गौरी प्रधान

खूप वर्षांपूर्वी टॉम हँक्सचा ‘बिग’ नावाचा एक सिनेमा पाहण्यात आला होता. ही कथा आहे एका छोटय़ाशा मुलाची. स्वत:च्या लहानपणाला कंटाळलेला एक छोटा मुलगा एके दिवशी जत्रेतल्या राक्षसाकडून मोठं होण्याचं वरदान मागून घेतो. क्षणिक रागाच्या भरात मागितलेलं हे वरदान दुसऱ्या दिवशी खरंच प्रत्यक्षात येतं, मग मात्र या छोटय़ाची भलतीच भंबेरी उडते. या सगळ्यातून सुटका व्हावी म्हणून तो न्यूयॉर्कला पळ काढतो. आता तो शरीराने एक तरुण, पण मनाने आणि डोक्याने एक लहानगा असं होऊन बसतं. इथे त्याला पोटापाण्यासाठी काम शोधावं लागतं, त्याच्या नशिबाने त्याला एका खेळणी बनवणाऱ्या कंपनीत नोकरी मिळते. खरी गंमत इथून पुढे सुरू होते. तिथे कार्यरत असणारे सर्व डिझाइनर्स हे वयाने मोठे असतात आणि लहान मुलांसाठी खेळणी त्यांच्या दृष्टिकोनातून बनवत असतात. परंतु आपला हिरो मात्र वयाने मुळातच लहान असल्यामुळे तो त्याच्या वयात त्याला आवडतात तशी खेळणी डिझाइन करतो. याचा परिणाम म्हणून त्याने डिझाइन केलेल्या खेळण्यांना सर्वात जास्त मागणी येते. पुढे कंपनी त्याला राहण्यासाठी एक घरदेखील देते. हा पठ्ठय़ा मात्र त्या घरातील सगळ्या भिंती पाडून त्याचं एका भल्या मोठय़ा मदानात रूपांतर करतो.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Comprehensive sanitation campaign begins in slums in Thane
ठाण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीमेला सुरूवात
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
additional commissioner of pcmc on Fire At Unauthorized Scrap Shops
पिंपरी-चिंचवड: “अनधिकृत गोदामांवर नंतर बोलू आधी आग विझवू”, अतिरिक्त आयुक्तांची अनधिकृत गोदामांना बगल!
transparency in voting
मारकडवाडीसह सर्व ठिकाणी ईव्हीएम मतदानात पारदर्शकता, जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे स्पष्टीकरण

हा सिनेमा पाहून खूप वर्ष लोटली; परंतु माझ्यातल्या इंटेरियर डिझाइनरने मात्र त्यातील गरजेच्या गोष्टी तेवढय़ा पक्क्या लक्षात ठेवल्या ज्यांचा उपयोग मला, विशेषत: लहान मुलांच्या खोलीचे डिझाइन करताना नेहमीच होतो. बरेचदा लहान मुलांच्या खोलीचे डिझाइन करताना त्यांना फारच गृहीत धरले जाते. लहान मुलांना वैचित्र्यपूर्ण गोष्टी आवडतात म्हणून सर्रास त्यांच्या खोलीत कार्टून्स किंवा चित्रविचित्र आकारांचे फर्निचर यांची रेलचेल केली जाते. माझं मत मात्र याबाबत थोडं वेगळं आहे.

जसं मोठय़ा माणसांना स्वत:चं असं व्यक्तिमत्त्व असतं, तसंच ते लहान मुलांनाही असतं. म्हणूनच लहान मुलांच्या खोलीतील फर्निचर डिझाइन करताना केवळ चित्रविचित्र आकार आणि भडक रंग यांना प्राधान्य न देता, जे मूल ती खोली वापरणार आहे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करून खोली सजवली पाहिजे. शिवाय मुलाची खोली आहे म्हणून अमुक एक रंग मुलीची खोली आहे मग तमुकच रंग अशा बंधनांमध्येदेखील मुलांना अडकवणं टाळलं पाहिजे.

मुलांसाठी खोली डिझाइन करताना त्यांचा वयोगट आणि आवडी यांचा मेळ साधणे फारच महत्त्वाचे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे, मुलांचं वाढतं वय आणि त्यानुसार शरीरात होणारे बदल. मुलांचं शरीर व मन हे झपाटय़ानं वाढणारं असतं, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा सतत बदलत्या असतात. यासाठी मुलांचे पाच वर्षे ते बारा वर्षे आणि आणि बारा वर्षे ते पुढे सोळा-सतरा वर्षे असे ढोबळमानाने दोन वयोगट बनवल्यास त्यांची खोली डिझाइन करणे थोडेसे सोपे जाईल.

लहानग्यांच्या खोलीमध्ये कमीतकमी फर्निचर आणि जास्तीतजास्त मोकळी जागा हे समीकरण नेहमी पक्कं असलं पाहिजे.

पाच वर्षे ते बारा वर्षे वयोगटासाठी तर त्यांची खोली हे दुसरं मदानच असायला हवं. या वयोगटातील मुले सर्वात जास्त चंचल, धडपडी असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी फर्निचर डिझाइन करताना फर्निचरला कुठेही टोकदार कानेकोपरे राहणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. फर्निचरमध्ये काचेचा वापर, खोलीत लोंबणाऱ्या दिव्यांचा वापर शक्यतो टाळावा. लहान मुले म्हटली की ती उडय़ादेखील मारणारच. मग हे लक्षात घेऊन फर्निचर दणकटही बनवले पाहिजे. खोलीतील फर्निचर आटोपशीर बनवतानाच ते सगळ्या गरजादेखील पूर्ण करणारे असले पाहिजे. या छोटय़ा मुलांना बंक बेडसारख्या फर्निचरची आवड असते, त्यामुळे त्यांच्या बेडरूममध्ये बंक बेड द्यायला काहीच हरकत नाही. शिवाय बंक बेडमुळे जागादेखील वाचते. यांच्यासाठी वॉर्डरोब डिझाइन करताना त्यांना त्यांच्या हाताने वस्तू काढता- ठेवता येतील अशा प्रकारे डिझाइन केल्यास त्यांना आनंद मिळू शकतो. या वयात मुलांना रेघोटय़ा मारणे, फर्निचरवर स्टिकर चिकटवणे हे उद्योगदेखील फारच प्रिय असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून फर्निचरसाठी लॅमिनेट निवडावे- जे पटकन किंवा कालांतराने स्वच्छ करता येईल. मुलांच्या खोलीत शक्यतो विनियर किंवा महागडे लाकूड वापरू नये.

आता विचार करू थोडय़ा मोठय़ा दादा-ताईंचा. बारा ते सतरा वयातील ही मुले धड ना मोठी, धड ना लहान अशी काहीशी असतात. म्हणूनच यांची खोली सजवताना विशेष काळजी घ्यावी लागते. राजा-राणी, पऱ्यांच्या दुनियेतून नुकतीच बाहेर पडलेल्या या मुलांच्या गरजा वेगळ्या असतात. यांच्या खोलीतील फर्निचरमध्ये बिन बॅग, गेमिंग चेअर यांचा अंतर्भाव केल्यास हे खूश होतात. खोली सुटसुटीत आणि मोकळी मात्र हवीच. खोलीचे आकारमान पाहून खोलीत एखाद्या भिंतीवर बास्केट बॉलची बास्केट लावू शकतो किंवा एखाद्या भिंतीवर क्रिकेटचे स्टंप चितारू शकतो. हल्ली युनिसेक्सचा जमाना असल्याने खोलीला मुलांची किंवा खास मुलींची असे दर्शवणारी सजावट नसेल तर बरे. त्यातूनही वापरणाऱ्यांची आवड महत्त्वाची, कारण या वयात मुलांची समजक्षमता भलतीच वाढलेली असते. शिवाय चालू ट्रेंड्सदेखील त्यांना व्यवस्थित माहीत असतात. त्यामुळे त्यांचा सल्ला न घेता काहीच करू नये हे उत्तम.

किशोरवयीन मुलांसाठी फर्निचर निवडताना ते ट्रेंडी असावे व त्यात निरनिराळ्या गॅझेट्सचा वापरदेखील असावा. उदा. वॉर्डरोबमध्ये वॉर्डरोब लिफ्ट्स, बेल्ट होल्डर, पॅन्ट हँगर तसेच फोल्डेबल बेड- जो सहजपणे भिंतीवर उभा राहील आणि खोली रिकामी दिसेल. या मुलांसाठी फर्निचर करताना शक्य असल्यास लूज फर्निचरचा पर्याय निवडावा. कारण एक तर ती झपाटय़ाने मोठी होत असतात ज्यामुळे त्यांच्या या आवडी फार काळ टिकणाऱ्या नसतात. चतुर इंटेरियर डिझाइनर नेहमीच या मुलांसाठी अशी खोली डिझाइन करतात की थोडय़ा काळानंतर, जेव्हा यांना इंटेरियर बदलावेसे वाटते तेव्हा फक्त फर्निचरमध्ये थोडेफार बदल करूनच खोलीला कमी पशात वेगळे बनवता येईल.

मुलांची खोली म्हटली की आई-वडिलांची एक प्रमुख इच्छा असते ती म्हणजे त्यांच्या खोलीतील स्टडी टेबलची. बरेच वेळा याच्या जोडीला मग पुस्तकांचे कपाटही येते. हे बनवून घेण्यात वाईट काहीच नाही, पण तरीही या गोष्टींचा अट्टहास नसावा. खोलीत किती जागा आहे याचा विचार करूनच स्टडी टेबल बनवायचे की नाही हे ठरवावे. पुस्तकांचे कपाट हे पुस्तकांची संख्या पाहून बनवल्यास उत्तम.

शेवटी काही महत्त्वाचे. खोली जरी लहान मुलांची असली तरी तिची सजावट मात्र बालिश नसावी. मुलांना स्वत:चे व्यक्तिमत्त्व असते आणि विचारशक्तीही आणि त्यांच्या खोलीच्या सजावटीमधून तेच डोकावले तर बरे. मुले ही काही कायम लहान राहणार नसतात, त्यामुळे त्यांच्या खोलीतील फर्निचर बनवताना केवळ पालक म्हणून मोठय़ांनीच तात्कालिक फॅन्टसीच्या नादाला लागून पशांचा अपव्यय करण्याऐवजी प्रॅक्टिकल इंटिरियर करण्यावर भर द्यावा, तरच मुले केलेल्या इंटेरियरचा भरभरून उपभोग घेऊ शकतील.

(इंटिरियर डिझायनर)

pradhaninteriorsllp@gmail.com

Story img Loader