जेव्हा विकास घडून येत असतो, तेव्हा अनेक छोटे-मोठे बदल हे जीवनशैलीचा भाग म्हणून सहजपणे स्वीकारले जातात. हे जरी खरे असले तरी या बदलप्रक्रियेत काही गोष्टी तशाच राहतात. किंबहुना काही गोष्टी जशा आहेत तशाच स्वीकार करण्यावर अधिक भर दिला जातो. शिवाय, अलीकडच्या काळात तर तंत्रज्ञानाचा वेग झपाटय़ाने बदलत असल्यामुळे, आपली घरे किंवा कार्यालयाची ठिकाणेदेखील अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त असावी, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. इथे घरे आणि कार्यालयांच्या ठिकाणांचा मुद्दाम उल्लेख केला, कारण त्या त्या काळातील त्या त्या शैलींचा प्रभाव यावर प्रामुख्याने पडत असतो. पूर्वी घर किंवा कार्यालयाच्या रचनेत बदल करताना फारफार तर जवळच्या लोकांचे मत किंवा नेमका काय बदल अपेक्षित आहे, हे लक्षात घेऊन त्यानुसार फेरफार केला जात असे.
बऱ्याचदा आपल्याला वाटत असते की, आपले घर अशा ठिकाणी असावे की, त्याच्या खिडकीतून किंवा बाल्कनीतून समुद्रांच्या लाटांचा हळुवार आवाज ऐकत दिवसाची सुरुवात व्हावी. परंतु प्रत्यक्षात मात्र रहदारीने गजबजलेल्या भर वस्तीत घर असते. आज आपल्या मनात घराचे किंवा कार्यालयाचे जसे चित्र मनात असते तसे प्रत्यक्षात आणता येते. कारण फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल नेटवìकग साइटमुळे एकेका गोष्टींसाठी अनेकविध पर्याय थेट उपलब्ध झाले आहेत. स्टे कनेक्टेड् हा आजच्या युगाचा मंत्र आहे. त्यामुळेच आजच्या राहणीमानात झपाटय़ाने बदल घडून येत आहे.
वेगाचा हा बदल होम डेकोरसारख्या क्षेत्रातदेखील लखलखीतपणे दिसून येतो. केवळ अवाढव्य स्वरूपाची फíनचर इतकीच जुजबी ओळख न राहता, आता इथे देखील कॉम्पॅक्ट, रंगीत आकर्षक स्वरूपातील फ्लेक्झिबल फíनचर्सचा नि त्यांना शोभतील अशा मेणबत्त्या, चित्रे विविध स्वरूपाची भांडी या सर्व प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीज्चा त्यात समावेश झाला आहे. त्यामुळेच जागा व्यापणारे लाकडी फíनचर आणि सोफा म्हणजेच गृहसजावट, अशी जी पूर्वापार चालत आलेली सजावटीबाबतची जी संकल्पना होती, ती आता मागे पडत चालली आहे. यात काळानुसार बदल घडून येत आहे. सुटसुटीत, आकर्षक रंगातील फíनचर्सना चांगलीच मागणी आहे. दुसरे असे की, अशा फíनचर्सच्या वापरामुळे घरालादेखील एक प्रशस्तपणा प्राप्त होतो. शिवाय, फíनचर असूनदेखील घरात वावरायला जागा मिळते. महानगरांतील शहरांच्या दृष्टीने घरांचा विचार केला तर एक गोष्ट सहजपणे लक्षात येते की, इथे टू बीएचके घरे म्हणजे, साधारणपणे ६०० ते ७५० चौरस फूट इतकी असतात. तेव्हा या जागेत आवश्यक ते फíनचर राहूनदेखील वावरायला मोकळी जागा सहजपणे मिळावी, असा ग्राहकांचा दृष्टिकोन असतो.
त्यामुळेच दिवसेंदिवस या स्वरूपातील फíनचर्सना वाढती मागणी आहे. शिवाय त्यांच्या किमतीदेखील सहज परवडण्याजोग्या असतात.
फक्त उत्तम फíनचर म्हणजे सजावट नव्हे, तर त्यास शोभेल असे पडदे, रंगांची अथवा वॉलपेपरची सजावट, आकर्षक स्वरूपातील मूर्त्यां किंवा जुन्या भांडय़ांनी केलेली सजावट, सोफ्याची रचना त्यावर योग्य पद्धतीने केलेली चादर, उशांची मांडणी, घडय़ाळ, डोअर मॅट, शू-रॅक, पुस्तकांचे कपाट इ.सारख्या अनेक लहानसहान गोष्टींच्या योग्य व आकर्षक मांडणीमुळे गृहसजावटीला एक वेगळेच परिमाण लाभत असते. त्यावरूनच घरातल्या मंडळींचा अंदाज येतो. शिवाय इंटिरिअर डिझाइनरने ते काम किती कल्पकतेने आणि समरसून केले आहे, हेदेखील समजते.
म्हणूनच आपल्या कामाला एक अपेक्षित परिणाम देण्यासाठी इंटेरिअर डिझायनरला प्रत्येक गोष्टींची काळजीपूर्वक निवड करावी लागते. अशा परिस्थितीत इंटिरिअर डिझायनरच्या मदतीला धावून येतो तो स्टायलिस्ट; ज्यामुळे प्रत्यक्षपणे तुम्हाला घर सजावटीत मदत करीत नाही, पण तुमच्या घरासाठी कोणकोणत्या इंटेरिअर स्वरूपाच्या अ‍ॅक्सेसरीज् शोभून दिसतील याबाबत मार्गदर्शन मिळते. एक काळ असा होता की, इंटिरिअर डिझायनरकडून गृहसजावट करणे हे उच्चवर्गीयांनाच परवडत असे. परंतु अलीकडे मात्र एकदम नवीन घर न घेता, आहे त्याच घराला अंतर्गत सजावटीमार्फत नवेपणा देण्याकडे लोकांचा अधिक कल असतो. त्यामुळेच या इंटेरिअर डिझाइन उत्पादनाच्या बाजारपेठेत नित्य नवनवीन गोष्टी येत असतात. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादनांनी देखील या बाजारपेठेत शिरकाव केला आहे.
 वेगाने बदलणारे तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेतून निर्माण होणारी नवनवीन समीकरणे, यामुळे बहुतांश ग्राहकांचा कल हा आजच्या आधुनिक युगाशी मेळ साधण्यावर अधिक असतो.

Story img Loader