मुलांमुळे घराला एक जागतेपण येतं.. सध्या मुलांची स्वतंत्र खोली ही संकल्पना रुळते आहे. ही खोली कशी असावी, त्यात कोणत्या गोष्टी आवर्जून असाव्यात, याविषयी.. निमित्त आहे, १४ नोव्हेंबर या बालदिनाचे..
लहान मुलांची खोली म्हणजे त्यांचं स्वत:चं असं छोटंसं विश्वच! जिथे तो दिवसभराचा बहुतांश वेळ घालवितात. भरपूर मस्ती, खेळणं, गृहपाठ करणं, पुस्तकं वाचणं, चित्र काढणं आणि रंगविणं या कामात ते दंग असतात. इथे ती स्वत:च्या काल्पनिक जगात दिवसभर रममाण होतात. मुलांच्या आयुष्याला वळण
यावर अनेक बालतज्ज्ञांनी आपली मते मांडलेली आहेत.
मुलांची खोली रंगवण्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमच्या मुलाची खोली रंगवणं, हे अजिबातच पेचात टाकणारं काम नाही. तुमच्या मुलाच्या खोलीत जिवंतपणा आणताना काही सूचना आणि क्लृप्त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि हे करताना हा अनुभव दीर्घकाळ स्मरणात राहील, याचीही व्यवस्था करू शकता.
सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य रंगांची निवड! कारण ‘रंग’ मुलांवर मानसिक आणि शारीरिकपरिणाम करतात. गरजेचे आहे ते थोडेसे व्यवस्थापन आणि आपल्या मुलाच्या खोलीला कोणता रंग योग्य ठरेल याबद्दलचे थोडेसे मूलभूत ज्ञान. वेगवेगळ्या रंगांना वेगवेगळे अर्थ असतात. तुमच्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचा कल लक्षात घेऊन रंगाची निवड करणे खूप गरजेचे आहे. तसे बघता, लहान मुलांना उजळ रंग आवडतात आणि बहुतेककरून त्यांचा ओढा पिवळा, नािरगी आणि लाल यासारख्या रंगांकडे असतो. उजळ रंगांमुळे सकारात्मक कंपने निर्माण होऊन वातावरणात अधिक ऊर्जा येते, जे मुलांकरता महत्त्वाचे आहे. तुम्ही खोली रंगवायचे मनसुबे आखत असाल तर खोलीचा आकार याबाबत विचार करणेही महत्त्वाचे ठरते. उष्ण रंगांच्या छटांमुळे मोठय़ा खोलीला आरामदायी फील येतो. आणि शीत रंगाच्या छटा वापरल्या की छोटी झोपायची खोली मोठी भासते. तुमच्या मुलांच्या खोलीचा रंग निश्चित करताना तुम्हाला प्रकाशयोजना हा घटकही ध्यानात घ्यावा लागेल, कारण त्यामुळेच रंगाला योग्य उठाव मिळतो.
तुमच्या मुलांची खोली सजवण्याची आणखी एक सर्जनशील पद्धत म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि आवडीनिवडी लक्षात घेऊन ती अॅनिमेटेड थीम्सने सजवणे. उदा. खोलीत मस्त्यालयात फेरफटका मारण्याचा अनुभव हवा असेल तर िभती निळ्या रंगात रंगवून त्या मासे, पाणवनस्पती आणि िशपले यांच्या स्टेन्सिल्सनी सजवणे. अंतराळात फेरफटका मारण्याचा अनुभव हवा असेल, तर िभती गडद निळ्या रंगात
रंगाचा उपयोग करून तुमच्या मुलाची खोली सजवताना करायची आणखी एक कल्पना म्हणजे तुमचे मूल मोठे होत असताना खोलीत प्रेरणादायक सुविचार लिहिणे. त्यामुळे ते विचार तुमच्या मुलाला प्रेरणा देत वर्षोनुवष्रे त्याच्या खोलीत राहू शकतात. तुमच्या मुलाची खोली रंगवताना आरोग्य आणि हित या गोष्टीही ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. नुकताच रंग देऊन झाल्यावर मूल आजारी पडू शकते. किंवा रंगांमधील मोठय़ा प्रमाणावर असलेले शिसे आणि त्यातून निघणाऱ्या वाफांमुळे खूप काळानंतर, कधीकधी खूप वर्षांनंतर मूल आजारी पडू शकते. त्यासाठी नसíगक घटकांनी बनवलेली आणि चटकन उडून जाणारी सेंद्रिय संयुगे (व्हीओसी) असलेली (किंवा व्हीओसीमुक्त असलेली) इको-फ्रेंडली उत्पादने वापरणे गरजेचे आहे. मुलाच्या खोलीतल्या िभतींवर काहीतरी खरडून ठेवणे, डाग पडणे हे होतच असते, त्यामुळेच िभतींचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी जलावरोधी उत्पादने वापरणे योग्य होईल.
