आवडत्या ठिकाणी आधुनिक सुविधांसह स्वत:च्या हक्काचं घर असावं, असं आपल्यापकी बहुतेकांना वाटत असतं. बऱ्याचदा वर्तमानपत्रांतील चकचकित जाहिरातींना भुलून अनेकजण रिअल इस्टेटमध्ये पसा गुंतवतात नि पदरी निराशा पाडून घेतात. त्यामुळेच आपण जी गुंतवणूक करतो, तिचे नेमके विश्लेषण करणे खूप महत्त्वाचे आहे. हे विश्लेषण करताना भांडवल, वेळ आणि तुमची इच्छाशक्ती या तीन घटकांचा प्रामुख्याने विचार करावा, कारण आपण जी गुंतवणूक करीत आहोत आणि त्यातून चांगला परतावा मिळावा व ती चांगली असावी अशी गुंतवणूकदाराची नेहमीच अपेक्षा असते. त्यामुळेच आपले नेमके ध्येय, वेळ आणि जोखीम लक्षात घेऊन गुंतवणुकीचे विश्लेषण करावे.
गुंतवणूकदार या नात्याने गुंतवणूक करताना ठिकाण हा सर्वात महत्त्वपूर्ण घटक असतो, त्यामुळेच त्याचा प्रथम विचार करणे आवश्यक आहे.
रिअल इस्टेटमध्ये कोणत्याही स्वरूपाची गुंतवणूक करताना ठिकाण हा घटक खूप महत्त्वाचा असतो. कारण आज आपण जी गुंतवणूक करतोय ती भविष्यात विकताना तिच्यापासून किती लाभ होईल, तसेच व्यावसायिक मूल्याबरोबर त्या जागेचे सामाजिक मूल्यदेखील कितपत महत्त्वाचे आहे, हे पाहाणे आवश्यक ठरते.
घरामध्ये गुंतवणूक करताना एक उच्च राहणीमानाची आवड म्हणून आपण तिथे राहणार आहोत, की निव्वळ एक गुंतवणूक म्हणून घर घेणार आहोत, यापकी नेमके आपणास काय हवे आहे याचा विचार करून गुंतवणूक करावी. ही बाब लक्षात घेऊन जेव्हा गुंतवणूक केली जाते तेव्हा गुंतवणूक करणे अधिक सोपे होऊन जाते. जसे काहींना शांत वातावरणापेक्षा भर वस्तीत म्हणजे जिथे शाळा, कॉलेज, बँका, रुग्णालय, बाजार इ. सारख्या गोष्टी आपल्या घराजवळ असाव्यात असे वाटत असते. जेणेकरून दैनंदिन कामे करताना वेळेची बचत होईल.
भविष्यात घर विकायचे झाल्यास त्याचा गुंतवणुकीच्या हिशोबात योग्य परतावा मिळेल, या दृष्टीने तुम्ही करीत असलेली गुंतवणूक ही नेहमीच फायदेशीर असावी.
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करीत असताना तुम्ही एक मोठय़ा स्वरूपाची रक्कम त्यात गुंतवीत असता. त्यामुळे भविष्यात तिचा मिळणारा परतावा हा गुंतवणुकीच्या तुलनेत योग्य असेल हे पाहणे जरुरीचे असते. शिवाय ही गुंतवणूक स्वतंत्र असावी; जेणेकरून त्यापासून मिळणाऱ्या फायद्या-तोटय़ाचा परिणाम तुमच्या अन्य गुंतवणुकीवर होता कामा नये. या गुंतवणुकीमुळे आपण इतर चांगल्या संधी गमावून बसलो असे तुम्हाला वाटता कामा नये.
इतर आíथक गुंतवणुकीप्रमाणेच रिअल इस्टेट क्षेत्रातदेखील गुंतवणुकीची जोखीम ही असतेच. त्यामुळेच संभाव्य धोके लक्षात घेऊन हरतऱ्हेच्या शंकाकुशंकांचे मनाचे समाधान होईपर्यंत निरसन करून घ्या.
गुंतवणूक हा नेहमीच जोखमीचा प्रकार समजला जातो, कारण त्यामध्ये सुरक्षेच्या हमीपेक्षा धोकेच जास्त असतात. शिवाय तत्कालीन परिस्थितीचा- जसे आíथक धोरणांतील चढउतारांचादेखील त्यावर परिणाम होत असतो, तर कधी नसíगक आपत्तीमुळेदेखील गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. शिवाय अनेकदा निश्चित मुदतीचा कालावधी देऊनदेखील एखादा प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब लागत असतो. यामुळेदेखील गुंतवणूकदार एकप्रकारच्या तणावाच्या छायेखाली वावरत असतो.
घर व त्यासाठी कर्ज घेताना..
आवडत्या ठिकाणी आधुनिक सुविधांसह स्वत:च्या हक्काचं घर असावं, असं आपल्यापकी बहुतेकांना वाटत असतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-08-2015 at 06:54 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home loan process