पूर्वी एखाद्या बादलीत पाणी साठवून ठेवले जात असे आणि गरजेनुसार त्याचा वापर केला जात असे. परंतु साधारणपणे १९व्या शतकात या टॅपचा वापर अधिक सुरू झाला आणि त्यामुळे हवं तेव्हा, हवं तेवढं पाणी वापरण्याची ती जणू सोयच निर्माण झाली. मग वापर टॉयलेटसाठी असो, बाथरूमसाठी असो अथवा किचनमध्ये युटेन्सिल्स वॉश करण्यासाठी असो, टॅप हवाच. पाण्याचा नळ हवाच अन्यथा काम होतच नाही आणि समाधान तर अजिबात होत नाही.
या टॅप बसवण्याची पूर्वीची जागा म्हणजे घराच्या बाहेर आणि तेदेखील रस्त्याच्या कडेला खाली खोल खड्डय़ात. त्यामुळे पाणी भरून घेण्यासाठी खोल खड्डय़ात उतरून जाण्याशिवाय पर्याय नसे. हल्लीच्या या आधुनिकतेच्या काळात हवे तसे, हव्या त्या उंचीवर टॅप्स बसवले जाऊ शकतात.
सुरुवातीला चावीच्या पाण्याच्या नळांचा वापर होत होता. असे नळ विशेषत: सार्वजनिक ठिकाणी सर्वासाठी म्हणूनच बसविलेले असत. नंतर नंतर त्याचा गैरवापर टाळण्यासाठी कुलपाच्या नळाची सुविधा उपलब्ध
हळूहळू १९व्या शतकापासून घरातील लहानमोठी मालमत्ता ही पर्सनलाइज्ड होऊ लागल्या. असं जरी असलं तरी ज्या ठिकाणी चाळ किंवा वाडासंस्कृती टिकून आहे त्या ठिकाणी आजही ‘सार्वजनिक नळ’ ही संकल्पना राबविली जाते.
इंटिरिअर डिझाइनिंगच्या दृष्टीने घरातल्या प्रत्येक बारीकसारीक वस्तूंची निवड करताना नेहमीच काहीतरी वेगळेपणा आणला पाहिजे. टॉयलेटमधल्या टॅपची गोष्ट, त्याचा एवढा काय विचार करायचाय? टॅप कसा
आपल्या घरातील इंटिरिअरसाठी निवडलेल्या प्रत्येक वस्तूत, त्या वस्तूच्या डिझाइनमध्ये, रंगामध्ये, साइज व शेपमध्ये वेगळेपण असलंच पाहिजे. मग अगदी तो टॉयलेटमधील टॅप असला तरीही.
या वॉटर टॅपमध्ये त्यांच्या वापरानुसार, आकारानुसार, त्या टॅपच्या बसविलेल्या जागेनुसार मटेरियलनुसार निरनिराळे प्रकार पडतात. या वॉटर टॅपमध्ये बाथरूम, टॉयलेट, किचन सिंक, टेरेस अथवा ड्राय बाल्कनी इत्यादी ठिकाणी बसविले जाणारे वॉटर टॅप्स ‘बिब कॉक’ या नावाने ओळखले जातात, तर वॉश बेसिनसाठी वापरल्या जाणाऱ्या वॉटर टॅप्सना ‘पिल्लर कॉक’ म्हटले जाते.
बाथरूममध्ये हॉट आणि कोल्ड वॉटर टॅपची सोय करावी लागते. काही वेळा तशी सोय विशेषत: तेलकट भांडी स्वच्छ धुण्यासाठी किचन सिंकमध्ये करणे योग्य ठरते. या ठिकाणी गार पाण्यासोबत गरम पाण्याची सुविधा करणे आवश्यक ठरते. याव्यतिरिक्त इतर सर्वत्र केवळ गार पाण्याच्या टॅपची सोय पुरेशी असते.
प्रत्येक कामासाठी आणि प्रत्येक ठिकाणी बसविलेले कॉक्स निरनिराळय़ा मटेरिअलमध्ये उपलब्ध असतात. यात प्लॅस्टिक, मेटल, ब्रास, ब्रासवर सिल्व्हर प्लेटिंग तसेच ब्रासवर गोल्डन प्लेटिंग अशा अनेक प्रकारच्या कॉक्सची निर्मिती होत असते.
अनेकदा नवीन वस्तूंचा स्वीकार करताना आपण कचरतो. सर्वप्रथम त्याची किंमत, वस्तूचा दर्जा, तिचा टिकाऊपणा, गरज, आपलं बजेट अशा अनेक गोष्टींच्या प्रश्नांमुळे, तर काही शंकांमुळे आपण अनेक नावीन्यपूर्ण वस्तूंचा स्वीकार करत नाहीत. त्या वस्तूंमध्ये दडलेलं सौंदर्य आपल्या अंत:चक्षूला दिसत नाही.
