दिवाणखान्यास हॉल, लििव्हगरूम अथवा बाहेरची खोली असेही म्हणतात. ही जागा मित्रमंडळी, औपचारिक कामानिमित्त येणाऱ्या व्यक्तींसाठी असली तरी घरातील सर्व लोकांचा येथे सतत वावर असतोच. वास्तूच्या या भागात प्रशस्त सोफा, शोकेस, खुच्र्या, सेंटर टॉप, टीव्ही आणि अनेक वेळा जेवणाचे टेबलही असते आणि सोबत एखादी खिडकी किंवा बाल्कनीसुद्धा. घर सजावटकार त्यांच्या सर्व कौशल्यांचा आविष्कार या ठिकाणीच जास्त दाखवत असतात. दिवाणखान्यात घरातील सदस्य आणि आपली मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याव्यतिरिक्त
दिवाणखान्यामधील त्यांचे अस्तित्व त्या खोलीस फक्त जिवंतपणा देत नाही तर सौंदर्याचा आस्वाद घेण्यासही शिकवते. हरित मित्रांचे येथे असणे हे जागेच्या आकाराबरोबरच तेथे असलेला उजेड, रंगसंगती, घरातील लोकांची आवड-निवड यावरसुद्धा अवलंबून असते. येथे वनस्पतींची संख्या मर्यादित हवी. पाने मोठी, शोभिवंत, सहसा न फाटणारी, चमकदार हवीत. पानावर पाण्याचा लहान फवारा उडवून त्यांना स्वच्छ पुसण्याचा छंद अनेकांना असतो तो याचमुळे. शक्यतो कमी वाढ असणाऱ्या वनस्पती निवडाव्या. मुंबई आणि परिसरातील मोठमोठय़ा मॉलमधील गार्डन शॉपमध्ये दिवाणखान्यास योग्य असलेल्या वनस्पतींची रेलचेल असते. येथून खरेदी केलेल्या शोभिवंत कुंडय़ांबरोबरच नक्षीदार बाटलीमधील मनी प्लॅन्ट, एखादी हंडीबाग (टेरॅरियम), डिशगार्डन, एक-दोन पाम्स, वामनवृक्ष यांची दिवाणखान्यात सुंदर निसर्गशाळाच भरवता येऊ शकते. अशा या छान निसर्गशाळा पाश्चात्त्य राष्ट्रांत घरोघरी पाहावयास मिळतात. तांब्यातील पसरट भांडय़ातील पाण्यामध्ये पसरलेल्या गुलाबाच्या पाकळ्या या निसर्गशाळेत आगळावेगळा रंग भरतात. अंतर्गत सजावट करणाऱ्या तज्ज्ञास तुमची वृक्ष आवड सांगितली तर तो तशी जागा सजावटीमध्ये खास राखून ठेवेल.
दिवाणखान्यातील कुंडय़ांना पाणी मोजकेच लागते. ग्लासमधील उरलेले पाणी टाकून न देता त्यांना दिले तर त्यांची तहान तर भागतेच, सोबत पाण्याचीही बचत होते. कुंडय़ा मोजक्याच पण आकर्षक, नक्षीकाम केलेल्या असतील तर उठावदार दिसतात. त्यांच्या मध्ये पसरलेली पांढरीशुभ्र वाळू अथवा रंगीत खडे, मार्बलचे लहान-मोठे गोटे दिवाणखानाला छान शोभा देतात. हॉलला जोडून मोठी खिडकी असेल तर छानशी खिडकी बागसुद्धा तयार करता येते. सकाळ-संध्याकाळ उन्हाची तिरीप येत असेल तर हिवाळ्यामध्ये छान फुलणाऱ्या छोटय़ा कुंडीतील नाजूक वनस्पती दिवाणखान्यास वाटिकेचे रूप देतात. कुंडय़ांची निवड योग्य केली तर कीटक-डास यांचा उपद्रव होत नाही. मात्र सुरक्षितता म्हणून आतील ओलसर पृष्ठभागावर कोरडा लाकडी भुसा टाकावा. घरातील व्यक्तींना कुठल्या तरी चांगल्या निमित्ताने मिळालेले पुष्पगुच्छ योग्य ठिकाणी ठेवले तर त्याचे सौंदर्य दोन-तीन दिवस सहज टिकू शकते, त्याचबरोबर त्या कार्यक्रमाच्या स्मृतीसुद्धा.
दिवाणखान्यातील एखाददुसरा पाळीव प्राणी, फिश टँक, सोबत पाच-सहा शोभिवंत कुंडय़ा आणि या सर्वावर नितांत प्रेम करणारी घरातील माणसे यांचे एकत्रित असणे हीच घरी जैवविविधता आणि या सर्वामध्ये केव्हातरी चिमणाचिमणीचे गॅलरीतून अकस्मात आत येणे मन सुखावून टाकणारे असते. जीवशास्त्रज्ञ डार्वनि नेहमी सांगत असत, ‘माझे घर हीच माझी प्रयोगशाळा’ आणि हे अशा दिवाणखान्यांसाठी तंतोतंत योग्य ठरते.
दिवाणखान्यातील वनस्पतींच्या कुंडय़ा या ऊर्जास्रोताबरोबरच प्राणवायूचे भांडारसुद्धा असतात. हॉलमधील उत्साहवर्धक वातावरण त्यामुळे कायम राहण्यास मदत होते. जपानमधील एका प्रयोगात वनस्पती असलेल्या आणि नसलेल्या दिवाणखान्याचा तौलनिक अभ्यास केल्यावर असे आढळले की, जिथे अशा कुंडय़ा आहेत तेथे घरातील मुले जास्त रमतात आणि मन लावून अभ्याससुद्धा करतात.
दिवाणखान्यात मित्रमंडळी, पाहुणे, यांच्या चच्रेमधे इंद्रधनुष्याचे रंग भरण्यात यांचा सहभाग असतोच. त्याचबरोबर एकटय़ा जीवास साथसंगतसुद्धा. या मित्रांना प्रेम आणि सन्मान द्या, त्यांच्या सहवासात सकाळच्या गरम वाफाळलेल्या चहाचे घोट घेताना तुम्हास जाणवेल की कपात फक्त वादळ नसून खळखळता निस्सीम आनंदसुद्धा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा