मुलांसाठी स्वतंत्र खोली असण्याचं हे युग आहे. त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्व विकासासाठी, निकोप वाढीसाठी हे गरजेचं असलं तरी पालक आणि पाल्य यांच्यातील सुसंवादाला कुठे खीळ बसता कामा नये, हे अधिक महत्त्वाचं आहे.
‘चांदोबा चांदोबा भागलास का, िलबोणीच्या झाडामागे लपलास का, िलबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी’ हे बालगीत आपण सगळ्यांनीच लहानपणी ऐकलं आहे. आता हे बालगीत आपण व्हिडीओ सीडीजमधून आजच्या मुलांना ऐकवतो आहोत. या गाण्यात म्हटल्याप्रमाणे पूर्वीची गृहसंस्कृती चिरेबंदी वाडय़ाची होती. दगडी चिरेबंदी वाडे, त्याचे मोठे लाकडी प्रवेशद्वार, ते बंद करायला फक्त एक लाकडी अडसर किंवा अगदी असले तर मोठे कुलूप. आत प्रवेश केल्यावर दिसे ते वातावरण सुंदर, पवित्र करणारे तुळशीवृंदावन व त्यापाशी तेवणारा दिवा! मग असे पडवी किंवा ओसरी. तिथून मुख्य घरातील खोल्या. वाडय़ाच्या भव्यतेप्रमाणे यासुद्धा मोठय़ा, प्रशस्त. दिवाणखाना, स्वयंपाकघर, कोठीची खोली, माजघर, बाळंतिणीची खोली, कुटुंबप्रमुख असलेल्या जोडप्याची खोली, वर छोटा चिंचोळा जिना किंवा मोठा लाकडी जिना जाई तो माडीवर. तिथे इतर जोडप्यांसाठी वेगळ्या खोल्या, घरातल्या मोठय़ा मुलांसाठी एकत्र अशी एक खोली, पाहुण्यांसाठी एक खोली असं ते स्वरूप असे. मागे परसदारी गुरांचा गोठा, विहीर तसंच छोटी/मोठी बाग असे. संपूर्ण कुटुंबाचा एकत्र व्यवसाय असल्याने यात घरातल्या सर्व पुरुष मंडळींचा सहभाग असे. घरातील सर्व स्त्रिया स्वयंपाक, इतर कामे करीत. मदतीला तिथेच राहाणारे नोकर, कुळुंबिणी, स्वयंपाकिणी असत. घरातील छोटय़ा धार्मिक कार्यापासून ते लग्नापर्यंत सर्व काही वाडय़ातच होई.
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत तर बहुसंख्येने वरील प्रकारचे वातावरणच होते. मग स्वातंत्र्यानंतर युरोपातील औद्योगिक क्रांती झपाटय़ाने आपल्याकडे आली. परिणामी शहरीकरणाला महत्त्व आले. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण झाले व शिकलेली घरातील मुले अर्थार्जनासाठी शहराकडे वळू लागली. त्यामुळे वृद्ध, काही प्रौढ मंडळी गावाकडे व तरुण शहरात असं चित्र निर्माण झालं. तिथेच चाळ संस्कृती उदयास आली. एकाच घरात (दोन खोल्यांच्या) आई-वडील, मुले राहू लागली. ऐंशीच्या दशकात तिचं रूपांतर फ्लॅट संस्कृतीत झालं. प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे एक वा दोन बेडरूमचे फ्लॅट येऊ लागले. परंतु तरीही घरात एकावेळी दोन पिढय़ा असायच्या, त्यामुळे मुलांना स्वतंत्र रूम नसे. मुले आई-वडिलांजवळ झोपत. मग हीच मुलं मोठी झाल्यावर वेगळे फ्लॅट घेती झाली. जिथे फक्त आई-वडील व मुले. मग मुलांना स्वतंत्र रूम आली. फ्लॅटमध्ये लििव्हग रूम, डायिनग रूम, किचन, मास्टर बेडरूम, चिल्ड्रन्स बेडरूम, स्टडीरूम, गेस्टरूम असे प्रकार अस्तित्वात आले.
आता तर संपूर्ण घराचं इंटीरिअर करताना पालक मुलांच्या खोलीबाबतही खूप आग्रही असतात. मुलांच्या खोलीची सजावट करताना काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं. अत्याधुनिक वस्तूंनी ती खोली सजवण्यापेक्षा मुलांच्या एकूणच सर्वागिण विकासाच्या दृष्टीने ती सजलेली असावी. लहान मुलांच्या खोलीत शक्यतो बेबी िपक, ब्ल्यू, ऑरेंज असे रंग असावेत. हल्लीच्या मुलांना कार्टुन्स खूप आवडतात. पण त्यांच्या खोलीत कार्टुन्सचा वापर आवश्यक नाही. कारण टीव्हीवर ते रोज पाहातातच. पण कार्टुन्सचा वापर करायचा झाल्यास िहसक कार्टुन्स टाळावीत. त्याऐवजी टॉम-जेरीसारखी विनोदी कार्टुन्स वापरावीत. कार्टुन्स ही मुलांची एकाग्रता कमी करत असतात. म्हणून त्यावर भर देऊ नये उलट त्यांचा वापर टाळता आला तर उत्तमच! मुलांना त्यांची स्वतंत्र खोली असली तरी त्या खोलीत जाऊन पालकांनी त्यांच्याबरोबर खेळणं, गप्पा मारणं खूप आवश्यक आहे. मुले मोठी होतील तसे इंटीरिअर बदलेल. अभ्यासाचे टेबल, संगणक टेबल वगरे येईल. येथील रंग भडक नसावेत. मुख्य म्हणजे लहान किंवा मोठय़ा मुलांच्या खोलीत पुस्तकांसाठी जागा आवर्जून करावी. ती पुस्तके त्यांच्याबरोबर वाचावीत. ज्यांच्याकडे मुलांची स्वतंत्र खोली नाहीये त्यांनी घरातील एखादा कोपरा, बाल्कनी वगरे जागेत मुलांसाठी सजावट करावी. परंतु या ठिकाणीसुद्धा संवाद साधणं फार महत्त्वाचं आहे.