पाण्याचा पुरवठा करणारे वॉटर स्टोअरेज टँक्स, त्यापासून पाण्याचे वितरण-पुरवठा करण्यासाठी वापरले जाणारे पाइप प्लॅस्टिक किंवा मेटल यापैकी कोणतेही असले तरी वॉटर टॅप बसविण्याची पद्धत मात्र एकच असते. कोणत्याही प्रकारचा कॉक पाइप्सना बसवता येतो. सर्वसाधारणपणे १/२’’ म्हणजे १५ मि.मी. व्यासाचा पाइप पाण्याच्या घरगुती वापराच्या पुरवठय़ासाठी निवडला जातो. या आकारमानाच्या पाइपमुळे पाण्याला मिळणाऱ्या प्रेशरमुळे टॅपमधून बाहेर फेकले जाणारे पाणी अतिशय फोर्सने येऊ शकते. पाण्याचा
हल्ली मेटलमधील पावडर कोटेड वॉटर टॅप्सची फार मोठी रेंज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आपल्याला हव्या त्या कलरचा वॉटर टॅप आपण निवडू शकतो, की जो आपल्या इतर डिझाइनला व कलर स्कीमला परफेक्ट मॅच होईल. यात विशेषत: टाइल्सची कलर्स स्कीम, वॉश बेसिनचा कलर इत्यादीचा मॅच होणाऱ्या रंगाचा टॅप निवडता व बसविता येतो. यात अधिक तर मोतीया कलर, ब्लॅक, बरगेंडी असा ठराविक शेड्सना पसंती असते. यातही काही टॅप्सन गोल्डन अथवा सिल्व्हर कलर्समध्ये टॅप्सच्या नॉबला रिंग लावलेली असते. या प्रकारचे टॅप्स फारच रीच, डिसेंट दिसतात.
या निरनिराळय़ा टॅप्ससोबत त्याच्या अॅक्सेसरीजदेखील डिझाइनिंगच्या दृष्टीने म्हणजेच त्याच्या निवडीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात. हल्ली बहुतेक सर्वच ठिकाणी कन्सिल्ड कनेक्शन्सच्या साहाय्याने वॉटर सप्लाय केला जातो. यासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅक्सेसरीज या सर्वसाधारण अॅक्सेसरीजपेक्षा वेगळय़ा असतात. त्याचबरोबर टॅप्स बसवताना याचा प्राधान्याने विचार होणे गरजेचे असते.
अलीकडच्या काही वर्षांपासून सिल्व्हर आणि गोल्ड प्लेटेड वॉटर टॅप्स वापरले जाऊ लागले आहेत. या टॅप्सच्या मूळ डिझाइनमध्ये फारसा फरक नसतो. ब्रासमध्ये तयार केल्या जाणाऱ्या टॅप्सवर सिल्व्हर आणि गोल्डन प्लेटिंग केले जाते. साधारणपणे २०,००० रुपये अधिक किमतीच्या या प्लेटेड टॅप्सना अॅनोडायझिंग करावे लागते. जेणेकरून हवामानातील बदलाचा त्याच्या कोटिंगवर कोणताही परिणाम होत नाही. गोल्ड प्लेटेड टॅप्समध्ये सर्वसाधारणपणे १८ कॅरेट सोन्याचा वापर प्लेटिंग करण्यासाठी केला जातो.
इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल मार्केटमध्ये हल्ली अनेक वस्तूंचा वापर किंवा त्या वस्तूच्या मेकॅनिझमच्या ऑपरेशन्ससाठी रिमोट कंट्रोल वापरला जातो. वॉटर टॅप्समध्येदेखील रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने ऑपरेट होणारे विविध प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत. याचप्रमाणे वॉटर टॅप्सची ऑपरेशन्स सेंसरचा वापर करूनदेखील करता येऊ शकतात. यात रिमोट कंट्रोलवर तसेच सेंसरवर ऑन आणि ऑफ होणारे किंवा वापरले जाणारे पाण्याचे टॅप्स पाण्याच्या बचतीच्या दृष्टीने फारच उपयोगाचे ठरतात. त्यांच्या साहाय्याने केवळ गरजेपुरताच पाण्याचा वापर होऊ शकतो.
अगदी अलीकडे बाजारात उपलब्ध झालेल्या वॉटर टॅप्स बसविण्यासाठी तर ग्लास तसेच अॅक्रेलिकचा वापर वॉटर डिस्पेन्सर म्हणून केला गेला आहे. यातदेखील लाँग बॉडी, शॉर्ट बॉडी, फ्लेमिंगो नेक, पिल्लर टाइप अशा अनेक प्रकारचे कॉक्स उपलब्ध असतात.
या अनेकविध टॅप्सची निर्मिती अधिकतर दिल्ली व परिसर या ठिकाणी होते. दिल्लीच्या खालोखाल हरयाणा व उत्तर प्रदेश या ठिकाणी सर्व प्रकारच्या टॅप्सची निर्मिती व विक्री मोठय़ा प्रमाणावर होते.
या सर्व कॉक्सच्या बाबतीत त्यांची पसंती, निवड व वापर हे सर्व नेमकेपणानं होणे आवश्यक असतं. त्यासाठी कोठे कोणता टॅप वापरावा? हे लक्षात घेतलं पाहिजे.
पावडर कोटेड टॅप्स- या प्रकारचे टॅप्स तसे खरंतर सर्वच ठिकाणी वापरता येऊ शकतात. किचन सिंकसाठी हॉट अॅन्ड कोल्ड वॉटर मिक्सर टॅप आणि शकतो. लाँग बॉडी बिब-कॉक वापरणं जास्त योग्य ठरतं. किचन सिंकच्या बाऊलच्या आकारानुसार त्याच्या आऊटलेट वेस्ट कपलिंगच्या लोकेशनप्रमाणे कॉकचं लोकेशन ठरवावं लागतं. याचा पर्याय म्हणून क्रोमियम प्लेटेड कॉक्सदेखील वापरता येऊ शकतात. तसेच बाथरूममध्ये मीडियम बॉडी व टॉयलेटमध्ये शॉर्ट बॉडी कॉक्स वापरावेत. वॉश बेसिनवर मात्र जास्त करून पिल्लर कॉकचीच सोय करावी लागते.
प्लॅस्टिक टॅप्स- अलीकडे प्लॅस्टिक टॅप्सचा फारसा वापर होताना दिसत नाही. तरीदेखील टेरेसवर, गार्डनमध्ये, घराबाहेर कार वॉशकरिता प्लॅस्टिक टॅप्स वापरता येऊ शकतात. या टॅप्सच्या उपयोगाच्या मानाने किंमत अगदीच नगण्य असते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फार काही विचार करण्याची आवश्यकता नसते.
मेटल टॅप्स- मेटल टॅप्स हे प्लॅस्टिक टॅप्सना पर्याय म्हणता येऊ शकतील. तुलनेने प्लॅस्टिक टॅप्सपेक्षा मेटल टॅप्स नेहमीच टिकाऊ व मजबूत असतात. त्या दृष्टीने प्लॅस्टिक टॅप्स फारच तकलादू असतात.
ब्रास टॅप्स- सर्वाधिक पसंतीचे, सुबक, सुंदर, टिकाऊ व मजबूत आणि किमतीच्या बाबतीत सर्वाना परवडतील असे ब्रास टॅप्स सर्वाधिक काळ वापरात आहेत. यांचा वापर सर्वत्र करता येतो.
ब्रास टॅप्स वीथ सिल्व्हर व गोल्ड प्लेटिंग- यांच्या नावावरूनच किमतीची कल्पना आपल्याला येऊ शकते. परंतु, तरीदेखील वॉश बेसिन तसेच बाथरूम या दोन्ही ठिकाणी या टॅप्सचा वापर करून एक निश्चित असे वेगळेपण आपल्या इंटिरिअरमध्ये आणता येऊ शकतं. या टॅप्सचा वापर शक्यतो किचनमध्ये टाळावा.
ब्रास टॅप्स-पावडर कोटेड वीथ ग्लास व अॅक्रेलिक- अशा प्रकारचे टॅप्स फॅन्सी आयटममध्ये आणले जातात. त्यामुळे त्याचा वापर शक्यतो वॉश बेसिनवरच करावा. यात वापरलेली ग्लास किंवा अॅक्रेलिक वॉटर डिस्पेन्सर म्हणून वापरले जाते. यात वेगवेगळय़ा रंगांच्या ग्लास किंवा अक्रेलिकला वापर केल्यावर त्यातून बाहेर पडणारे पाणी त्या ठिकाणी काही वेळापुरते रंगीत असल्याचा भास होतो.
आपल्या घराचं इंटिरिअर करताना अगदी टॅप्ससारख्या छोटय़ा वस्तूंचादेखील विचार करणे महत्त्वाचे असते. बाजारात येणाऱ्या नवनवीन वस्तूचा वापर करून आणि तेसुद्धा पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करून जर काम केलं तर त्यापासून मिळणारा आनंद हा सर्वात मोठा व दीर्घकाळ टिकणारा असणार आहे.
(लेखक महावीर इन्स्टिटय़ूटचे प्राचार्य आहेत)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा