आपल्या सर्वाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या आणि आपल्या मूलभूत गरजा असणाऱ्या तीन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे अन्न, वस्त्र व निवारा. पण आता आधुनिक जगात अजून एका गोष्टीचा यात समावेश केला पाहिजे व ती म्हणजे ऊर्जा! येथे ऊर्जा म्हणजे वीज अथवा इंधन होय.
आपला देश सध्या अतिशय वेगाने प्रगती करतो आहे. निरनिराळे उत्पादक उद्योग जसे रसायन, खते, सिमेंट, वाहन, अभियांत्रिकी, कापड, अन्न इ. तसेच सेवा क्षेत्र जसे माहिती व तंत्रज्ञान, घर बांधणी, शेती, इ. त्याचप्रमाणे मोठे मोठे मॉल्स, व्यापारी संकुले, हॉटेल्स, सिनेमागृहे यांसारख्या सर्वच क्षेत्रात आपण अगदी जोमदार प्रगती करीत आहोत.
हे सर्व करत असताना सर्वाधिक गरज असते ती ऊर्जेची, पर्यायाने विजेची वा इंधनाची!
इंधन मग ते वाहनासाठी असो, कारखान्यांमध्ये उत्पादनांसाठी असो वा स्वयंपाक घरामध्ये अन्न शिजविण्यासाठी असो, सगळीकडे त्याची मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याने एकतर त्याची कमतरता भासते किंवा त्याची किंमतही सतत वाढत जात असल्याने ती न परवडणारी असते.
त्याचप्रमाणे वीज- मग ती एखाद्या झोपडीमध्ये चमचमणारी असेल अथवा एखादा महाल उजळवून टाकणारी असेल. एखाद्या लहानशा दुकानाला पुरणारी असेल, नाही तर एखाद्या भव्य मॉलमध्ये डोळे दिपवून टाकणारी असेल- सर्वाना ती आवश्यकच!
जसजसे आपले राष्ट्र प्रगती करीत राहील व आपली आधुनिकतेकडे जास्तीत जास्त ओढ राहील तसतशी इंधनाची व विजेची मागणी ही वाढतच राहील आणि तिचा तुटवडादेखील वाढतच जाईल. आपल्या देशाचे व राज्याचे सरकार पुरेशी वीजनिर्मिती करण्यासाठी व नियमित वीजपुरवठा करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेच, पण सततच्या वाढत्या मागणीमुळे व बदलत्या निसर्गचक्रामुळे त्यालाही काही मर्यादा पडतात. त्याबरोबरच, अशा बदलत्या निसर्गचक्रामुळे वा अन्य कारणांमुळे पुरेसा पाऊस, तोही वेळेत पडत नसल्यामुळे पाणीटंचाईचे संकटही आपणा सर्वावर कमी जास्त प्रमाणात घोंघावत असते. अशा परिस्थितीमध्ये सर्व
वर उल्लेख केल्याप्रमाणे नसर्गिक ऊर्जास्रोत म्हणजेच सूर्य, वारा, जल, जैविक/सेंद्रिय पदार्थ इ. पासून मिळणारी ऊर्जा योग्य प्रकारे वापरण्यासाठी कोणत्या साधनांचा उपयोग करता येतो ते पाहू.
अ) सूर्य अथवा सौरऊर्जा- आपल्या देशाच्या बहुतेक भागात वर्षांकाठी जवळपास १० ते ११ महिने स्वछ सूर्यप्रकाश मिळतो. ही सौरऊर्जा वापरण्याचे साधारणत: दोन प्रकार आहेत. पहिला थर्मल किंवा हिटिंग म्हणजे पाणी तापविणे, त्याची वाफ करून ती वापरात आणणे, अन्न शिजविणे इ. व दुसरा फोटोव्होल्ताइक म्हणजे वीज निर्मिती करणे.
ब) वायू- सतत वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग पवनचक्कीद्वारे वीजनिर्मिती करण्यासाठी केला जातो. आपणा सर्वाना भल्याथोरल्या पवनचक्क्या माहिती असतीलच. पण अगदी लहान प्रमाणात घरगुती वापरासाठी वीजनिर्मिती करणाऱ्या पवनचक्क्यादेखील बाजारात उपलब्ध आहेत.
क) सेंद्रिय पदार्थापासून मिळणारा जैविक वायू. हा फक्त शेणापासूनच मिळविता येतो असे नसून त्याची निर्मिती वेग वेगळ्या जैविक पदार्थापासून करून तो स्वयंपाकासाठी इंधन किंवा वीजनिर्मिती अथवा वाहनांसाठी इंधन म्हणूनही वापरता येतो.
ड) जल- सुरुवातीस नमूद केल्याप्रमाणे, सध्याच्या पाणीटंचाईच्या, दुष्काळाच्या काळामध्ये पाण्यापासून वीज/इंधन निर्मितीपेक्षा त्याची जास्तीत जास्त बचत, साठवणूक व पुनर्वापर करण्यावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी रेन वाटर हार्वेिस्टग, वॉटर रिसायकिलग असे प्रकार उपलब्ध आहेत.
याशिवाय वीज बचतीस अत्यंत साहाय्यकारक पण त्याच वेळेस जास्त प्रकाश देणारे एलईडी दिवे वापरून आपण वीज बचत करू शकतोच, पण आपले वीज बिलदेखील कमी करू शकतो!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा