मैत्रेयी केळकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
mythreye.kjkelkar@gmail.com
सुग्रास भोजन झाल्यावर आपल्याला एक शांत, पण हवीहवीशी तृप्ती अगदी आतून रोमारोमातून जाणवते. ती सुखद जाणीव ही शब्दातीतच. ही तृप्ती एका अनामिक अशा मनभरल्या आनंदाची असते. वनस्पती याही मानवांसारख्या सगळ्या संवेदनांचा अनुभव घेणाऱ्या अविचल सजीवांमध्येच मोडतात. मग रसनातृप्तीचा आनंद त्यांचाही वेगळा कसा बर असावा!
या अबोल, ममताळू सवंगडय़ांना आपण जेव्हा खतरूपी अन्न पुरवतो, तेव्हा त्यांचीही तृप्ती आपल्या संवेदनशील मनाला जाणवल्याशिवाय राहत नाही. वनस्पतींचं
अन्न म्हणजे त्यांना दिलेली वरखतं आणि भरखतं. पण ती देताना, तयार करताना हा भोजनसिद्धीचा सोहळा आहे असं जर मनापासून वाटलं तर ती खतंही या वानस मित्रांच्या अंगी लागतात.
एखाद्या गोंडस लडिवाळ बाळाच्या गालांसारखी चमक त्यांच्या पानावर दिसते. खोडाच्या काठय़ा मजबूत होतात. फुलांचे रंग उजळतात आणि देठांची पकड घट्ट होते. मग बाग एका तृप्तीच्या लहरीवर डोलू लागते.
गांडूळ खत, कंपोस्ट खत, शेणखत अशा खतांच्या वापराने वनस्पतींना आवश्यक जीवद्रव्याचा पुरवठा होतो. यातील कंपोस्ट खत आपण घरच्या घरी तयार करू शकतो.
आपण स्वत: तयार केलेल्या या खताच्या वापराने वनस्पतींच्या वाढीतील जाणवणारे बदल जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष दिसतात, त्यावेळी कंपोस्टसाठी वापरला जाणारा कचरा हा त्रासदायक वाटत नाही. वाळूने खुटखुटीत झालेला कचरा बघताना त्याची उपयुक्तता जाणवून सहजच म्हणावंसं वाटतं हे तर ‘काळं सोनं.’
हे काळं सोनं जरी मौल्यवान असलं तरी ते मिळवण्यासाठी थोडे कष्ट मात्र घ्यावे लागतात. थोडी खटपट करावी लागते. आपल्या स्वयंपाकघरातून रोज ढीगभर कचरा गोळा होत असतो, पण त्यातला फारच थोडा टाकून देण्यालायक असतो. या कचऱ्यातील सगळे विघटनशील पदार्थ म्हणजेच भाज्यांच्या, फळांच्या साली, देठं, चहापूड, शेंगांची टरफलं लिबलिबित टोमॅटो, पाणेरलेल्या काकडय़ा, कोथिंबिरीच्या काडय़ा असं काही. हे सगळे म्हणजे आपल्या हिरव्या मित्रांचं अन्न. याचा उपयोग करून कंपोस्ट तयार करायचं. तुमच्याकडे बरीच जागा असेल तर मग एखादा ड्रम आणायचा, परसदार असेल तर एका कोपऱ्यात कंपोस्टसाठी खड्डा खणायचा. सर्वप्रथम तळाशी वाळलेला पालापाचोळा किंवा गवत घालायचं. त्यावर थोडं आंबट ताक किंवा थोडं तयार कंपोस्ट मुठी दोन मुठी टाकायचं. यावर घरातला कचरा पसरून ड्रम असेल तर झाकण लावायचं. खड्डा असेल तर वरून परत थोडा पातेरा पसरायचा. अशा प्रकारे रोजचा कचरा त्यात टाकत राहायचं, वर पाचोळ्याचा एकेक थर द्यायचा, जेणेकरून या कचऱ्यातला ओलावा शोषला जाईल. ड्रम किंवा खड्डा पुरेसा भरला की काही दिवस तो झाकून ठेवायचा. खड्ड्यातील खत आपसूकच तयार होतं, पण ड्रम मात्र उलटा करून खालचं तयार ओलं कंपोस्ट वेगळं करावं लागतं. विघटन न झालेला भाग परत भरावा लागतो. आता हे काळसर ओलं कंपोस्ट खुटखुटीत वाळवायचं. मग थोडं चुरून चाळून घ्यायचं की बारीक दाणेदार खत मिळतं.
यूटय़ूबवर दाखवल्या जाणाऱ्या व्हिडीओज्प्रमाणे आपोआप बारीक, रवाळ खत कधीच तयार होत नाही. तर ते आपल्याला थोडं चुरून बारीक करून घ्यावं लागतं. हे तयार खत आपण झाडांसाठी वापरू शकतो, तसचं पुढच्या कंपोस्टच्या सुरुवातीला कल्चर म्हणूनही वापरू शकतो. या कंपोस्टमधे कडुनिंबाच्या पाल्याचा चुरा आणि थोडं शेणखत मिसळलं की आपल्या झाडांची अन्नद्रव्यांची निम्मी गरज भागते.
ज्यांच्याजवळ मोठी जागा नाही त्यांनासुद्धा कंपोस्ट करता येतं. फक्त त्याची पद्धत थोडी वेगळी आहे. समजा तुमच्याकडे अजिबातच मोकळी जागा नाहीए, मग अशावेळी एखादी प्लास्टिकची झाकणाची टोपली आणावी. त्याला आतून बारीक जाळी लावून घ्यावी. आता या बास्केटच्या तळाशी थोडं कोकोपीट आणि मूठभर कंपोस्ट पसरावं. यावर घरातला कचरा हाताने बारीक करून टाकावा; परंतु यात शिजलेले अन्न पदार्थ टाकणं टाळावं.आता हे सगळ एखाद्या लांब काठीने हलवत एकत्र करून झाकणं बंद करावं. रोजचा कचरा यात मिसळून रोज ही हलवण्याची क्रिया करत राहावी. यातून तयार होणारं कंपोस्ट हे कोरडं आणि तसंच्या तसं झाडांसाठी वापरता येतं. यातील जी पद्धत आपल्या सोईची असेल ती वापरावी.
प्लास्टिकच्या टोपलीचा वापर करून कंपोस्ट करण्याची पद्धत हे जयंत जोशी यांची असून त्यासंबंधीचे त्यांचे सविस्तर व्हिडीओ यूटय़ूबवर उपलब्ध आहेत. झाडांच्या वाढीसाठी कंपोस्टबरोबरच इतरही अनेक पोषकद्रव्यांची गरज असते. ती गरज कशी पुरी करायची हे आपण पुढील लेखात पाहू. त्याबरोबरच प्रत्यक्ष कंपोस्ट तयार करताना येणाऱ्या अडचणीवर कशी मात करायची त्याबद्दल माहिती घेऊ. तोवर तुम्ही निसर्ग अभ्यासक श्र्श्रीकांत इंगळहळीकर यांच्या ‘आसमंत’ या पुस्तकातील निसर्गाच्या जवळिकीच्या प्रसन्न अनुभवांचा आनंद घ्या.