खेड्यांमधून शहरांमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांवर खूप मोठा ताण येत आहे. शहरीकरण म्हणजे केवळ ग्रामीण भागातील रहिवाशांचे शहरांत होणारे स्थलांतर नव्हे; तर त्याचा परिणाम सामाजिक, आर्थिक व पायाभूत सुविधांमधील बदलांवर होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दशकांमध्ये शहरीकरणाच्या वेगाशी जुळवून घेणे सर्वांनाच कठीण होत आहे. जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या आता शहरी भागांत राहते. ही आकडेवारी २०१४ सालच्या संयुक्त राष्ट्र अहवालात नमूद करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या शहरी भागांची जगाच्या नकाशावरील व्याप्ती १ टक्क्याहूनही कमी आहे. यातून शहरी भागातील लोकसंख्येची घनता किती अधिक आहे याचा अंदाज येऊ शकतो. शहरांच्या वाढीबाबत जागरूकता वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ३१ ऑक्टोबर २०१४ पासून ‘वर्ल्ड सिटीज् डे’ला सुरुवात केली आहे.

लोकांच्या स्थलांतरामागील प्रमुख कारण रोजगार मिळवणे हे असते. शहरांमध्ये शाळा, रुग्णालये, सुपर मार्केट्स आणि घरे अशा अत्यावश्यक गरजा सहज पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे अधिक संधी व सोय यांकडे लोक आकर्षित होतात. ग्रामीण भागांकडून सातत्याने येणारे लोंढे आणि शहरी लोकसंख्येतील वाढ यांमुळे गर्दी, राहणीमानाचा खर्च वाढणे तसेच जागेच्या मर्यादा अशी अनेक आव्हाने तयार झाली आहेत. यावर तोडगा म्हणून, शहरातील अतिगर्दी कमी करण्याच्या दृष्टीने उपनगरीकरण ही संकल्पना उदयाला आली. शहरात राहणारे शहराबाहेर किंवा लगतच्या भागात राहण्यासाठी स्थलांतर करू लागले. या भागात घरांच्या किमती परवडण्याजोग्या असल्यामुळे तसेच राहणीमान चांगले असल्याने तेथे राहण्यास लोक पसंती देऊ लागले. अधिक चांगले रस्ते, सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा आणि शहरातील केंद्रांना जोडणाऱ्या सुविधा (कनेक्टिव्हिटी) यांमुळे उपनगरी भाग राहण्यासाठी अधिक सोयीस्कर व आकर्षक ठरू लागले. कनेक्टिव्हिटीमुळे प्रवासाचा वेळ कमी झाला आणि उपनगरी भागांत राहणे अधिक व्यवहार्यही झाले. विकासक उपनगरी भागांमध्ये निवासी संकुलांची उभारणी सातत्याने करत आहेत.

या संकुलांमध्ये उद्याने, शाळा, व्यापारी संकुले, रुग्णालये आदी अनेकविध सुविधा दिल्या जात आहेत. शहराच्या मुख्य भागातील दाटीवाटीपासून दूर जाऊन दर्जेदार आयुष्य हवे असलेल्या लोकांना या सुविधा आकर्षित करतात आणि त्यामुळे ते कमी गर्दीच्या, शांत, झाडे असलेल्या वसाहतींमध्ये राहण्याचा पर्याय स्वीकारतात.

शहरी लोकसंख्येतील वाढीबाबतच्या अंदाजांवरून, २०५० सालापर्यंत जगाची सुमारे ७० लोकसंख्या शहरी भागांमध्ये राहू लागलेली असेल असे दिसते. जागतिक शहरीकरणाच्या या सिद्धांतामध्ये आशिया खंड हे महत्त्वाचे केंद्र आहे. १९७० मध्ये टोकयो आणि न्यूयॉर्क या दोनच मेगासिटीज होत्या. आज आशियामध्ये १३ मेगासिटीज आहेत. जगाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या या मेगासिटीजमध्ये राहत आहे. भारतात ग्रामीण लोकसंख्या बरीच अधिक असल्यामुळे ग्रामीण-शहरी स्थलांतर लक्षणीय भासत आहे. सरकार आणि खासगी कंपन्या पीपीपी मॉडेलमार्फत पायाभूत सुविधांसाठी जॉइंट व्हेंचर्सवर काम करत आहेत.

उपनगरीकरण ही संकल्पना न्यूयॉर्क शहरालगतच्या लेव्हिटटाऊनसारख्या ठिकाणी उदयाला आली. आता ती जगभर पसरली आहे. चीनमध्ये ‘थेम्स टाऊन’च्या स्वरूपात ही संकल्पना स्वीकारली गेली. थेम्स टाऊन हा शांघाय शहरालगतचा भाग ब्रिटिश मार्केट टाऊनच्या धर्तीवर विकसित करण्यात आला. यामध्ये स्थापत्यशैली, आवश्यक सुविधा आणि योग्य विकास यांचे मिश्रण होते. भारतात अहमदाबादजवळील धोलेरा स्मार्ट सिटी आणि कोलकोत्याजवळील राजरहाट न्यूटाऊन भाग ही स्मार्ट सिटी संकल्पनेची यशस्वी उदाहरणे आहेत.

जश पंचमिया

(लेखक रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत)

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infrastructure boosts real estate sector amy