दिवाळी आली की घरसजावटीचे वेध लागतात. कल्पक सजावटीने आपलं घर अधिक सुंदर करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे आडाखे बांधत असतो. अशा वेळी मात्र घराची कशा पद्धतीने सजावट करावी याबाबत मनात पुरता गोंधळ उडतो. यासाठी घरसजावटीसाठी सहजसोप्या युक्त्या करता येतील.

तोरण
साहित्य : सिल्कचे कापड, डेकोरेशनचे सामान, टिकल्या, मणी, घुंगरू, शिंपले, मॅचिंग दोरे, सुई. यासाठी शिलाई मशीन आवश्यक आहे.
कृती : दाराच्या किंवा मखराच्या आकारात सिल्कच्या कापडाची पट्टी व्यवस्थित शिवून घ्या. त्यावर अंतराअंतरावर छानशा रंगसंगतीमध्ये टिकल्या व शिंपले शिवून घ्या. काही छोटे, काही मोठे असे आकार बनवा. या आकारांच्या मध्यावर खालील बाजूस मण्यांची माळ बनवून छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे शिवून घ्या. या मण्यांच्या माळेत काही नाजूक किणकिणते घुंगरू बांधल्यास अजूनच सुबकता येईल. दोन्ही टोकांना छोटे-छोटे लून्स बनवा किंवा डबल साइडेड टेपने चिकटवून घ्या. असे नाजूक तोरण तुमच्या देव्हाऱ्यालासुद्धा सुंदर दिसेल.

फुलांचा गुच्छ
साहित्य : कणसाची वाळलेली पाने, खराटय़ाच्या काडय़ा, क्रेप टेप, कात्री, गम, अक्रॅलिक रंग, ब्रश, रंगकामाचे साहित्य, जाड दोरा.
कृती : कणसाची वाळलेली पाने एका उंचीत कापून घ्या. मधोमध अलगद दुमडा व दोन्ही टोकं एकमेकांना जोडा. ती गमच्या साहाय्याने चिकटवा. अशा प्रकारे चार-पाच पाकळ्या बनवा व एकमेकांमध्ये जोडून दोरा गुंडाळून बांधून घ्या. तयार केलेले फुल खराटय़ाच्या काडीला बांधा व सांध्यापासून हव्या त्या अंतरापर्यंत हिरव्या क्रेप टेपने जोडून घ्या. वरील फुलाला अ‍ॅक्रिलिक रंगात रंगवा. ते व्यवस्थित वाळू द्या. खालील बाजूस काही निमूळती कणसाची पाने न रंगवता चिकटवा व गुच्छ बनवून घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुन्या सीडीज्ची इन्स्टंट रांगोळी
सगळ्या जुन्या- खराब सीडीज गोळा करा. कमीत कमी सात सीडीज्, कार्डपेपर, फेव्हिकॉल, ३/४ थ्रीडी आऊटलायनर्स घ्या आणि लागा कामाला. १५ मिनिटांत झटपट रांगोळी बनवता येईल. सर्वप्रथम सीडीज्वर मेहेंदी किंवा फुलांचे नक्षीकाम थ्रीडी आऊटलाइनर्सने सुबकपणे काढून घ्या व सर्व सीडीज् पूर्णपणे वाळू द्या. त्यानंतर फुलाच्या आकारात या सीडीज् कार्डपेपरवर गोलाकारात एकमेकांच्या जवळ फेव्हिकॉलने चिकटवा. पूर्णपणे वाळल्यावर बाजूने कापा. मधल्या भागात एखादे फूल ठेवून सजवा किंवा आजूबाजूला आंब्याची पाने लावल्यास छान दिसतील. या दसऱ्याला ही अनोखी रांगोळी करून पाहा.