अलीकडेच कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स या बहुमजली इमारतीच्या १५व्या मजल्यावरील सदनिकेत आग लागली. कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन विभाग हा आग लागलेल्या इमारतीपासून अगदीच जवळ आहे. मात्र बहुमजली इमारतीमधील अग्निशमनाकरता आवश्यक उंच शिडी असलेली त्या केंद्रातीला गाडी नादुरुस्त असल्याने इतरत्र असलेल्या गाड्या मागवण्यात वेळ गेला. परिणामी वेळेत अग्निशमनाचे काम सुरू होऊ शकले नाही. हा जो वेळ वाया गेला त्याची शब्दश: आणि अक्षरश: झळ वरच्या मजल्यांवरील सदनिकांना लागली आणि त्यांचेही खूप नुकसान झाले. या घटनेमुळे पुढील प्रश्न उपस्थित झाले. इमारतीत स्वत:ची अग्निसुरक्षा यंत्रणा नव्हती का? इमारतीची अग्निसुरक्षा यंत्रणा सुरू नव्हती का? अग्निशमन विभागाने गाजावाजा करून आणलेल्या गाड्या का आणि केव्हापासून बंद आहेत? ऐनवेळेस उपयोगी पडणार नसतील तर त्या गाड्यांचा काय उपयोग? अग्निशमन विभागाच्या या कामचुकारपणाची चौकशी आणि जबाबदार व्यक्तींना शासन होणार की नाही? अग्निशमन विभाग कामचुकार ठरणार असेल तर बांधकामांकरता अग्निशमन विभागाची ना हरकत वगैरे नाटकं बंद करावी का? असे अनेकानेक प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांना समर्पक उत्तरे मिळतील किंवा नाही, अर्थात न मिळण्याचीच शक्यता अधिक गृहीत धरायला हवी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा