गोष्टीबाबतची शेडय़ुल्स असतात. त्या त्या टीमने त्यांच्या त्यांच्या भिंती ठरवून घेतल्या आहेत. पण त्यात पुन्हा कसलीही चाकोरीबद्धता नाही. ऑफिसमध्ये कोणीही कुठेही बसू शकतो. कॉन्फरन्स रूम मोकळी असेल, तर आपला लॅपटॉप घेऊन मुलं तिथेही कामाला बसतात.
या कॉन्फरन्सरूमबद्दल काय सांगाल?
आताच म्हटल्याप्रमाणे, ही जरी कॉन्फरन्स रूम असली, तरी त्याचा उपयोग हा इतर वेळी काम करण्यासाठीही केला जातो. पण मुख्यत: टीम मीटिंग्ज्साठी आम्ही इथे एकत्र जमतो. तसंच एखाद्याने केलेलं क्रिएटिव्ह काम त्याला इतरांना समजावून सांगायचं असेल, तर त्यासाठी प्रेझेंटेशनची गरज असते. म्हणून हा डिस्प्ले स्क्रीन या कॉन्फरन्स रूममध्ये बसवला आहे. या डिस्प्ले मॉनिटरच्या दोन्ही बाजूंना व्हिडीओ सीडीज्ची लायब्ररी केली होती.(छायाचित्र २) त्यामुळे पूर्वीच्या सीडीज् इथे ठेवल्या आहेत. पण आता बऱ्याचदा या सीडीज्ची गरज पडत नाही. कारण आता यूटय़ूबवर व्हिडीओसंदर्भ उपलब्ध असतात. याशिवाय या कॉन्फरन्स रूममध्ये आम्ही ऑडिओ सिस्टीम बसवली आहे आणि खोलीची लांबी कॅमेऱ्याने शूट करण्यासाठी तशी पुरेशी असल्यामुळे याच खोलीत आम्ही ऑडिशन्सही घेतो.
इथल्या केबिन्स विषयी सांगाल का?
कॉन्फरन्स रूमशेजारी असलेली केबिन माझी आहे. (छायाचित्र ३) माझ्या केबिनमध्ये टीव्ही क्रीन बसवला आहे. त्याचा डिस्प्ले मॉनिटर म्हणूनही उपयोग करता येऊ शकतो. माझा कॉम्प्युटर या डिस्प्ले मॉनिटरला जोडलेला आहे. त्यामुळे इथेही आम्ही कधी मीटिंग्ज् घेतल्या तर प्रेझेंटेशन्स करता येतात. शिवाय मध्यवर्ती म्युझिक सिस्टीमही या केबिनमध्ये बसवली आहे. त्यामुळे इथे गाणी किंवा म्युझिक लावलं की, ते सगळ्या ऑफिसमध्ये ऐकू येतं. मात्र, काम करत असताना जर शांतता हवी असेल तर इतर केबिन्समध्ये ते म्युझिक बंद करायचीही सोय आहे. माझी केबिन ही थोडीशी आत आणि शेवटी असली, तरी माझे पार्टनर दीपक राणे हे मार्केटिंग आणि पब्लिक रिलेशन्स सांभाळत असून त्यांची केबिन मात्र, मुख्य दरवाजातून आत आल्यावर लगेचच उजव्या बाजूला आहे. आमच्या मुख्य कंपनीचं नाव ‘ड्रिमिंग २४ बाय ७’असं असून राणे सांभाळत असलेल्या पीआर कंपनीचं नाव ‘ड्रिमर्स पी आर’ असं आहे. अभिनेते आणि सेलिबेट्रींबरोबरच्या मीटिंग्ज् या त्यांच्या मार्केटिंग-पीआरच्या केबिनमध्ये होतात. ऑफिसमध्ये इतर ठिकाणी ब्राऊन-ब्लॅक-व्हाइट अशी कलरस्कीम वापरली असली, तरी राणेंची केबिन ही मार्केटिंग आणि पीआरची केबिन असल्यामुळे तिथे कंपनीच्या लोगोत असलेल्या पिवळ्या रंगाचा वापर केला आहे. (छायाचित्र ४) तसंच मुख्य दरवाजातून आत आल्यावर डाव्या बाजूला एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ुसरची केबिन आहे. (छायाचित्र १) कॉन्फरन्स रूम समोरच्या जागेत या तीन बंदिस्त खोल्यांमध्ये एडिटसूट्स आहेत. (छायाचित्र ५) यामध्ये व्हिडीओ एडिटिंगची कामं केली जातात. पहिला एडिटसूट हा टीव्ही मालिकांच्या दृश्यसंकलनासाठी असून इंटरनेटवरच्या दृश्यसंकलनासाठी मधला एडिटसूट वापरला जातो. माझ्या केबिन समोर असलेला एडिटसूट हा चित्रपटांच्या दृश्यसंकलनासाठी उपयोगात येत असल्यामुळे तो थोडा आकाराने मोठा आहे. ऑफिसच्या प्रवेशद्वारासमोर आतल्या बाजूला माझ्या केबिनशेजारी काटकोनात असलेली केबिन ही अकाउंटण्टची आहे. ऑफिसच्या या आतल्या प्रवेशद्वाराबाहेर मुख्य प्रवेशद्वार असून या दोन प्रवेशद्वारांमध्ये रिसेप्शन एरिया आहे. इथेही पिवळ्या रंगाचा वापर केला आहे. (छायाचित्र ६) ऑफिसमध्ये आत शिरल्यावर डाव्या बाजूला एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ुसरच्या आणि लेखकाच्या केबिनमध्ये असलेल्या जागेत श्रीगणेशाची मूर्ती आहे.
तुम्ही सगळ्या जगाचं मनोरंजन करता, पण तुमच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या व्यापातून मोकळं होऊन थोडं
मनोरंजन आवश्यक असेल, तर ते त्यांना कसं शक्य होतं?
अधूनमधून माझ्या केबिनमधून लावलेलं म्युझिक ऐकायची तर सोय आहेच, पण त्याशिवाय आम्ही ऑफिसमध्ये मिनी पूल, बुद्धिबळ, आइसहॉकी, टेबलटेनिस यांसारखे खेळ ठेवतो. त्यामुळे या काम करताना कंटाळा आला तर हे खेळ खेळायची सोय आहे. शिवाय हेच खेळ नेहमी उपलब्ध असतात असं नाही, तर आम्ही ते बदलत असतो. त्यामुळे त्यातही एकसुरीपणा येत नाही. शिवाय ऑफिसमध्ये असलेल्या पँट्रीच्या मागच्या बाजूला असलेल्या खुल्या बाल्कनीत डायिनग व्यवस्था आहे, तसंच स्मोकिंग झोनही आहे.
एखाद्या फुलाच्या मिटलेल्या पाकळ्यांमध्ये जसा परागकणांच्या गाभ्यात मध असतो, तसा तंत्रज्ञानाच्या पाकळ्यांमध्ये कलात्मक सर्जनशीलतेचा असलेला हा मध तांत्रिक भाग सांभाळताना या तंत्रज्ञानाच्या पाकळ्या अलगद उलगडून दिग्दर्शक समाजापर्यंत पोहोचवत असतो. त्यातूनच मनोरंजनाबरोबरच समाजाला कोणता ना कोणता संदेश देऊन समाजाचं प्रबोधनही केलं जात असतं. या ऑफिसच्या एकूणच रचनेत हेच साम्य आढळून येतं. तांत्रिक भाग असलेली व्हिडीओ एडिटिंग करणारी एडिटसूट्स, ऑडिशन्स, कॉम्प्युटरचा वापर करून केलेली प्रेझेंटेशन्स यासाठी असलेली कॉन्फरन्स रूम, अकाउंट्स, मार्केटिंग, प्रॉडक्शन आणि पीआर यांसारखे फुलाच्या पाकळ्यांसारखे बाहेरून सगळा डोलारा पेलून धरणारे भाग ऑफिसच्या चारही बाजूंना असून या सगळ्याचा जो कलात्मक गाभा असलेला क्रिएटिव्ह सेक्शन आहे, तो आतल्या गाभ्यात म्हणजे मध्यभागी वसवलेला आहे.
त्यातही तिथल्या टेबलांची मांडणी जर बघितली तर एकासमोर एक किंवा चौकोनी पद्धतीने किंवा एका विशिष्ट आकारात नसून, ती मुक्तपणे साधारण एकानंतर एक अशी काहीशी नागमोडी पद्धतीने ठेवलेली दिसतात. त्यातही कलात्मकता दिसते. तसंच टेबलांपाशी असलेले पाइपसारखे दिसणारे खांबही मधेच आलेले जाणवू नयेत यासाठी त्यावर फुलांच्या माळा सोडल्या आहेत. एअर कंडिशनर अर्थात, वातानुकूलित यंत्राचे थंड हवा वाहून नेणारे जे पत्र्याचे चौकोनी डक्ट्स आहेत, त्यावरही दिग्दर्शकाने दिग्दíशत केलेल्या चित्रपट आणि मालिकांचे जाहिरात फलक लपेटून त्यातून ऑफिसमध्ये येणाऱ्या पाहुण्यांसमोर जाहिरातही केली जाते (छायाचित्र १) आणि त्याच वेळी या डक्ट्सचा नको असलेला अप्रदर्शनीय देखावाही टाळला जातो. अशा प्रकारे अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून कलात्मकता जपलेली दिसते आणि त्यातूनच हे ऑफिस म्हणजे कलेचं माहेरघर आहे, याची साक्षही इथे भेट देणाऱ्यांना पटते.
anaokarm@yahoo.co.in