आज प्रत्येक क्षेत्रात बाजारपेठ काबीज करण्यासाठी नवनवीन युक्त्यांचा वापर केला जात आहे. यात दिसून येणारा समान घटक म्हणजे लहान मुलांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. अगदी खाद्यपदार्थापासून ते कपडय़ांपर्यंत आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून ते घरापर्यंत प्रत्येक बाबतीत मुलांना महत्त्व दिले जाते. त्यांना आकर्षति करून घेतले जाते. मग ती व्यक्ती गरीब असो की अतिश्रीमंत. आपल्या मुलांना हवे ते देण्याची तळमळ सर्वामध्येच असते. याचेच प्रतिबिंब आजच्या बांधकाम क्षेत्रातही पडलेले दिसून येते. ‘सनटेक रिअल्टी लिमिटेड’च्या वतीने सनटेक सिटी हा गृहनिर्माण प्रकल्प याचेच उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल.
या गृहप्रकल्पात जागतिक दर्जाच्या सुविधा आपल्या ग्राहकांना देतानाच खास मुलांकरता डिस्नीतील पात्रांचा समावेश केला आहे.
सहा ते अकरा या वयोगटातील मुले संपूर्ण जगाकडे नावीन्यपूर्ण नजरेने पाहात असतात. मुलांचं भावविश्व समृद्ध करण्यासाठी या गृहप्रकल्पात अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत. मुलांमधील जिज्ञासेला चालना देण्याच्या कामात मुलांची सजवलेली खोली तुम्हाला साथ देऊ शकेल. थोडय़ा मोठय़ा मुलांमध्ये दोन्ही वयोगटांचे मिश्रण आढळून येते. लहान मुलांप्रमाणे अजूनही त्यांना खेळण्यासाठी जागा हवी असते, पण मोठय़ा मुलांप्रमाणे त्यांना अभ्यासही पूर्ण करायचा असतो. आकर्षक आकाराचे डेस्क, आरामदायी खुर्ची आणि टिकाऊ सामान यामुळे तुमच्या घरातील लहान आणि मोठय़ा दोन्ही वयोगटातील मुलांचे समाधान होऊ शकेल.
जेव्हा खोली सजवण्याची वेळ येते तेव्हा मोठी मुले आपल्या मनाप्रमाणे ती सजवू शकतात. खोली सजवण्यात तुमचे मूल जितका रस घेईल तितक्या प्रमाणात ते आपल्या खोलीची काळजी घेईल आणि ती सजावट टिकवण्यास मदत करेल. या वयातील मुलांमध्ये विविध प्रकारचे छंद आढळून येतात. स्वत:चे कौशल्य वापरून ते आपले व्यक्तिमत्त्व घडवण्याचा यातूनच प्रयत्न करेल. कारण त्याला जे सांगायचे असते, म्हणायचे असते त्यासाठी त्याला हक्काचे व्यासपीठ या खोलीच्या माध्यमातून मिळते. आणि तुम्हाला वाटते तितकी ही बाब कठीण नाही. एका कलाप्रेमी मुलीला आपल्या खोलीकरता एक किंवा दोन रंग निवडणे कठीण वाटत होते, पण तिला इंद्रधनुष्यामधून हवा तो आंनद मिळाला. तुमच्या मुलाच्या आवडीप्रमाणे त्याच्या रूममध्ये तुम्ही रंग निवडू शकता.
तुमच्या छोटय़ाचे उद्दिष्ट परीकथेतील राजकन्या किंवा सुपरहीरो होण्याचे असेल, तर त्यांना त्याकरता प्रेरित करण्यासाठी विशिष्ट जागेची गरज लागेल. त्यामुळे त्यांच्याकरिता अशा विशेष जागा तयार करताना उपलब्ध काही पर्यायांमधून एक निवडण्यात तुमचे कौशल्य पणाला लागते. तुमच्या मुलाकरिता संकल्पना निश्चित करताना त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व त्यातून प्रतित होते हे प्रामुख्याने लक्षात घ्यावे लागेल. उदाहरणार्थ जर तुमच्या लहानग्याला संगीत आवडत असेल तर तुम्हाला त्याच्या खोलीत संगीताशी संबंधित संकल्पना राबवावी लागेल. कारण शेवटी लहानग्यासाठी बनवलेल्या खोलीत तोच सर्वात अधिक वेळ राहणार असतो. मुलाचा बेड हाही या संपूर्ण संकल्पनेतील प्रमुख घटक आहे. मुलाच्या मनातील संकल्पनेनुसार तुम्ही त्याची रचना करू शकता. या संपूर्ण प्रक्रियेत पालक आपल्या मुलांसमवेत त्यांच्या कल्पनेतील जग प्रत्यक्षात आणू पाहतात. याकरता तुमच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जेव्हा तुमचे मूल याचा
वापर करेल तेव्हा तुम्हाला होणारा आनंद अर्वणनीय असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different world