जार्डन कन्झ्युमर सोल्यूशन्स ऑफ इंडिया प्रा. लि.ने बायोनेअर ब्रँडअंतर्गत आपल्या कलात्मक टॉवर पंख्यांची वैविध्यपूर्ण श्रेणी आपल्या भारतीय ग्राहकांसाठी सादर केली आहे. सुबक रचना आणि थंड हवेबरोबरच विजेची बचत करणारे असे हे टॉवर पंखे आहेत.
बायोनेअर टॉवर पंखे लॉबी, कार्यालये, दुकान, इस्पितळ आणि गेस्ट हाउसमध्ये वापरण्यास योग्य आहेत. खोलीतील वातावरण थंड ठेवण्यासाठी या पंख्यांचा मोठा उपयोग होतो. यासाठी वीज बिल वाढेल याची चिंता करण्याचेही कारण नाही, कारण हे पंखे विजेची बचत करणारे आहेत. बायोनेअर टॉवर पंख्यांची काही प्रमुख वैशिष्टय़े : या टॉवर पंख्यांचा आवाज होत नसल्याने एकाग्रतेने काम वा अभ्यास करणे शक्य होते. नसíगक हवा मिळत असल्याने वातावरण आनंददायी बनते. या पंख्यांमध्ये प्रभावी तंत्रज्ञान वापरले असल्याने तीव्र उन्हाळ्याच्या दिवसांतही वीज बिलाची बचत होते. आधुनिक डिझाइन असल्याने कार्यालय व घरात शोभून दिसतात. रिमोट कंट्रोलची सुविधा असल्याने बसल्या जागेवरून नियंत्रण ठेवता येते. या पंख्यांची किंमत २२०० रुपयांपासून ५००० हजार रुपयांपर्यंत आहे.
बायोनेअर टॉवर पंखे आता भारतातही
जार्डन कन्झ्युमर सोल्यूशन्स ऑफ इंडिया प्रा. लि.ने बायोनेअर ब्रँडअंतर्गत आपल्या कलात्मक टॉवर पंख्यांची वैविध्यपूर्ण श्रेणी आपल्या भारतीय ग्राहकांसाठी सादर केली आहे. सुबक रचना आणि थंड हवेबरोबरच विजेची बचत करणारे असे हे टॉवर पंखे आहेत.
First published on: 11-05-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bionaire tower fan