को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या बायलॉजमध्ये चेअरमनच्या कास्टिंग व्होटचा उल्लेख आहे. या कास्टिंग व्होटचा वापर कधी करतात? व त्याचा परिणाम काय होतो?
– एच. सी. पठाण, गोरेगाव, मुंबई.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोसायटीच्या मीटिंग होतात त्यामध्ये निरनिराळे ठराव मंजूर होतात. हे ठराव मंजूर होताना त्याला बहुमताची जरुरी असते. बहुमताने मंजूर झालेले ठराव हे सर्वसामान्यपणे सर्व सदस्यांवर बंधनकारक असतात. ज्या वेळेस एखाद्या ठरावावर मतदान घेतले जाते व ठरावाच्या बाजूने व ठरावाच्या विरुद्ध अशी समसमान मते पडतात त्या वेळी ठराव मंजूर की नामंजूर असा प्रश्न उद्भवतो. अशा वेळी अध्यक्ष / चेअरमन आपले मत ठरावाच्या बाजूने अथवा विरुद्ध देऊ शकतो. या मतालाच कास्टिंग व्होट असे म्हणतात. या मतामुळे एखादा ठराव मंजूर अथवा नामंजूर होऊ शकतो. मात्र काही ठराव मंजूर होताना दोनतृतीयांश मतांची अथवा तीनचतुर्थाश मतांची जरुरी असते. त्या वेळी तेवढी मतसंख्या भरण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होऊ शकतो.

संस्थेने ठराव करून ट्रान्स्फर फी प्रति चौ. फूट ८० रु.प्रमाणे आकारावी, असा ठराव केला आहे. तो बरोबर आहे का? याबाबत किमान आणि कमाल किती हस्तांतरण फी संस्था आकारू शकते, याबाबत माहिती मिळावी.
– गणेश भगत, कोपरी व्हिलेज, ठाणे</strong>

या ठिकाणी संस्थेचा ठराव काय आहे तो समजल्याशिवाय त्याचे उत्तर देणे कठीण आहे. कारण त्यामध्ये अन्य काही मजकूर उदा. जी कोणती रक्कम जास्त असेल ती इ. असा असेल तर त्याचा अर्थ बदलण्याची शक्यता आहे. मात्र या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करता येईल ती म्हणजे ट्रान्स्फर फी कमीतकमी किती लावावी याच्यावर बंधन नाही. एखाद्या सोसायटीने ट्रान्स्फर फी आकारायची नाही, असे ठरविले तरी हरकत नाही; परंतु जास्तीतजास्त फी आकारणीबाबत काही र्निबध आहेत ते असे – १) मेट्रोपॉलिटन एरिया, सिडको एरिया वा महानगरपालिका क्षेत्रात जास्तीतजास्त २५ हजार रु. फी आकारता येते. अ वर्ग नगरपालिका क्षेत्रात २० हजार रु. तर ब वर्गीय नगरपालिका क्षेत्रात १५ हजार रु. फी आकारता येते. क वर्गीय नगरपालिकेत १० हजार रु. तर ग्रामपंचायत क्षेत्रात ५ हजार रु. इतकीच ट्रान्स्फर फी आकारता येते.

घैसास अ‍ॅण्ड असोसिएट्स
०२२-२५४१६३३६, २५४००६५९,