अलीकडेच निटकोच्या ट्रू लाइफ टाइल्स बाजारात आल्या आहेत. नैसर्गिक रंगांमध्ये या टाइल्स उपलब्ध आहेत. तसेच या टाइल्सचा दर्जाही उत्तम आहे. या टाइल्समुळे तुमच्या घरात प्रसन्नतेची अनुभूती येईल. अद्ययावत तंत्राज्ञानाने या टाइल्स बनविण्यात आल्या आहेत.
शुद्ध पाण्यासाठी अॅक्वागार्ड फ्लो
युरेका फोर्ब्सने अॅक्वागार्ड फ्लो हा नवीन वॉटर प्युरिफायर बाजारात आणला आहे. हा प्युरिफायर स्टायलिश असून त्याचे पाणी शुद्धतेचे प्रमाण हे ९९.९९९९ टक्के इतके आहे. या प्युरिफायरचे विशेष म्हणजे तांत्रिकदृष्टय़ा अद्ययावत आणि सौंदर्याच्या दृष्टीने कलात्मक पद्धतीने तो डिझाइन केला आहे. याची किंमत रु.१७, ९९० इतकी आहे.
आग विझविण्यासाठी फायर गार्ड
युरेका फोर्ब्सने फायरगार्ड नावाचे अग्निशमन यंत्र बाजारात आणले आहे. वजनाला अत्यंत हलके आणि हाताळण्यास सोपे असे हे यंत्र पूर्णपणे सुरक्षित आहे. याची वैशिष्टय़े म्हणजे गॅसमुळे लागलेली आग, इलेक्ट्रिकल सर्किट, अग्निजन्य द्रवपदार्थ, खाद्यतेल, घनपदार्थामुळे लागलेली आग विझविण्यास मदत होते. हे यंत्र वजनासही हलके आहे. पर्यावरणपूरक, रीफिलिंगची आवश्यकता नाही. याला २० वर्षांची वॉरंटी आहे. दोन प्रकारचे फायरगार्ड उपलब्ध आहेत.
5 B हे यंत्र घरगुती वापरासाठी असून याचा जेट एमिशन कालावधी २५ सेकंद इतका आहे व याची किंमत ४९९० रुपये इतकी आहे. 8 B हे यंत्र व्यावसायिक ठिकाणी वापरायचे असून त्याचा जेट एमिशन कालावधी ५० सेकंद इतका असून त्याची किंमत ७९९० रुपये इतकी आहे.