सणासुदीला घर सुरेख सजलेलं असेल तर आनंदात आणखीच भर पडते. त्यातही जर गुढीपाडव्यासारखा सण असेल तर घराला नवी, ताजी झळाळी ही द्यायलाच हवी. साडेतीन शुभ मुहूर्तापकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या या शुभ दिनी घर मस्त सजवून नववर्षांची सुरेख सुरुवात करा..   
चैत्राची नवी पालवी फुटू लागली की वेध लागतात ते आपल्या नववर्षांरंभाचे अर्थात गुढीपाडव्याचे! चत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा सण आपण सर्वच मोठय़ा आनंदाने, उत्साहाने साजरा करतो. दाराला छान, टपोऱ्या केशरी गोंडय़ांचं तोरण लावतो, हॉलच्या बाल्कनीत छोटीशी का होईना पण गुढी उभारतो आणि आप्त, मित्रमंडळींच्या सान्निध्यात सुग्रास जेवणाच्या संगतीने नववर्षांची सुरेख सुरुवात करतो. मग अशा या मंगलदिनी आपलं घरसुद्धा खास मस्त सजलेलं हवं, नाही का? मात्र, घर सजवण्यासाठी खूप काही करण्याची गरज नाही. बाजारात एक फेरफटका मारलात आणि आपल्या चाणाक्ष नजरेने वस्तू बरोबर हेरल्या की अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात आपल्या घराला आपण वेगळा लुक देऊ शकतो.
कोणताही सण असो किंवा शुभ कार्य असो फुलांशिवाय त्याला पूर्णत्व नाही. गुढीपाडव्याला आपण ताज्या, रसरशीत गोंडय़ांच्या फुलांचं तोरण बांधतोच. पण याबरोबरच इतर ताज्या फुलांनीसुद्धा घर सजवता येतं. आज बाजारात फुलदाण्यांमध्ये वैविध्य आहे. सिरॅमिक, टेराकोटा, लाकूड यांपासून बनवलेल्या फुलदाण्या आता सर्रास कोणत्याही गिफ्ट शॉप्समध्ये, मॉल्स, शिल्प प्रदर्शन यातून पाहायला मिळतात. ताजी फुलं ठेवायची असतील तर सिरॅमिक, टेराकोटापासून बनवलेल्या फुलदाण्या उपयुक्त ठरतील. ताजी फुलं नको असतील तर ताज्या फुलांसारखीच दिसणारी, मन मोहून घेणारी प्लॅस्टिक, क्रेप पेपर, सॅटिन कापडापासून बनलेली फुलं, फुलांच्या लांब कांडय़ा सजावटीसाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकतील. बाजारात अशी फुलं लाकूडांपासून बनवलेल्या फुलदाण्यांबरोबरच विक्रीला असतात. त्यामुळे तुम्हाला जास्त शोधाशोध करावी लागत नाही. फुलदाणीत ताजी किंवा कृत्रिम कोणतीही फुलं ठेवायची नसल्यास हरकत नाही. एखादी आवडीची फुलदाणी घेऊन ती नुसतीच हॉलमध्ये शो पीस म्हणून ठेवता येईल. कृत्रिम फुलांच्या यादीत फुलदाणीत ठेवायच्या फुलांबरोबरच छोटय़ा फुलझाडांच्या प्लॅस्टिकच्या कुंडय़ांचीही वर्णी लागते. अशी एखादी कुंडी तुम्ही सेंटर टेबलवर ठेवू शकता. सेंटर टेबलवर ठेवण्यासाठी काचेचं तबक, त्यात पाणी टाकून ठेवलेली ताजी फुलं हा पर्यायसुद्धा आहेच. इथे तुम्ही काचेच्या ऐवजी मेटलचं, जर्मन सिल्व्हर मटेरिअलमधलं तबकसुद्धा वापरू शकता. ब्राँझ, जर्मन सिल्व्हर मटेरिअलमधल्या शोभेच्या वस्तू तर आहेतच. शिल्प प्रदर्शनातून यामध्ये निवडीला भरपूर वाव असतो. जर्मन सिल्व्हरमध्येही खूप शोभेच्या वस्तू पाहायला मिळतात. जसं की, तबक, िलबू-मिरची, ढाल तलवार, तोरण वगरे.
घराचा दर्शनी भाग म्हणजे अर्थातच हॉल आणि या हॉलचं आकर्षण असतं ते म्हणजे इथे ठेवलेल्या शोभेच्या वस्तू. या गुढीपाडव्याला तुम्हाला तुमच्या वॉल युनिटमध्ये हटके वस्तू ठेवायच्या असतील तर काचेच्या किंवा क्रिस्टलच्या अप्रतिम शोभेच्या वस्तूंची बाजारात रेलचेल आहे. राजहंस जोडी, अन्य पक्ष्यांची जोडी, डािन्सग कपल, घोडागाडी याबरोबरच देवतांच्या मूर्त्यांसुद्धा यामध्ये बघायला मिळतात. हे थोडंसं महागडं काम असलं तरी दिसायला मात्र एकदम झक्कास आहे. हॉलचा एखादा भाग, कोपरा किंवा वॉल युनिट अधिक आकर्षक करायचं असेल तर यातली एखादी वस्तू तरी या ठिकाणी स्थानापन्न करायचं.
याशिवाय पडदे, कुशन्स यात वैविध्य आणून तुम्ही घराचा कायापालट करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसात पडदे घेताना ते शक्यतो फिक्क्या रंगांमधले, नजरेला सुखावह होतील असे घ्यावेत. जेणेकरून उन्हाची तीव्रता घरात जाणवणार नाही.
र्दीज्, कारपेट्स हा सजावटीतला हुकमी एक्का आहे. त्याला विसरून चालणारच नाही. आकाराने छोटय़ा र्दीज् हॉलच्या मध्यभागी बठकीच्या समोर मांडता येईल. काही मॉल्समध्ये र्दीज्, कारपेट्स अगदी वाजवी किमतीत मिळतात. बरं या वस्तू अशा आहेत की ज्या तुम्हाला नेहमी वापरायच्या नसल्या तर खास समारंभाला वापरू शकता. म्हणजे सजावटीतलं नावीन्य तुम्हाला टिकवता येतं.
या सर्व शोभेच्या वस्तू खिशाला भली मोठी कात्री लावणाऱ्या नसल्याने त्यांचा वापर करून घराला सौंदर्यपूर्ण वेगळेपणा निश्चितच देता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा