ट्रेण्ड.. हा आजच्या युगातील परवलीचा शब्द आहे. एकही क्षेत्र असं नाही, जिथे ट्रेण्ड्सचा शिरकाव नाही. इंटीरिअर डिझायिनग हे क्षेत्रसुद्धा याला अपवाद नाही. इंटीरिअरमध्येही सतत नवनवीन ट्रेण्ड्स येत असतात. सजावटीच्या पद्धतीत जसे हे ट्रेण्ड्स आहेत तसेच ते इंटीरिअरच्या मटेरिअल्समध्येही असतात. जसं की- मार्बल, ग्रॅनाइटला एक चांगला पर्याय म्हणून कोरिअन नावाच्या एका मटिरिअलचा ट्रेण्ड सध्या इंटीरिअरमध्ये ‘इन’ आहे. काय आहे हे कोरिअन..
ग्लो बलायझेशनमुळे जग इतकं जवळ आलंय की, फक्त जीवनशैलीच नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रावर याचा प्रभाव जाणवतो. नवनवीन बदल, ट्रेण्ड्स तर आपल्याला आता चांगलेच अंगवळणी पडतायेत, अगदी सहज त्यांचा स्वीकार होताना दिसतोय. इंटीरिअर डिझायिनग हे क्षेत्रही याला अपवाद नाही. इंटीरिअरमध्येही अनेक ट्रेण्ड्स सतत येत असतात. फक्त सजावटीची पद्धत किंवा स्टाइलवरच याचा परिणाम दिसून येत नाही, तर एकूणच इंटीरिअरमध्ये वापरल्या जाणाऱ्या मटिरिअल्सवरही याचा प्रभाव, नावीन्य दिसतं. मटिरिअल्समध्ये सध्या अशाच एका ट्रेण्डची चलती आहे, ते म्हणजे कोरिअन!
कोरिअन हे मार्बल आणि ग्रॅनाइट या दगडांना एक उत्तम पर्याय आहे. मात्र कोरिअन हा दगडात मोडत नाही. कारण हा मॅन मेड आहे, मानवाची निर्मिती! ही देणगी अर्थातच अमेरिकेची. पण हा प्रकार अतिशय उत्तम असून तो मार्बल आणि ग्रॅनाइटच्या तोडीस तोड आहे. मेथिल मेथाअ‍ॅक्रॅलेट, ब्युटल अ‍ॅक्रॅलेट यांच्या मिश्रणावर ठराविक रासायनिक प्रक्रिया करून कोरिअन बनवला जातो. छिद्रविरहित घन पृष्ठभाग असल्याने त्यावर धूळ पकडत नाही. कोरिअन मटिरिअल हे दोन फूट बाय दोन फूट सहा इंच तसंच आठ फूट बाय दोन फूट सहा इंचाच्या शिट्समध्ये उपलब्ध असून, या शिट्स सहा एमएम आणि बारा एमएम या जाडीत मिळतात. स्क्रॅच फ्री असं हे मटिरिअल आहे. यावर कसलेही डाग पडत नाहीत. हे हव्या त्या आकारात मोल्ड होऊ शकतं आणि त्याचे कट्सही दिसत नाहीत.
मार्बल किंवा ग्रॅनाइटचा वापर करून आपल्याला फíनचर बनवायचं असेल तर ते करताना तुकडय़ा तुकडय़ांमध्ये बनवावं लागतं. मग त्या ठिकाणी जॉइंट्स, कट्स दिसतात. मात्र कोरिअन मटिरिअल वापरून आपण हव्या त्या आकारात, हव्या त्या मोल्डमध्ये फíनचर बनवू शकतो. यात कट्स, जॉइंट्स दिसत नाहीत. याचं फिनिशिग एकदम मस्त असतं.
आपल्याकडे कोरिअन मटिरिअलचा वापर किचन प्लॅटफॉर्म, टेबल टॉप, बेसिन काऊंटर किंवा फíनचरचा वरचा भाग यासाठी केला जातो. किचन प्लॅटफॉर्मसाठी तर कोरिअन हे अगदी आयडियल असून त्यावर हळद, इतर पदार्थाचे डाग पडत नाहीत. हे स्क्रॅच फ्री असल्याने ओरखडेसुद्धा पडत नाहीत. कालांतराने याची चमक जर कमी झाली तर क्लीनिंगचा पर्याय आहेच. कोरिअन मटिरिअलमध्ये फíनचर हवं असेल तर कोरिअन बनवणाऱ्या कंपनीच्या प्रशिक्षित फॅब्रिक्रेटर्सकडून लावून घ्यावं लागतं. लाकूड किंवा प्लायचा बेस बनवून त्यावर कोरिअन बसवून घ्यावं. इंटीरिअरमध्ये वेगळेपणा आणि सौंदर्याचा मिलाफ साधायचा असेल तर कोरिअनचा वापर एकदम ट्रेण्डी दिसतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा