लीकडे लाकडी दरवाजे खिडक्यांऐवजी Polyvinyl Chloride (पीव्हीसी)चे दरवाजे आणि खिडक्या बाजारात उपलब्ध आहेत. विविध रंग टेक्श्चर्स (पोत) आणि फिनीशमध्ये हे दरवाजे उपलब्ध आहेत. ते पूर्णपणे वॉटरप्रूफ असल्यामुळे पाणी लागून खराब होत नाहीत. लाकडासारखी याला वाळवी लागत नाही किंवा यावर बुरशीही येत नाही. ते वजनाने कमी असतात. त्यामुळे त्यांची ने-आण करणं तसंच हाताळणी करणं सोप जातं, ते लाकडी दरवाजांपेक्षा कमी वेळात बसवले जातात. ते ओल्या कापडाने फुसून स्वच्छ करता येतात.

मात्र, त्यांचे काही तोटेही आहेत. लाकडी दरवाजांच्या तुलनेत ते अधिक उठावदार दिसत नाहीत. तसंच त्यांची ताकद तुलनेनं कमी असते. उच्च तापमानात ते वेडेवाकडे होऊ शकतात. लाकडी दरवाजांप्रमाणे ते दुरुस्त करायला सोपे नाहीत. कारण तुलनेनं ताकद कमी असल्यामुळे दुरुस्त करताना मोठं नुकसान झालं, तर थेट नवीन बसवावे लागतात.

वॉटरप्रूफ असल्यामुळे बाथरूम किंवा टॉयलेटच्या दरवाजांसाठी तर वापरले जातातच, परंतु घरातल्या इतर दरवाजांसाठीही वापरता येऊ शकतात. ताकद कमी असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ते मुख्य दरवाजासाठी योग्य नव्हेत. मात्र, दुरुस्ती आणि देखभालीची कमी आवश्यकता आणि लाकडी दरवाजांच्या तुलनेत किमतीने कमी असल्यामुळे त्या लाकडी दरवाजांऐवजी ते एक चांगला पर्याय ठरू शकतात. 

vasturang@expressindia.com