आजच्या उंच उंच टॉवर्समध्ये स्वतंत्र फ्लॅट, प्रत्येकाला वेगळी रूम, प्रत्येकाला स्वत:चा वेगळा टीव्ही, वेगळा पीसी इथपर्यंत प्रत्येक जण स्वतंत्र, वेगळा झाला आहे. विभक्तपणा व्यक्तीपर्यंत येऊन पोहोचला आहे. युरोप, अमेरिकेत तर तान्ह्या बाळांनाही स्वतंत्र झोपवतात, लहानपणापासूनच त्यांना स्वतंत्र रूम असते व त्यात अत्याधुनिक ‘सोयी सुविधा’ असतात. इतके की मध्ये एका भारतीय जोडप्याला मुलांना स्वत:जवळ झोपवल्याबद्दल युरोपातील एका देशात शिक्षा झाली होती. तो एक गुन्हा मानला गेला होता. पश्चिमेकडून सर्व बदल पूर्वेकडे आले आहेत. आपल्याकडेही हे बदल आल्यास नवल नाही!
मानसशास्त्रीय भाषेत विचार केला तर कुटुंबसंस्थेचा प्रवास हा ‘मूळ’ कुटुंबाकडून ‘छत’ कुटुंबाकडे झाला आहे. ‘मूळ’ कुटुंब किंवा ‘रुट’ फॅमिलीत सर्वजण एकत्र राहायचे. व्यवसाय
एकत्र, खाण पिणं सर्व एकत्रच असायचं. निर्णय एक व्यक्ती घेणार बाकी सर्वजण ते मानणार, पुरुषप्रधान वातावरण पूर्णपणे असायचं. परंतु नातेसंबंधाची वीण घट्ट (कदाचित जास्तच) असायची. एकमेकांशी त्यामुळे संवाद असायचा (जरी त्यात भांडणं झाली तरीही). थोडक्यात एकाच मुळाला जोडलेल्या वृक्षाप्रमाणे ही कुटुंबसंस्था होती. संवाद होता पण व्यक्तिस्वातंत्र्य नव्हते. नाती घट्ट होती, पण क्वचित एखाद्याच्या प्रगतीला त्याचा अडसरही व्हायचा. पण त्याचा परिणाम इतका प्रखर नव्हता.
मुलं लहान असेपर्यंत अजून तरी मुलं आई-वडिलांजवळच झोपतात. त्या जवळकीची, सुरक्षिततेची त्यांना गरज असते. त्यामुळे आई-वडिलांजवळ गोष्टी ऐकत झोपणं, त्यांच्या कुशीत विसावणं आवश्यक असतं. परंतु मुलं काही आपल्या शाखा नाहीत. त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं, जे विकसित होणं आवश्यक आहे. आई-वडिलांजवळ राहून पण स्वतंत्रही राहून स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याची पौगंडावस्थेतील वयापासून त्याची मानसिक गरज असते. त्यामुळे आíथकदृष्टय़ा परवडत असेल तर त्या वयापासून स्वतंत्र खोली मिळाली तर एका अर्थाने ते योग्यही ठरेल.  अर्थात त्यांचं स्वातंत्र्य जपताना त्यांच्याशी सुसंवाद असणंही आवश्यक आहे. त्यांच्याशी मत्रीरूपाने वागणं महत्त्वाचं आहे.
स्वत:च्या खोलीत एकांतात ते काय करतात, त्यांचे पीसीवर काय काम चालते, कोणाशी चॅटिंग चालते, नेटवर ते काय सìफग करतात यावर लक्ष असणं गरजेचं आहे. घराशी संबंधित विविध गोष्टी जसे की, नवीन वस्तू खरेदी, घरातले काही बदल, नातेवाइकांशी संबंध यासारख्या विषयांबाबत त्यांची मतं जाणून घ्यावीत हे सर्व या सुसंवादातून कळू शकतं.
थोडक्यात, एका छताखाली स्वतंत्रपणा जपत एकत्र राहून व सुसंवाद साधत मुळे घट्ट ठेवली तर दोन्ही कुटुंबसंस्थांचा सुवर्णमध्य साधला जाईल. त्यामुळे मुलांना वेगळी खोली विशिष्ट वयापासून आवश्यक असली तरी त्यापेक्षा कुटुंब व्यवस्था टिकवणं, ‘घरपण’ टिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे!

attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
rishi kapoor was scared of raj kapoor
वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय