संदीप धुरत

गुढीपाडव्याला भारतात खूप महत्त्व आहे आणि हा काळ बाजारात मोठय़ा प्रमाणात आर्थिक व्यवहारांचे योगदान देतो. घर खरेदी करणे हा एक भावनिक निर्णय आहे आणि लोक नवीन प्रारंभासाठी एखाद्या शुभ प्रसंगाची वाट पाहणे पसंत करतात. घरांच्या वाढत्या मागणीमुळे यंदा गृहखरेदी आश्वासक आणि उत्तम राहील असा अंदाज आहे.

Devendra Fadnavis On Sarpanch Santosh Deshmukh Case
Budget 2025: ‘भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे केले कौतुक
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Economic Survey Report predicts possible growth rate of 6 8 percent
६.८ टक्क्यांचा विकासवेग शक्य
Need for economic reforms Recommendation to create 8 million jobs annually
आर्थिक सुधारणांची गरज! सर्वंकष नियमन सुधारणा, वार्षिक ८० लाख रोजगार निर्मितीची शिफारस
Ananth Nageswaran
अग्रलेख: कसचे काय नि कसचे काय!
Loksatta Analysis in Mulund Control inflation through budget mumbai new
अर्थसंकल्पातून महागाईवर नियंत्रण कितपत?उद्या सायंकाळी मुलुंडमध्ये ‘लोकसत्ता विश्लेषणा’तून वेध
Cotton production, Cotton bales, textile industry,
कापूस उत्पादन ३०४ लाख गाठींवर जाणार, कापड उद्योगाला मोठा दिलासा; जाणून घ्या कॉटन असोशिएशन ऑफ इंडियाचा अंदाज
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh 2025 : महाकुंभ मेळ्यात १०० हून अधिक भाविकांना हृदविकाराचा झटका; प्रशासनाच्या तयारीमुळे वाचले प्राण

घर खरेदी करण्यासाठी किंवा नवीन   प्रकल्प/ कार्यक्रम सुरू करण्यासाठी   पाडवा हा शुभ दिवस मानला जातो. साधारणपणे, फ्लॅट्सचे बुकिंग याच सुमारास सुरू होते आणि दिवाळीपर्यंत चालू राहते. अनेक घर खरेदीदारदेखील असा विश्वास ठेवतात की, पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घर अथवा वास्तू खरेदी केल्याने सुख, समाधान आणि समृद्धी येते.

पाडव्याच्या दिवशी नवीन गुंतवणुकीचा विचार हा पुढील गृहितकांवर आधारित असतो :

  •    घर खरेदीसाठी हा शुभ दिवस मानला जातो.
  •   या दिवशी नवीन प्रकल्पात गुंतवणूक करणे किंवा मालमत्ता घेणे हे शुभ मानले जाते.
  •    नवीन मालमत्ता खरेदी करून किंवा नवीन व्यवसाय सुरू करून नवीन गुंतवणूक करणे अनुकूल मानले जाते, कारण या दिवशी दीर्घकालीन खरेदी केल्यास संपत्ती आणि आनंद वाढण्याची अपेक्षा असते.
  •    नवीन प्रकल्प आणि गुंतवणूक सुरू करण्यासाठी हे पवित्र मानले जाते, कारण या समृद्ध दिवशी कार्यास प्रारंभ केल्यास अनुकूल आणि सकारात्मक परिणाम अपेक्षित असतात.

विशेष म्हणजे पाडव्याच्या मुहूर्तावर विकासक गृहखरेदीवर चांगली सवलत आणि आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून देतात. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये घट आणि जास्त विक्री न झालेल्या घरांच्या संख्येमुळे, खरेदीदारांसाठी ठरावीक कालावधीत नवीन प्रकल्प येण्याची वाट न पाहता, रेडी-टू-मूव्ह फ्लॅटमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे.  रेराने वेळेवर वितरण, प्रकल्पाची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यावर आश्वासन दिल्याप्रमाणे, या क्षेत्रामध्ये आधीच सकारात्मकता दिसून येत आहे. प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती प्रकल्पाच्या सध्याच्या टप्प्यापासून, विकासकाद्वारे घेतलेल्या किंवा प्रलंबित परवानग्या इत्यादी सार्वजनिक माहितीसाठी उपलब्ध असतात. याद्वारे जे ग्राहक त्यांचे कष्टाचे पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवतात, त्यांचे पैसे सुरक्षित राहतात.

भारतीय रिअल इस्टेटमधील मालमत्ता बाजाराची इको सिस्टीम आता बरीच चांगली आहे, कारण अर्थव्यवस्था आता सुधारण्याचे संकेत दर्शवीत आहे ज्यामुळे खरेदीदार नवीन घरखरेदीसाठी प्रवृत्त होतील. सध्या उपलब्ध असलेल्या मालमत्तांच्या दृष्टिकोनातून, डेव्हलपर्स दर्जेदार प्रकल्प आणत आहेत, ज्यामुळे ग्राहकांचे गृहस्वप्न नक्कीच पूर्ण होईल. या दरम्यान विकासकांनी उत्तम प्रकारे आपल्या प्रकल्पांचे मार्केटिंग करणे अतिशय आवश्यक आहे. तसेच एखादी जाहिरात प्रसिद्ध करताना त्यामध्ये काही उणीव किंवा चूक नाही ना हे पाहणे खूप गरजेचे आहे. कारण तसे असेल तर ग्राहक आकर्षित होण्यापेक्षा दूर जाण्याची शक्यता अधिक.

गुढीपाडव्याच्या दरम्यान गुंतवणूक करताना विचारात घेण्यासारखे मुद्दे –

  •   निर्णय घेण्याची घाई करू नका – केवळ ऑफरचा मोह असल्यामुळे घाईने निर्णय घेणे योग्य  नाही. तुमच्या कुटुंबाच्या गरजा, भविष्यातील गरजा, तुमची आर्थिक परिस्थिती आणि कर्जपात्रता रकमेचे विश्लेषण केल्याची खात्री करा.
  •    जागेचे ठिकाण योग्य असल्याची खात्री  करा – मालमत्ता असलेले स्थान योग्यरीत्या तपासा आणि आसपासच्या परिसरात आवश्यक सुविधा आहेत का ते पाहा. मालमत्तेमध्ये सर्व आधुनिक सुविधाही असायला हव्यात. तसेच, जवळपास शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि वाहतूक सुविधा आहेत का ते तपासा.
  •    बिल्डरबद्दल माहिती  – घर घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्या बिल्डरशी संबंधित माहिती तपासणे खूप महत्त्वाचे आहे. बिल्डरबद्दलची ग्राहकांनी व्यक्त केलेली मते  वाचा आणि बांधकामाच्या गुणवत्तेची कल्पना घ्या, याआधी पूर्ण केलेल्या  प्रकल्पांचा आढावा घ्या आणि ते प्रकल्प पूर्ण होण्यात काही विलंब झाला का याची माहिती मिळवा.

गुढीपाडव्याच्या सणाच्या वेळी अनेक विकासक बाजारात अनेक सवलती आणि ऑफर घेऊन येतात आणि हे खरेदीदारांना विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी आणि बचत करण्यासाठी प्रेरित करेल. नवीन आणि आकर्षक पेमेंट योजना आणि बुकिंग सवलतींपासून ते इतर ऑफपर्यंत, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करणे सोपे करू शकतात.

एकंदरीत, नवीन घर खरेदी करून यंदाच्या गुढीपाडव्याचा दिवस पूर्णपणे नवीन पद्धतीने साजरा करण्यासाठी सज्ज व्हा. आपल्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करा. गुढीपाडव्याला खऱ्या अर्थाने आनंदी बनवण्यासाठी या वेळी बिल्डर्सने ऑफर केलेल्या सर्व सवलती, योजना आणि प्रोत्साहनांचा लाभ घ्या. फक्त तुम्ही सर्व अटी व शर्ती वाचल्याची खात्री करा आणि कोणतीही महत्त्वाची गोष्ट/ मुद्दा चुकवू नका. विविध बिल्डर्स आणि प्रकल्पांचे विस्तृत संशोधन करा.

गुढीपाडव्याला भारतात खूप महत्त्व आहे आणि हा काळ बाजारात मोठय़ा प्रमाणात आर्थिक व्यवहारांचे योगदान देतो. घर खरेदी करणे हा एक भावनिक निर्णय आहे आणि लोक नवीन प्रारंभासाठी एखाद्या शुभ प्रसंगाची वाट पाहणे पसंत करतात. घरांच्या वाढत्या मागणीमुळे यंदा गृहखरेदी आश्वासक आणि उत्तम राहील असा अंदाज आहे. सणासुदीच्या काळात मालमत्तेच्या बाजारपेठेत एक उजळ बाजू दिसेल, ज्यामुळे खरेदीदारांना त्यांच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी चांगला कालावधी मिळतो. आजची बाजारपेठ खरेदीदारांसाठी खूप स्थिर आहे, पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे घरात गुंतवणूक करण्याची ही चांगली वेळ आहे.

Story img Loader