ंआठवडाभर मानमोडून काम केल्यावर वीकेंडला फॉर अ चेंज म्हणून जिथे अगदी सहज जाऊन राहता येईल असा एखादा फ्लॅट किंवा टुमदार बंगला म्हणजेच सेकंड होम घेण्याकडे कल वाढतोय. आपल्याला हवं तसं हक्काने राहता येईल, शिवाय हे राहणं जास्त खर्चीकसुद्धा होणार नाही, अशा सेकंड होमचा पर्याय अनेकांना पसंत पडतोय. शिवाय आज प्रॉपर्टी किंवा जमिनीत पसा गुंतवणं ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे, या दृष्टीनेसुद्धा अनेकजण सेकंड होमचा विचार करताना दिसतात.
प्रशस्त, हवेशीर फ्लॅट किंवा बंगला, डुप्लेक्स अशा प्रकारच्या सेकंड होममध्येदेखील अंतर्गत सजावट महत्त्वाची असून, या वास्तूचा वापर तुम्ही कितपत करणार आहात यावर इथली अंतर्गत सजावट ठरते. पण एक मात्र नक्की की, काही प्राथमिक सुविधा, वस्तू यांची मांडणी या जागेतही करावीच लागते. जसं की, बठकीची रचना, स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू, बेडरूममधील बेड, वॉर्डरोब वगरे. मुळात इथलं इन्टिरिअर करण्याआधी या ठिकाणी कोणत्या गोष्टी हव्यात व कोणत्या नकोत याची एक यादी करावी. मोजकंच पण आवश्यक सामान, सुंदर सजावट इथे करणंही तितकंच गरजेचं आहे. कारण इथे आल्यावर कामाचा सगळा ताण निघून जायला हवा. इथे घरासारखाच उबदारपणा अनुभवता आला पाहिजे. हॉटेलच्या रूक्ष वातावरणापेक्षा हे आपलं सेकंड होम प्रसन्न, प्रफुल्लित करणारं ठरलं पाहिजे. म्हणूनच इथलं इन्टिरिअरदेखील काळजीपूर्वक करावं लागतं.
अनेक जण आपल्या राहत्या घरातलं काही सामान इथे आणतात. जसं की, नवा डबल डोअर फ्रीज घ्यायचा असतो, मग जुना फ्रीज सेकंड होममध्ये आणला जातो. तसंच बेड किंवा इतर फíनचरसुद्धा आणलं जातं. हा पर्याय चालणारा असेल तर रंगसंगती, प्रकाशयोजना, फॉल्स सीिलग, आर्ट वर्क, पडदे इतर सजावट- फ्रेम्स, शो पीसेस यामध्ये वैविध्य जपावं. म्हणजे काही वस्तू (फíनचर) जुन्या असल्या तरी सजावटीत नावीन्य जपता येतं. भिंतींना रंग द्यायचा नसेल तर वॉलपेपरचा पर्याय इथे हमखास उपयोगी पडतो आणि हे फार खर्चीक कामही नाही. एखाद्या िभतीला वेगळा उठाव देण्यासाठी वॉलपेपरची मदत घ्यावी किंवा टेक्श्चरचा पर्यायही आहेच.
समजा, तुम्हाला एकदम फ्रेश इन्टिरिअर करायचंय, तर मग एकूणच जागेचं आकारमान, प्रकाशयोजना, कशा प्रकारचं इन्टिरिअर हवं आहे, याचा विचार करावा. इथलं इन्टिरिअर हे आखीवरेखीव आणि सुटसुटीत असावं. कारण इथे ठरावीक कालावधीसाठीच आपलं वास्तव्य असतं. अनेकजण सेकंड होममध्ये अगदी व्यवस्थित इन्टिरिअर करून घेतात. असं वेलफíनश्ड सेकंड होम विकणारेही बरेच आहेत, तर काही जण घर भाडय़ानेसुद्धा देतात.
सेकंड होम सजवतानाही तिथली सजावट अर्थपूर्ण कशी होईल, वेगळी कशी भासेल आणि राहत्या घरापेक्षा वेगळा फील कसा येईल याकडे लक्ष द्यावं लागतं. पुढील महिन्यात येणाऱ्या गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून अनेक जण आता सेकंड होमच्या चाव्या ताब्यात घेतील. या शुभदिनी गृहप्रवेश करणार असाल तर या मंगलप्रसंगी येणाऱ्या आपल्या आप्तांच्या सोयीसाठी आताच काही मांडणी/रचना करून ठेवावी. मोजकंच, साजेसं इन्टिरिअर करावं म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांनाही वास्तूत प्रसन्नता जाणवेल. अनेकजण वास्तुशांत केल्यावर घरात तोडफोड करीत नाहीत. तर याचाही विचार आधीच करावा. खूप मोठे बदल करायचे नसतील तर छोटे बदल आधीच करून घ्यावेत आणि नंतर इन्टिरिअर करावं.
सेकंड होमचं इन्टिरिअर करतानासुद्धा आपलं बजेट, गरजा, आपल्या स्वप्नातील सेकंड होम, तज्ज्ञाची मदत, त्याच्याकडून सुचवल्या गेलेल्या सर्वोत्तम गोष्टी यांची सांगड घालून सजावट वेगळी आणि नेत्रसुखद करता येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा