लहानपणी जेवताना मुलांना हमखास सांगितली जाणारी गोष्ट- ‘चिमणीचं घर मेणाचं आणि कावळ्याचं घर शेणाचं’. कावळ्याचं घर पावसात वाहून जातं आणि तो चिमणीच्या घरी आसरा मागायला जातो. ही गोष्ट इथेच संपायची, पण ही गोष्ट उन्हाळ्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही. उन्हाळ्यात चिमणीच्या मेणाच्या घराचं काय झालं?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कच्च्या-पक्क्या शब्दांचे अर्थ कदाचित तेव्हापासूनच आपल्या मेंदूवर बिंबवले गेले. कच्चा म्हणजे अशाश्वत, अपरिपक्व आणि अपरिपक्वता विकासाच्या व्याख्येत किंवा प्रगतीच्या व्याख्येत बसत नाही. कदाचित अग्नीचा शोध लागल्यानंतर या कच्च्या-पक्क्या शब्दांचा वापर वाढला. आपण अन्नाबरोबर बऱ्याच नैसर्गिक पदार्थाना उष्णता देऊन पक्केकेले गेले. मातीने बनवलेली वीट भाजून पक्की केली आणि पक्की घरे बांधून आपण विकसित शहरे आणि अनेक संस्कृती वसविल्या.
आज ग्रामीण भागात कित्येक तरुण मातीची जुनी घरे पडून सिमेंटची घरे बांधत आहेत. कारण- मातीच्या घरात राहणाऱ्या मुलाला कोणी लग्नासाठी मुलगी देत नाही. तुम्हाला कदाचित यावर हसू आले असेल, पण हे एक कटू वास्तव आहे. मातीची घरे कच्ची असतात आणि त्याला डागडुजी जास्त करावी लागते, घर सतत सारवावे लागते, हे यामागचे कारण. सरकारी ‘घरकुल’ योजनेमुळे तर या कच्च्या-पक्क्या घराच्या व्याखेला वेळेचं वळण मिळाले. स्थानिक नसगिक साहित्याने बांधलेले घर हे ‘कच्चे घर’ आणि सिमेंट, स्टीलसारख्या कारखान्यातून येणाऱ्या साहित्याने बांधलेले घर हे ‘पक्के घर’ असे जाहीर झाले. सरकारी अनुदानातून ग्रामीण तरुणांना सिमेंटच्या पक्क्या घराची गोड स्वप्नं पडू लागली. सिमेंटच्या घरासाठी खर्च जास्त होतो. रेती आणि खडी जास्त लागते, कुशल कामगार लागतात. सर्व साहित्य बाजारातून विकत घ्यावे लागते. त्यामुळे अनुदानित रकमेत घर अतिशय लहान होते किंवा घर पूर्ण होत नाही. मग कर्ज काढून घर पूर्ण केले जाते. मराठवाडय़ासारख्या पाणीटंचाई क्षेत्रात जेव्हा भर उन्हाळ्यात सिमेंटचे घर बांधले जाते तेव्हा अपुऱ्या पाण्याअभावी त्या घराला ‘क्युरिंग’ (सिमेंट बांधकामावर पाणी मारणे) करता येत नाही. असे घर केवळ एका वर्षांत निकामी होऊन जाते. घराचे चटई क्षेत्र कमी झाल्याने घरात गुरे बांधायला जागा राहत नाही. घरातील कुटुंबाचा भाग असलेली गुरे घराबाहेर जातात. शेतीची कामे घरात होत नाहीत. अशा घराची डागडुजी करण्यासाठी प्रत्येक वेळी कारागीर बाहेरून बोलवावे लागतात. ज्यामुळे डागडुजीचा खर्चसुद्धा वाढतो. सिमेंटची घरे उन्हाळ्यात तापतात आणि हिवाळ्यात थंड पडतात. त्यामुळे घरात ऊर्जेचा वापर वाढतो. परिणामी खर्च वाढतो. गावातील पसा गावाबाहेर गेल्याने गावाच्या चक्रीय अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. हे सर्व होत असूनही बहुतांश लोकांना सिमेंटचे पक्के घर बांधण्याचा अट्टहास का असतो?
मुळातच आपल्या कच्च्या आणि पक्क्या घराच्या व्याख्या फारच उथळ आहेत. जाहिरातबाजीने लोकांच्या आकांक्षाना वळण देणे फार सोपे आहे. जास्तीतजास्त संसाधनांचा उपभोग घेणे हे आर्थिक विकासासाठी फायद्याचे आहे. ‘समाधान’ हे आर्थिक उत्कर्षांसाठी योग्य नाही. यामुळेच पूर्वी केवळ जमिनीच्या बा आवरणावर उगवणाऱ्या नसगिक साहित्याचा वापर करून घरे बनवणारा माणूस, आता इंधने आणि यंत्रांच्या सहाय्याने जमिनीला खोल भगदाडे पडून त्यातून निघणाऱ्या साहित्याने घरे बांधतो आहे. निसर्गातून सहज उपलब्ध साहित्य अर्थचक्रात आणि जी.डी.पी.मध्ये भाग घेत नाही. जी.डी.पी.मध्ये भाग घेऊ शकत नसल्यानेही कदाचित नसगिक साहित्याबद्दल शैक्षणिक आणि व्यावसायिक पातळीवर लोकांमध्ये अनास्था दिसून येते. किंवा अशा घरांना ‘मागास’ नजरेने पहिले जाते, म्हणूनच की काय आपण निसर्गाच्या पक्क्या रचनांना तिलांजली देत पक्क्या घरांच्या रचना करण्यात गुंतलो आहोत. निसर्ग चक्रीय आहे. स्थिती-उत्पत्ती-लय हे निसर्गाचक्राचे सूत्र आहे. एखादी दीर्घकाळ टिकणारी गोष्ट बनवण्यासाठी निसर्ग तेवढाच उत्क्रांतीचा काळ घेतो, मग झटपट परंतु दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टीचा आपल्याला हव्यास का?
नैसर्गिक कच्चे (प्रक्रिया न करता मिळवलेले) साहित्य वापरून बांधलेली घरे ही पाण्याने लवकर खराब होतात किंवा भूकंपात लगेच पडतात असा सर्वसाधारण समज आहे. पण हा त्या साहित्याचा दोष नाही. तर ते साहित्य चुकीच्या पद्धतीने वापरल्याने डागडुजीची मेहनत वाढते. छपराला योग्य आणि लांब छज्जा देऊन मातीच्या भिंतीला पावसापासून सहज वाचवता येते. भिंतींची जाडी-उंची, लाकडावरील प्रक्रिया, मातीचा पोत आणि गुणधर्म, वातावरण, भौगोलिक रचना, स्थानिक कौशल्य अशा वेगवेगळ्या संस्थांच्या समागमातून घराचे आयुष्य ठरत असते. म्हणूनच कदाचित २००४ मध्ये कच्छला झालेल्या भूकंपात जास्तीतजास्त मातीचे भुंगे (गोल घरे) टिकून राहिले. त्यामुळेच केवळ साहित्याची प्रयोगशाळेत परीक्षा करून कच्चे पक्के ठरवणे कितपत योग्य आहे हा एक प्रश्नच आहे. मातीची कच्ची वीट जेव्हा प्रयोगशाळेत परीक्षणासाठी दिली जाते तेव्हा अगदी पहिल्याच जलपरीक्षेत ती बाद होते. परंतु त्याच विटांनी बनवलेली आणि एका शतकापेक्षा जास्त टिकलेली घरे आजही अस्तित्वात आहेत.
कोणत्याही साहित्याचा योग्य आणि प्रमाणात वापर हे त्याच्या शाश्वततेचं गमक आहे. सिमेंटसारखी आधुनिक आणि तांत्रिक साहित्यसुद्धा योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात वापरले तर पर्यावरणाचे संतुलन राखले जाऊ शकते. आणि घराचे आयुष्यसुद्धा वाढवले जाऊ शकते. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देऊन त्यांच्या संगमातून एका शाश्वत भविष्याकडे वाटचाल होऊ शकते. मग कच्चा-पक्का हे केवळ शब्द राहून अधिक खोल आणि अर्थपूर्ण रचनांची निर्मिती करणे आपल्याला शक्य होईल.
भारत देश नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. आज भारतात असंख्य प्रकारचे स्थानिक साहित्य वापरून उत्तम घरे बांधण्याचे कौशल्य अस्तित्वात आहे. त्याला संस्कृतीची जोड आहे. त्यातील नैसर्गिक सात्त्विकता अजूनही टिकून आहे. त्या घरांची वातावरणाला आणि हवामानाला अनुकूलन साधण्याची क्षमता प्रचंड आहे. या सर्व पुरातन ज्ञानाकडे आपण डोळसपणे पाहायला हवे. ‘‘आपल्या भारतात पारंपरिक ज्ञान किती छान!’’ या कोत्या कौतुकापलीकडे जाऊन त्याची खोली अभ्यासली की ते ज्ञान अध्यात्म होऊन पवित्र होतं; आणि त्याची संवेदनशीलता केवळ चांगल्याच गोष्टींची निर्मिती करते. कच्चा आणि पक्का या शब्दांपलीकडे आपल्याला जेव्हा घराचे खरे ऐश्वर्य दिसेल तेव्हा दिखावेपणाचा अट्टहाससुद्धा गळून पडेल.
pratik@designjatra.org