दिवाळी आणि दीप यांचं अतूट नातं.. त्यामुळे दिवाळीत दारात दीप तेवत ठेवण्यालाही खूप महत्त्व आहे. एक छोटासा तेवत राहणारा दिवा सारं वतावरण मंगलमय करून टाकतो. यंदा दिवाळीसाठी बाजारात विविध प्रकारचे दिवे आले आहेत, त्याविषयी..
दीपावली.. मांगल्याचा, आनंदाचा सण! अंध:काराला नष्ट करून सर्वत्र चतन्यदायी आशेचा प्रकाश पसरविणारा सण! दिवाळी म्हणजे उत्साह, आनंद, चविष्ट फराळ, नानाविध नवीन वस्तू, प्रेमाच्या भेटी, नवीन कपडे, फटाके आणि अर्थातच पणत्यांचा तेजोमयी प्रकाश! कारण छोटय़ाशा, नाजुकशा पणत्यांशिवाय हा सण पूर्ण होऊच शकत नाही.
दसऱ्याचे सीमोल्लंघन झालं की बाजारात असंख्य पणत्यांच्या राशीच्या राशी विक्रीसाठी सज्ज होतात. गेल्या काही वर्षांमध्ये पणत्यांचं पारंपरिक रूपडं खूपच आधुनिक, ट्रेण्डी झालंय. पणत्यांचा साजिरा बाज कायम ठेवत त्यांना अधिकाधिक ‘डिझायनर’ करण्यात आलंय. आजही त्यांना असलेली मागणी, त्यांची आवड तिळमात्रही कमी झालेली नाही. म्हणूनच अतिशय छोटीशी असणारी ही वस्तू दरवर्षी आíथक उलाढालही तितक्याच ठसक्यात करत असते.
या वर्षीसुद्धा पणत्यांमध्ये भरपूर वैविध्य पाहायला मिळतंय. यामध्ये पारंपरिक आकारांतील पणत्यांबरोबरच कुयरी, पान, हत्ती, मोर, तुळशी वृंदावन, फुलं, कमळ अशा वेगवेगळ्या आकारातल्या सुरेख पणत्या, दीपमाळ, हँिगग दिवा असे प्रकारसुद्धा लक्ष वेधून घेत आहेत. या पारंपरिक पणत्या, दीपमाळ, दिवे हे साध्या लाल मातीपासून (पाण्याचा माठ ज्या मातीपासून बनवतात ती माती) तयार केले जातात. पण या पणत्यांबरोबरच alt चिनी माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, टेराकोटा यांपासून बनवलेल्या पणत्यासुद्धा आहेतच. त्यांना नाना रंगांनी, ढंगांनी सजवलेलं आहे. यासाठी मोती, रंगीबेरंगी खडे, मणी, जरदोसी, चंदेरी, सोनेरी लेस यांचा वापर करण्यात आलाय. काही पणत्यांना तर शेिडग करण्यात आलंय. तर काही पणत्यांच्या खोलगट भागाच्या मध्यभागी सुरेख रंगाचा खडा बसवून त्यावर चमचम प्रिंकल केलेली आहे.
फ्लोटिंग दिया म्हणजेच पाण्यावरचे दिवे हे या वर्षीसुद्धा स्वत:ची मागणी टिकवून आहेत. मेणाच्या या पणत्या तबकातील पाण्यात सोडून छान सजावट करता येते. मेणाच्या पणत्यांचेही वेगवेगळे आकार, प्रकार आहेत. आकाराने अतिशय लहान असलेली रंगीत मडकी (पोटली), चौकोनी, गोलाकार आकारांच्या मेणाच्या पणत्या यांनाही स्त्रीवर्गामध्ये विशेष पसंती आहे. मेणाच्या पणत्या गेल्या काही वर्षांमध्ये खूपच लोकप्रिय झाल्यायेत, कारण या बराच वेळ तेवत राहतात. तेलाच्या पणत्यांमध्ये सारखं तेल सोडत राहावं लागतं. इतकं लक्ष या मेणाच्या पणत्यांकडे द्यावं लागत नाही. सुंदर रांगोळीच्या बाजूला मेण असलेली रंगीत मडकी ठेवली तर खूप छान दिसतात. मातीच्या पणत्यांमधून तेल गळतं, त्यामुळे रांगोळीवर, जमिनीवर तेलाचे डाग पडतात. तसा प्रकार, टेराकोटा, चिनी मातीच्या, मेणाच्या पणत्यांच्या बाबतीत होत नाही. हेही एक कारण या पसंतीमागे आहे.
या डिझायनर पणत्यांमध्ये या वेळी प्लेट दिया हा एक नवा प्रकार आला आहे. म्हणजे छान मोठय़ा आकाराच्या गोलाकार ताटलीवर छोटय़ा छोटय़ा पणत्यांची सुरेख मांडणी केलेली आहे. ही आगळीवेगळी पणतीसुद्धा सुरेख दिसते. त्याबरोबरच साध्या मातीपासून बनवलेल्या हँिगग पणत्यासुद्धा alt आहेतच. घराच्या मुख्य दाराबाहेर किंवा गॅलरीत ही हँिगग पणती लावता येईल.
या अतिशय सुरेख, कलात्मक पणत्या बघून तुम्हालाही तुमच्यातल्या सृजनशीलतेला वाव द्यावा, असं वाटत असेल तर तुम्हीसुद्धा अशा पणत्या घरी स्वत: तयार करू शकता. आवडीच्या आकारातील लाल मातीच्या पणत्या आणून त्यावर प्रायमर लावावे. प्रायमरनंतर ऑइलपेंटचा थर द्यावा. हा रंग पक्का झाल्यावर मग फेव्हिकॉलच्या साहाय्याने वेगवेगळ्या मण्यांनी, मोती, खडय़ांनी पणती सजवावी. तसंच फेव्हिक्रीलमध्ये वेगवेगळे रंग, स्पार्कल रंग मिळतात. त्यानेसुद्धा पणत्या सजवता येतात.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव! तो पणत्या लावूनच पूर्ण होतो. छोटीशी का होईना, पण दारासमोर पणती तेवत असेल तर ती संपूर्ण वातावरण मंगलमय करते, इतकी ताकद तिच्या त्या शांत, प्रसन्नमयी ज्योतीत आहे. म्हणूनच पणती कोणतीही असो मांगल्याचा दीप सतत उजळत राहो!

Shocking video of Kidnapping where a man saved girls life video viral on social media
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! त्याने तिला जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवलं अन्…, अपहरणाचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Emotional video Due to high rates of ambulance father took son from his bike viral video
कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये! पैसे नव्हते म्हणून मुलाला स्ट्रेचरवरून उचललं अन्…, पाहा काळजाला भिडणारा VIDEO
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Story img Loader