अमित आचरेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणताही सण असो किंवा एखादा खास कार्यक्रम.. आपण प्रत्येक वेळी आपल्या कपडय़ाच्या बाबतीत खूपच सजग असतो. मग कपडे धुणं असो किंवा त्यांची इस्त्री असो, आपण प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक करत असतो. त्याच प्रमाणे आपल्या घरामध्ये असणाऱ्या अंथरूणाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

या लेखामध्ये घरातील अंथरूण-पांघरूणाची काळजी कशी घ्यावी या बद्दल माहिती घेऊया.

कॉटनच्या बेडशीट धुताना घेण्याची काळजी : कॉटनच्या बेडशीट धुताना त्या सर्व कपडय़ांसोबत धुवू नका. आपल्या कपडय़ांनंतर बेडशीटचा संबंध आपल्या शरीरासोबत जास्त असतो. त्यामुळे त्याची योग्यती स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. सफेद रंगाच्या कॉटनच्या बेडशीट धुताना त्यामध्ये बेकिंग सोडा आणि वेनेगरचा वापर करा. जर तुमची बेडशीट हातमागावर किंवा प्युअर कॉटनची असेल तर बेडशीट धुताना वाशिंगपावडरचा वापर शक्यतो करू नका. त्या ऐवजी लिक्विडचा वापर करा. त्यामुळे बेडशीट खराब होणार नाही. त्याच प्रमाणे आपल्या बेडशीटला सुगंध यावा या करिता त्यामध्ये आपण इसेन्शिल ऑईलचा वापर तुम्ही करू शकता. बेडशीट ड्रायरमध्ये सुकवताना त्यामध्ये एका कोरडय़ा रूमालाला लवेन्डर फ्लेवरचे इसेन्शिल ऑईल लावून तो रुमाल मशीनमध्ये टाकावा. यामुळे संपूर्ण बेडशीटला लवेन्डरचा सुगंध येईल.

लोकर, रेशीम कापूस यांपासून बनवलेली पांघरूणं अंगावर घेतल्यावर आपल्याला मऊपणा आणि उबदारपणा या दोघांचीही अनुभूती येते. अनेक जणांना असे वाटते की बेडशिट मधला लोकरं-रेशीम प्रकार आपण घरी धुवू शकतो का? तर त्याचे उत्तर ‘हो’ असे आहे. मात्र अशाप्रकारच्या पांधरूणांवर फक्त ड्रायक्लिनिंग हा पर्याय दिला असेल तर ते घरी धुण्याची चूक कधीही करू नका. आणि जर ते घरी धुणार असाल तर त्यासाठी फ्रन्ट डोर मशीन चा उपयोग करा त्याचा जास्त फायदा होईल. ते घरी धुताना त्यामध्ये असणारे लोकर, रेशीम, कापूस यांना हानी पोहचणार नाही याची काळजी घ्या. पाण्याचे तापमान ३० अंश सेल्सिअस इतके ठेवा. कपडे धुण्याच्या पावडर ऐवजी वॉशिंग लिक्विडचा वापर करा.

ब्लॅंकेट : अंथरूणामध्ये सर्वात जास्त वजनदार असणारा प्रकार म्हणजे ब्लॅंकेट. ब्लॅंकेट धुताना बेकिंग सोडा आणि वेनेगरचा वापर करा त्यामुळे ब्लॅंकेटमध्ये असणारे जंतू नष्ट होण्यास मदत होईल. ब्लॅंकेट धुवून ते सूर्यप्रकाशात वाळवा, जेणे करून त्यामधून जंतू निघून जातील. त्यासाठी तुम्ही ड्रायरचा वापरही करू शकता.

अभ्रे

अभ्रे धुताना जास्त काळजी घ्या. जर अभ्य्रांचा रंग जात असेल तर इतर कपडय़ांबरोबर एकत्र धवू नका. अभ्रे धुताना त्यांना विनेगर आणि मीठच्या पाण्यामध्ये टाकून १० मिनिटे अभ्रे भिजत ठेवा. त्यानंतर योग्य पद्धतीने ती धुवून घ्या. (तुम्ही वापरत असलेले अभ्रे कोणत्या कापडाच्या प्रकारामध्ये मोडतात याचा विचार करून पाण्याचे तापमान ठरवा.)

(लेखक टेक्सटाईल इंडस्ट्रीमधील तज्ज्ञ आहेत)

amit@vaacorp.in