अलीकडेच कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स या बहुमजली इमारतीच्या १५व्या मजल्यावरील सदनिकेत आग लागली. कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन विभाग हा आग लागलेल्या इमारतीपासून अगदीच जवळ आहे. मात्र बहुमजली इमारतीमधील अग्निशमनाकरता आवश्यक उंच शिडी असलेली त्या केंद्रातीला गाडी नादुरुस्त असल्याने इतरत्र असलेल्या गाड्या मागवण्यात वेळ गेला. परिणामी वेळेत अग्निशमनाचे काम सुरू होऊ शकले नाही. हा जो वेळ वाया गेला त्याची शब्दश: आणि अक्षरश: झळ वरच्या मजल्यांवरील सदनिकांना लागली आणि त्यांचेही खूप नुकसान झाले. या घटनेमुळे पुढील प्रश्न उपस्थित झाले. इमारतीत स्वत:ची अग्निसुरक्षा यंत्रणा नव्हती का? इमारतीची अग्निसुरक्षा यंत्रणा सुरू नव्हती का? अग्निशमन विभागाने गाजावाजा करून आणलेल्या गाड्या का आणि केव्हापासून बंद आहेत? ऐनवेळेस उपयोगी पडणार नसतील तर त्या गाड्यांचा काय उपयोग? अग्निशमन विभागाच्या या कामचुकारपणाची चौकशी आणि जबाबदार व्यक्तींना शासन होणार की नाही? अग्निशमन विभाग कामचुकार ठरणार असेल तर बांधकामांकरता अग्निशमन विभागाची ना हरकत वगैरे नाटकं बंद करावी का? असे अनेकानेक प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांना समर्पक उत्तरे मिळतील किंवा नाही, अर्थात न मिळण्याचीच शक्यता अधिक गृहीत धरायला हवी.

तूर्तास ही दुर्दैवी घटना आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीतून आपण सर्वांनी विशेषत: उंच आणि बहुमजली इमारतीमधील रहिवाशांनी धडा घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यायला हवे की शासकीय अग्निशमन विभाग आपल्या मदतीला येईल या भरवशावर आपण आता राहू शकत नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेसारख्या मोठ्या संस्थेच्या अग्निशमन कार्यालयापासून जवळच्याच ठिकाणी अग्निशमन विभाग पोहोचू शकला नाही हे लक्षात घेता, शासकीय अग्निशमन यंत्रणेवर कोणालाही फार विसंबून राहता येणार नाही हे जळजळीत असले तरी वास्तव आहे; आणि आपल्या सुरक्षित भविष्याकरता आपण ते स्वीकारलेच पाहिजे.

pink powder on los angeles
लॉस एंजेलिसमध्ये आग विझवण्यासाठी ‘पिंक पावडर’चा वापर कसा केला? पर्यावरणासाठी हे किती घातक?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Navi Mumbai, Fire broke out, scrap godown,
नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 
fire company Pimpri-Chinchwad, fire Pimpri-Chinchwad,
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट
thane fire breaks out in laundry shop
ठाण्यात मदत यंत्रणेच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना, इमारतमधील लॉन्ड्री दुकानात आग लागल्याने सर्वत्र पसरला होता धूर
Shegaon taluka , Nandura taluka , hair fall ,
भय तिथले संपत नाही… केसगळती, टक्कल साथीचा शेजारी तालुक्यातही शिरकाव; रुग्णसंख्या दीडशेच्या घरात
mumbai fire brigade
मुंबई : अग्निशमन दलाच्या ताफ्यात ६८ मीटर उंच शिडी वाहने दाखल होणार
Los Angeles Wildfire Video : लॉस एंजेलिसच्या वणव्यात हजारो लोक बेघर, २८८ कोटींचा बंगला जळतानाचा Video Viral

अग्निसुरक्षेच्या बाबतीत शासकीय यंत्रणेवर भिस्त ठेवायची सोय नाही म्हणजे आता आपल्यालाच त्यात लक्ष घालणे आले. कारण आपल्याला आपल्या जबाबदारीपासून पळ काढणे शक्य नाही. आजही बहुसंख्य इमारतींमध्ये त्यातही विशेषत: जुन्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेची कोणतीही यंत्रणा अस्तित्वातच नाही या वास्तवाकडे आता डोळेझाक करता येणार नाही. अशा सर्वच इमारतींनी या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेऊन आपल्या इमारतीकरता आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. ज्या इमारतींच्या परवानगीकरता अग्निशमन ना हरकत आवश्यक होती आणि त्याप्रमाणे अग्निसुरक्षा योजना केलेली आहे अशा इमारतींपैकीसुद्धा बहुतांश इमारतींची अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यक्षम नसण्याची दाट शक्यता आहे. अशा सगळ्या इमारतींनीसुद्धा दर ठरावीक काळाने आपली अग्निसुरक्षा यंत्रणा सुरू आहे ना? याची तपासणी आणि चाचणी वेळोवेळी केली पाहिजे; जेणेकरून आणीबाणीच्या वेळेस बाहेरच्या मदतीवर विसंबून न राहता किंवा ती मदत पोहोचेपर्यंत आपल्याला थोडेफार तरी काही तरी बचावात्मक कार्य करता येईल.

प्रत्येक इमारतीत काही घरे कायमची किंवा काही काळाकरता बंदच असतात. कायमची बंद असणाऱ्या घरात काही विद्याुत उपकरणे किंवा गॅस वगैरे असायची शक्यता कमी आणि त्यामुळे अपघाताचा धोकादेखील तुलनेने कमी. मात्र जेव्हा एरवी राहती असलेली घरे सर्व सदस्य बाहेर गेल्याने काही काळाकरता बंद असतात, तेव्हा त्यातील गॅस आणि विद्याुत उपकरणांच्या बाबतीत अपघाताची शक्यता असते. हे लक्षात घेता जेव्हा सदस्य काही काळाकरता बाहेर जाणार असतील तेव्हा जाताना घरातील गॅस आणि सर्व मुख्य विद्याुत उपकरणे बंद करून, प्लगमधून त्याची पिन काढून गेल्यास शॉर्टसर्किट वगैरे अपघाताची शक्यता कमी करता येऊ शकते. तसेच सर्वच सदस्य जाणार असतील तर अपघात किंवा आणीबाणीच्या वेळेस त्या घरात जाता यावे म्हणून त्याची किल्ली शेजारीपाजारी किंवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे ठेवून जाणे श्रेयस्कर ठरेल.

● tanmayketkar@gmail.com

Story img Loader