ग्रीष्माची काहिली आता चांगलीच जाणवू लागलीये. इतकी की, घरात असतानासुद्धा बाहेरच्या रणरणत्या उन्हाचा रखरखाट चटके देतोय. त्यामुळेच की काय घरातली सुखद सजावटही दृष्टीस बोचरी वाटतेय. घरात जाणवणारी उन्हाची ही बोचरी तीव्रता कमी करण्यासाठी सजावटीत थोडे फेरफार केले तर घराची सजावट ग्रीष्मातही अधिक प्रसन्नदायी करता येते.
घरात काही छोटे-मोठे बदल करून उन्हाळ्यातही आपलं घर रिफ्रेश, आकर्षक, प्रफुल्लित ठेवणं सहज जमू शकतं. अर्थात यासाठी संपूर्ण घराचा चेहरामोहरा बदलण्याची किंवा भिंतींना सौम्य रंगात रंगवण्याचीही गरज नाही. काही छोटे छोटे बदल तितकेच परिणामकारक ठरू शकतात. घराच्या बठकीच्या खोलीपासून अर्थात लििव्हग रूम/हॉलपासून सुरुवात करू. जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी व्यतित होतो. नातलग, मित्रमंडळी, पाहुणे अशा अनेकांची आपल्याबरोबरच इथे ऊठबस असते. म्हणूनच ही खोली पाहता क्षणी प्रसन्न वाटली पाहिजे. मुख्य म्हणजे उन्हाची तीव्रता इथे जाणवता कामा नये. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पडदे, कुशन कव्हर्स यांच्यात बदल करा. सौम्य रंगाचे, पेस्टल शेड्सची यासाठी निवड चांगली ठरू शकते. खोलीच्या िभतींचा मूळ रंग, फíनचरचा लुक, त्याचं पॉलििशग यांच्याशी मेळ साधणारे पडदे किंवा कुशन्स असावेत. पडदे घेताना ते शक्यतो सुती घ्यावेत. सिल्कचे पडदे घ्यायचेच असल्यास ते लाइट शेड्समधले असावेत. तीच गोष्ट कुशन्सची. उन्हाळा तर दरवर्षी येतो, पण म्हणून आपण नेहमी नेहमी संपूर्ण इंटीरिअर बदलून घेऊ शकत नाही. यासाठीच अशा छोटय़ा छोटय़ा बदलांतून वेगळेपणा जपता येतो. यात पडदे, कुशन्स, इतर सजावटीच्या वस्तू महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
या दिवसांत घराला नसर्गिक लुक देण्यासाठी ताजी फुलं, घरात ठेवता येण्यासारखी झाडं यांनीसुद्धा
घर सजवून एक जिवंतपणा निर्माण करता येतो.
फुलं, झाडं यामुळे खोलीला नॅचरल लुक तर मिळतोच पण डोळ्यांनाही ते सुखावह असतं. फुलांसाठी फ्लॉवर पॉट निवडताना तो चांगल्या प्रतीचा व सौम्य रंगातला घ्यावा. सिरॅमिक पॉट्स घेताना ते लाइट शेड्समधले असावेत.
घरात ठेवता येण्यासारखी झाडं हीदेखील शक्यतो नर्सरीतून घ्यावीत. कमी ऊन, कमी पाणी लागणारी झाडं निवडावीत. तसेच खूप मोठय़ा उंचीची झाडं घेऊ नयेत. कारण खोलीचं आकारमान कसं आहे त्यावर ते अवलंबून आहे. हॉल मोठा असेल तर तिथल्या सेंटर टेबल किंवा साइड टेबलवर काचेचं पसरट भांडं ठेवून त्यात पाणी घालून, त्यात ताजी फुलं ठेवा. या भांडय़ाच्या बाजूने पेबल्स म्हणजेच गारगोटय़ा (बाजारात सजावटीसाठी लागणाऱ्या छोटय़ा आकारातील गारगोटय़ा सहज उपलब्ध आहेत) ठेवाव्यात. पेबल्समुळे डोळ्याला एक नसर्गिक थंडावा मिळतो. हीच रचना तुम्ही बेडरूमच्या साइड टेबलवर पण करू शकता.
उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी नॅचरल स्टोन्सचा वापर हा एक चांगला पर्याय आहे. म्हणून संपूर्ण घराचं इंटीरिअर करताना या गोष्टीचा विचार करावा. म्हणजे तुमचं घर एकदम टॉप फ्लोअरवर असेल, तिथे उन्हाची तीव्रता जास्त जाणवत असेल तर संपूर्ण इंटीरिअर करते वेळी आपण फ्लोअिरगला नॅचरल स्टोन्सचा वापर करू शकतो. जसे की मार्बल, ग्रॅनाईट, शहाबाद फरशी वगरे. या गोष्टी कायमस्वरूपी राहाणाऱ्या आहेत. ज्या तुम्ही सुरुवातीसच आपल्या घराला अधिक सजविण्यासाठी करून घेऊ शकता. याबरोबरच फॉल्स सीिलग करून घेताना थर्मोकॉलचा वापर करता येतो हे मागच्या लेखात सांगितले आहेच. घरातली प्रकाशयोजनासुद्धा उन्हाची तीव्रता कमी करण्यास सहाय्यभूत ठरू शकते. प्रकाशयोजना ही सौम्य रंगात असावी. लाल, नारंगी, भडक रंगातली प्रकाशयोजना टाळावी.
अशा छोटय़ा छोटय़ा बदलांतून ज्या सहज शक्य आहेत आणि जास्त खíचकही नाहीत, अशा गोष्टींचा उपयोग करून घराला उन्हाळ्यातही जास्त आरामदायी, प्रसन्न करता येतं.
२ंल्ल४ि६िं‘िं१@ॠें्र’.ूे

Story img Loader