सुचित्रा साठे
गणेशाचे आगमन परवावर येऊन ठेपतं. उद्या हरितालिकेची पूजा म्हणून हरितालिकांच्या मूर्ती आणल्या जातात. छोटय़ांपासून सांभाळण्यासाठी त्यांनाही सुरक्षित जागी ठेवले जाते. कापसाची वस्त्रं, विडय़ाची पानं, सुपाऱ्या, नारळ, हळद-कुंकू, गंध, अक्षता, अत्तर, फुलं, फळं, उदबत्ती, निरांजन या सगळ्यांनी पुजेचे चांदीचे ताट कसे खुलून येते. पत्री तोडण्याच्या निमित्ताने छोटय़ांची झाडांची पानं तोडायची हौस भागवली जाते.
भाऊ-बहिणीच्या नात्यातला गोडवा नारळीभातात उतरतो आणि अर्धा श्रावण संपून जातो. उरलेल्या दिवसांवर भाद्रपदाची म्हणजे विघ्नहर्त्यां गजाननाची छाया पसरलेली असते. काही घरांतून त्याचा मुक्काम दीड दिवसच असतो, पण मनामनांत मात्र त्याच्या येण्याचे पडघम वाजायला लागलेले असतात. गणपती आणण्याचं ठिकाण, त्याचा आकार, उंची याबाबत प्रत्येक घराचा नियम ठरलेला असतो. त्यानुसार गणपती ‘बुकिंग’ होऊन उत्सवाचा शुभारंभ होतो. गणपतीची पूजा अगदी पहाटे चारलाही नको आणि अकरा वाजताही नको. कारण अकराचे बारा वाजायला वेळ लागत नाही, अशी प्रत्येक गृहिणीची इच्छा असते. त्यामुळे गुरुजी आठ-नऊ वाजता येतो म्हणाले की तिची कळी मनोमन खुलते.
घरातल्यांच्या उत्सवी सहयोगाने साफसफाईला मुहूर्त सापडतो आणि घराचा चेहरामोहरा उजळून निघतो. गणपतीचं वास्तव्य, त्याची खास व्यवस्था विचारात घेत घराच्या अंतर्गत सजावटीमध्ये थोडासा बदल केला जातो. प्रत्येक खोलीतील कपाटाच्या अंतरंगात आवराआवर करून एखाद् दोन कप्पे किंवा खण रिकामे ठेवावे लागतात. गृहस्वामिनीचा दूरदर्शीपणा त्यातून डोकावत असतो.
गर्दी टाळून वेळ वाचवण्यासाठी बँकेत जाऊन लॉकरमधील दागदागिने, चांदीची भांडी, पूजेची भांडी आणण्याचे काम निवांतपणे उरकले की गृहिणीला हायसे वाटते. वेळ मिळेल तशी ती सर्व भांडी चकचकीत होऊन मिरवायला तयार होतात. कपडय़ांचे व्यवस्थापन हे एक मोठे काम गृहिणीला करावे आणि करून घ्यावे लागते.
हरतालिकेपासून गौरी-गणपती विसर्जनापर्यंत प्रत्येक दिवस हा वैशिष्टय़पूर्ण असतो. सगळ्या जरीच्या साडय़ा, भारी कपडे कपाटातून बाहेर येण्यास टपलेल्या असतात. साडय़ा, खरे खोटे दागिने केव्हा, काय घालायचं याचा हिशेब बरोबर जुळवून ठेवावा लागतो, म्हणजे आयत्या वेळचा गोंधळ, पसारा वाचतो. याबाबतीत फक्त स्वत:पुरता विचार करून चालत नाही, तर घरातल्या सगळ्यांकडे गृहिणीला जातीने लक्ष घालावे लागते. त्यानुसार खरेदी करून ठेवावी लागते.
काहींच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन नसतं तर त्यांनाच आजी-आजोबा, काका-काकू किंवा जवळच्या नातेवाईकांकडे खास गणपतीसाठी जायचे असते. त्यांना आगाऊ रिझव्र्हेशन करण्याबरोबरच ‘बॅगा’ भरण्याचे काम असते. काहींना गावी जायचं नसतं, पण गणपती दर्शनासाठी अनेक घरी हजेरी लावायची असते. सार्वजनिक गणपती सजावट बघायची असते. एकूण एकंदरीत कपडेपटाचे नियोजन फार महत्त्वाचे असते.
हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला की मात्र घरात सतत गणपतीचाच विषय, विचार सुरू होतो. गणपतीसाठी आरास काय करायची याचे वेध लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांनाच लागलेले असतात. ‘साधीच आरास करा. फार अवडंबर माजवू नका,’ ही जेष्ठांची सूचना घुमू लागते. ‘अखंड दिवा असतो तेव्हा सांभाळून करा’, एकास एक जोड मिळते. तरुणाई ऐकून न ऐकल्यासारखं दाखवते. आपापल्या दैनंदिन कर्तव्यातून वेळ काढत, रात्रीचा ‘दिवस’ करत आरास दिसू लागते. मॉलमध्ये फेरफटका मारत वाणसामान आणायला तरुणाई एका पायावर तयार असते.
गृहिणीच्या मनात गणेश दर्शनाला येणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या खाऊचे व्यवस्थापन रेंगाळत असते. ‘एक गोड, एक तिखट,’ असा ठराव सर्वसंमत झालेला असतो. चार हात उत्साहाने मदतीला आल्यामुळे झटपट उरका पडतो. कपाटात रिकाम्या करून ठेवलेल्या जागा सार्थकी लागतात. मुंग्यांपासून सुरक्षित अंतर ठेवल्यामुळे चिंता नसते.
गणेशाचे आगमन परवावर येऊन ठेपतं. उद्या हरितालिकेची पूजा म्हणून हरितालिकांच्या मूर्ती आणल्या जातात. छोटय़ांपासून सांभाळण्यासाठी त्यांनाही सुरक्षित जागी ठेवले जाते. कापसाची वस्त्रं, विडय़ाची पानं, सुपाऱ्या, नारळ, हळद-कुंकू, गंध, अक्षता, अत्तर, फुलं, फळं, उदबत्ती, निरांजन या सगळ्यांनी पुजेचे चांदीचे ताट कसे खुलून येते. पत्री तोडण्याच्या निमित्ताने छोटय़ांची झाडांची पानं तोडायची हौस भागवली जाते. हरितालिकेची पूजा पार पडते. उपवासासाठी खास घरी चक्का करून श्रीखंड करून ठेवल्यामुळे उपवास ‘लागत’ नाही. सगळ्या घराचीच चंगळ होते. दिवेलागण होताच गणपती आणण्याची लगबग सुरू होते. त्याच्यासाठी गोल थाळी किंवा पाट, छोटंसं रेशमी उपरणं असा जामानिमा होतो. गणपती घेऊन येणाऱ्याच्या डोक्यावर टोपी घातली जाते. झांजा वाजत राहतात आणि गणपती दारात हजर होतात.
गणपती घराच्या प्रवेशद्वारात आल्यावर त्याला घेऊन येणाऱ्याच्या पायांवर दूधपाणी घालून औक्षण करून झाल्यावर तो घरात येतो. त्यांच्या आगमनाने घर भरून जातं. ‘आणला का गणपती?’ उत्सुकतेचा प्रश्न चहू बाजूंनी कानावर पडतो. ‘हो आणला ना!’, असं सांगताना देहबोलीतून आनंद व्यक्त होत असतो. त्याक्षणी मन भरून येतं. डोळ्यांच्या कडा पाणावतात.
पूर परिस्थितीमुळे थोडा आखडता हात घेऊन मदतीचा ओघ गरजूंकडे वळवला गेला असला तरी गणपतीच्या आगमनाने झालेल्या आनंदात कुठेच कमतरता नाही.
गणपतीसाठी आरास काय करायची याचे वेध लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांनाच लागलेले असतात. ‘साधीच आरास करा. फार अवडंबर माजवू नका,’ ही जेष्ठांची सूचना घुमू लागते. ‘अखंड दिवा असतो तेव्हा सांभाळून करा’, एकास एक जोड मिळते. तरुणाई ऐकून न ऐकल्यासारखं दाखवते. आपापल्या दैनंदिन कर्तव्यातून वेळ काढत, रात्रीचा ‘दिवस’ करत आरास दिसू लागते. मॉलमध्ये फेरफटका मारत वाणसामान आणायला तरुणाई एका पायावर तयार असते.
suchitrasathe52@gmail.com