मुलाच्या खोल्यांकरिता वापरण्याजोगे रंग तुम्हाला मुलगा असो वा मुलगी, पिवळा हा तुमच्या मुलाच्या खोलीकरता उत्तम रंग आहे. हा अनेक छटांमध्ये उपलब्ध असल्याने मुलाच्या व्यक्तिमत्त्वानुसार सौम्य किंवा गडद रंगात खोली रंगवता येईल.
निळा हा आकाशाचा तसेच समुद्राचाही रंग आहे, ज्यातून शांतता प्रतीत होते. हा शीत, शमनकर्ता आणि व्यवस्थितपणाचा अनुभव देणारा रंग आहे. निळ्या रंगामुळे आपल्या मनाला शांतता प्रदान करणारा रंग आहे. हा रंग मेंदू शांत करण्यास मदत करतो व त्यामुळे झोप लागण्यास मदत होते.
मुलीची खोली रंगविताना लोकांच्या मनात पहिला विचार येतो तो गुलाबी रंगाचा. ही जुनी संकल्पना असली तरी तरुण मुलींच्या खोलीकरितासुद्धा हा खूप योग्य रंग ठरू शकेल.
बऱ्याच जणांचे असे मत आहे, की पांढरा रंग हा मुलांच्या खोलीकरिता अयोग्य रंग आहे. यावर सहजपणे डाग पडू शकतात. पण उजळ पांढरी खोली वेगवेगळ्या रंगांनी व्यवस्थितरीत्या रंगवून काढली तर तुमच्या मुलांकरिता उत्तम ठरू शकेल.
आपल्या मुलाची खोली रंगविण्याचे ठरविण्याआधी सुरू आपल्या मुलाचे वय, तुमचे अंदाजपत्रक आणि तुमच्या मुलाचा आवडता रंग आणि उपक्रमांनुसार खोलीचा चेहरामोहरा पुन्हा बदलणार आहात का, या गोष्टींचा विचार करण्यासाठी थोडी सवड काढा. योग्य रंग आणि थीम निवडण्याने ही पूर्ण प्रक्रिया मजेदार आणि अर्थपूर्ण होऊन जाते. तेव्हा तुमच्या मुलाच्या खोलीला योग्य रंगांनी रंगवा आणि हल्लागुल्ला, मौज आणि उत्साह यांचे स्वागत करा…
भावनांचं बेट : मुलांची खोली मौजमजा आणि उत्साह
मुलांमुळे घराला एक जागतेपण येतं.. सध्या मुलांची स्वतंत्र खोली ही संकल्पना रुळते आहे. ही खोली कशी असावी, त्यात कोणत्या गोष्टी आवर्जून असाव्यात, याविषयी.. निमित्त आहे, १४ नोव्हेंबर या बालदिनाचे.. लहान मुलांची खोली म्हणजे त्यांचं स्वत:चं असं छोटंसं विश्वच! जिथे तो दिवसभराचा बहुतांश वेळ घालवितात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-11-2012 at 03:25 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children room fun and enthusiasm