भारत हा ‘उत्सव’प्रधान देश आहे. वर्षभर काही ना काही उत्सव चालूच असतात. गौरी-गणपतीची धामधूम कमी होईस्तोवर नवरात्र-दिवाळीची गडबड चालू होते. मोठय़ा कल्पकतेने गणपतीची आरास केली जाते, घर सजवले जाते. बाप्पाचे विसर्जन करून थोडे दिवस जातात न् जातात तोवर नवरात्र सुरू होते. परत अंगात उत्साह संचारतो. पण आता गणपतीबाप्पाचीच आरास परत वापरायला नको वाटते. प्रत्येक सण वेगळा, त्याचे उद्दिष्ट वेगळे मग त्यानुसार केलेली गृहसजावट वेगळी का नको? म्हणून या लेखाच्या निमित्ताने नवरात्र दसऱ्याला काही वेगळी सजावट करता येईल का ते बघूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, देवी ही ऊर्जा, शक्ती व स्फूर्तीचे प्रतीक आहे. आपण हा सण साजरा करतो वाईटाचा नाश आणि चांगल्याची सुरुवात करण्यासाठी. त्यामुळे आपल्यात जी ऊर्जा, स्फूर्ती, उत्साह व आनंद तयार होतो तो सजावटीमधूनसुद्धा प्रकट होणे जरुरी आहे. त्यासाठी जी सजावट करू त्यामध्ये रंग आणि संगतीला फार महत्त्व आहे. केशरी, पिवळा व लाल ज्याला आपण warm colours  म्हणतो असे रंग नवरात्रीमध्ये वापरावेत. हे रंग वापरण्यामागे शास्त्रीय कारण आहे. या रंगांच्या तरंग लांबीमुळे (wavelength) आपल्या शरीरात जे हार्मोन्स तयार होतात त्याने आपल्याला उत्साही व आनंदी वाटते. पण केवळ नवरात्रीसाठी म्हणून घराचे रंगकाम काढणे व भिंतींना रंग देणे शक्य नाही. पण वेगवेगळ्या मार्गानी आपण ही रंगसंगती साधू शकतो. खास नवरात्रीचे म्हणून या रंगांचे पडदे, कुशन कव्हर्स, चादरी, फुलदाणी / शोभेची मडकी वापरायला काढावी. दिवाणखान्यातील फर्निचरची रचनाही जरा हलवावी. त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळी रचना व वेगळी रंगसंगती मनाला आनंद देऊन जाईल.

दसऱ्याची सजावट म्हणजे प्रामुख्याने झेंडूच्या फुलांच्या माळा. वर्षांनुवर्षे यात काहीच फरक पडत नाही. अशा वेळी ज्या जागेत आपण देवीची मूर्ती ठेवणार आहोत त्या जागी मागे भिंतीवर कायमचा एक रॉड किंवा पॅनलिंग करून ठेवू शकतो. त्या रॉडवर आपण दरवर्षी वेगवेगळा रंगीत कपडा किंवा वापरात नसलेली जरीची साडी बांधल्यास संपूर्ण सजावटीलाच खूप उठाव येईल. त्याचप्रमाणे एकच वॉलपेपरचा रोल लागेल अशा साइजचे पॅनलिंग केल्यास दर वर्षी तेवढाच वॉलपेपर बदलणे काही कठीण नाही. यामुळे प्रत्येक वर्षी आपल्याला सजावटीमध्ये विविधता आणता येईल.

रांगोळी हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. रांगोळीने वातावरण प्रसन्न होते. पण बरेच वेळा जागेच्या कमतरतेमुळे आणि पुसून जाण्याच्या भीतीपोटी आपण रांगोळी काढायचे टाळतो. तसेच पुसली गेल्यावर होणारा पसारा हा वेगळाच. त्यासाठी उपाय म्हणून छोटय़ा छोटय़ा काचेच्या बाऊलमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या रांगोळ्या भरून त्यात एखादे फूल किंवा देवीची छोटीशी मूर्ती ठेवू शकतो. हे बाउल्स आपण मधल्या किंवा बाजूच्या टीपॉयवरही ठेवल्यास छान दिसतात.
शाळेमधून मुलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कुंडीत धान्य पेरायला सांगतात व दसऱ्याच्या दिवशी त्या कुंडीत उगवलेल्या धान्याची पूजा करायला सांगतात. किती सुंदर आहे ही गोष्ट! या मागचा उद्देश म्हणजे या दिवसातच नवीन धान्य येते. त्याचे स्वागत करायच्या या पद्धतीमुळे मुलांना नकळत अन्नाचा आदर करायची शिकवण मिळते. रांगोळीतील एक प्रकार म्हणजे ही वेगवेगळी कडधान्ये /धान्ये घेऊन केलेली रांगोळी. या धान्यांमध्ये किती तरी वेगवेगळे आकार व रंग असल्यामुळे यापासून केलेली रांगोळी खूप सुंदर दिसते. एका मोठय़ा थाळीत किंवा ट्रेमध्ये आपण धान्याची रांगोळी काढू शकतो. ही थाळी किंवा ट्रे मूर्ती पुढे ठेवल्यास दरवेळी आपोआप मूर्तीला पूजताना ही धान्येपण पुजली जातील.

या सर्व गोष्टींबरोबर दगडाच्या, पितळेच्या वस्तू, घंटा, नक्षीकाम केलेले मातीचे, लाकडाचे दिवे, समया या सर्वामुळे वातावरणात प्रसन्नता भरून राहील. त्याचबरोबर जागोजागी कल्पकतेने ठेवलेली फुले आपल्याला आनंद तर देतीलच, पण घराचे पावित्र्यही जपतील. अशा रीतीने दसऱ्याच्या निमित्ताने केलेली गृहसजावट आपल्या खूप दिवस लक्षात राहील. ल्ल ल्ल
वैशाली आर्चिक – archik6@gmail.com