खिडक्यांचे पडदे बदलण्यानंदेखील घराच्या लुकमध्ये आमूलाग्र बदल दिसून येतो. सोफासेट हा तर बैठकीच्या खोलीचा प्राण, पण महागडी वस्तू. सोफे काही दर दोनचार वर्षांनी आपण बदलू शकत नाही, पण त्याच्यावरचं कापड तर बदलू शकतो ना? सोफ्याचं निव्वळ कापड बदलूनदेखील आपण अगदी घरात नवा कोरा सोफा आणल्याचं समाधान मिळवू शकतो.

आ पण भारतीय मुळातच उत्सवप्रिय आणि त्यात दिवाळीसारखा सण म्हणजे काय उत्साहाला उधाणच. प्रत्यक्ष दिवाळीत आपण जितके उत्साहात असतो ना त्याहूनही जास्त उत्साह हा दिवाळीच्या महिनाभर आधी येतो. निरनिराळ्या खरेदींची यादी करत असतानाच या वर्षी घर कसं सजवायचं याचेदेखील विचार डोक्यात पिंगा घालत असतात. चार-सहा वर्षांपूर्वी जर घराचं इंटेरियरचं काम करून घेतलं असेल तर मग ते ना धड जुनं, ना धड नवीन असतं. मग आपल्याला घराचा नवीन लुक तर हवा असतो, पण तोही वाजवी पैशांत आणि कमीत कमी वेळेत. जर व्यवस्थित नियोजन केलं तर घरात केलेले लहानसहान बदलदेखील संपूर्ण नव्या कोऱ्या इंटेरियरचा आनंद देऊ शकतात. सुरुवातच करायची तर घराच्या रंगरंगोटीपासून करू. घराची रंगछटा जरी बदलली तरी घरातलं वातावरण ताजंतवानं होतं, परंतु रंगकाम म्हणजे पुन्हा पसारा आणि आवराआवर आलीच. म्हणूनच रंगकामाला अजून एक पर्याय म्हणजे वॉलपेपर. वॉलपेपर म्हणजे जणू काही जादूची कांडीच. घरात कुठलीही घाण, पसारा न होता, शिवाय अगदी कमी वेळात घराचा लुक बदलण्यासाठी वॉलपेपरसारखा उत्तम पर्याय नाही. वॉलपेपरमध्ये ज्या डिझाईन्स उपलब्ध होतात त्या रंगकामाने नाही मिळू शकत, त्यामुळेदेखील वॉलपेपरचा पर्याय हा रंगाहूनदेखील सरस ठरतो.

Fire Safety Responsibility Kalyan West Vortex Fire
आपल्या अग्निसुरक्षेची जबाबदारी आपलीच!
House Prices Indian Real Estate Property
घरांच्या किमती वाढतायत…
impact of redevelopment on surrounding area
एकाचा पुनर्विकास दुसऱ्याला त्रास..
Loksatta vasturang Legal Analysis of Penalty
दंड आकारणीचे विधिनिहाय विश्लेषण
Loksatta lokrang Home design A bookcase on the wall of the house
घरात असावे ग्रंथाचे कपाट!
Loksatta vasturang House windows doors Cross ventilation passage
३० खिडक्या आणि २२ दरवाजे…
Loksatta vasturang The terrace in the house is a quiet place
मनाला शांतावणारी जागा…
Loksatta vasturang Pune successful move in real estate sector
रिअल इस्टेट क्षेत्रात पुण्याची यशस्वी वाटचाल
Loksatta vasturang Skyscrapers are preferred in Pune news
पुण्यात गगनचुंबी इमारतींना प्राधान्य

हेही वाचा >>> रिअल इस्टेट क्षेत्रात पुण्याची यशस्वी वाटचाल

खिडक्यांचे पडदे बदलण्यानंदेखील घराच्या लुकमध्ये आमूलाग्र बदल दिसून येतो. सोफासेट हा तर बैठकीच्या खोलीचा प्राण, पण महागडी वस्तू. सोफे काही दर दोन-चार वर्षांनी आपण बदलू शकत नाही, पण त्याच्यावरचं कापड तर बदलू शकतो ना? सोफ्याचं निव्वळ कापड बदलूनदेखील आपण अगदी घरात नवा कोरा सोफा आणल्याचं समाधान मिळवू शकतो. शिवाय सोफ्याचं कापड बदलण्याच्या निमित्तानं एकदा सोफ्याचा मेंटेनन्स केला जातो, ज्यात सोफ्याच्या स्प्रिंग, पट्ट्या बदलल्या जातात किंवा टाईट करता येतात. फोम किंवा स्पंज कुठे दबला असेल, खराब झाला असेल तर तोदेखील बदलून घेता येतो. यामुळे सोफ्याचं आयुष्य वाढायलादेखील मदत होते.

याव्यतिरिक्त घरात जर काही लाकडी फर्निचर असेल तर ते पॉलिश करून त्यालादेखील नवेपणाची झळाळी देता येते. शिवाय लाकडी फर्निचरला वेळोवेळी पॉलिश केल्यानं ते छान दिसण्याबरोबरच टिकाऊदेखील होतं. हे बदल दिसताना जरी लहानसहान असले तरी कमी खर्चात संपूर्ण नव्या इंटेरियरचा अनुभव देऊ शकतात. हे बदल करतानादेखील आपण इंटेरियर डिझायनरची मदत घेऊ शकतो किंवा हल्ली बरेच असे इंटेरियर स्टुडिओ असतात जिथे आपल्या घराच्या इंटेरियरसाठी लागणाऱ्या सगळ्याच वस्तू एकत्रित उपलब्ध असतात. अशा काही ठिकाणी इंटेरियरमधील तज्ज्ञ आपल्याला वस्तू निवडताना मदतदेखील करतात, ज्यामुळे तुम्ही अचूक निवड कमीत कमी वेळात करू शकता.

असे हे छोटे छोटे बदल सणावारी घराचं सौंदर्य तर वाढवतातच, पण त्यानिमित्तानं घराचा मेंटेनन्सदेखील होतो. म्हणूनच अगदी वर्षावर्षाने नाही तरी दोन-चार वर्षांनी अशा प्रकारे वरवरचे बदल करून नव्या कोऱ्या इंटेरियरचा अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही.

Story img Loader