‘प्रेमाचा मार्ग पोटातून हृदयाकडे जातो’ या उक्तीला अनुसरूनच स्वयंपाकघराला संपूर्ण घराचे हृदय अशी पदवी बहाल केली गेली असावी. इंटिरीअर डिझायनिंगचा अभ्यास करत असताना ‘kitchen is the heart of the home असे स्वयंपाकघराचे वर्णन वाचनात आले होते. परंतु जेव्हा शिक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली तेव्हा घरातील कर्त्यां स्त्रीचा स्वयंपाकघराच्या नूतनीकरणासंदर्भातील उत्साह अनुभवला. माझा आजवरचा अनुभव असे सांगतो की, प्रत्येक कर्त्यां स्त्रीला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस आरोग्यपूर्ण व रुचकर पदार्थ करून खाऊ घालावेत असे मनोमन वाटत असते. त्यासाठी ती नेहमीच प्रयत्नशील असते. परंतु नोकरी/व्यवसाय व इतर जबाबदाऱ्यांनी तिचे वेळेचे गणित खूपच अवघड करून ठेवलेले असते. यातून मार्ग काढण्यासाठी ती कुटुंबातील इतर मंडळींची, वरकामाला नेमलेल्या व्यक्तीची तसेच आधुनिक उपकरणांची मदत घेते. याच कारणास्तव सर्व मदतनीस मंडळींना सुटसुटीतपणे काम व वावर करता यावा, सर्व उपकरणे सोयीस्कर जागी ठेवता यावीत व आवश्यक ते सामान साठवून ठेवता यावे अशा सोयी असलेले स्वयंपाकघर ही तिची गरज ठरते.
अमोल जोशी -amoljoshi_27@yahoo.co.in
इंटिरीअर डिझायनर
स्वयंपाकघराचे नूतनीकरण
‘प्रेमाचा मार्ग पोटातून हृदयाकडे जातो’ या उक्तीला अनुसरूनच स्वयंपाकघराला संपूर्ण घराचे हृदय अशी पदवी बहाल केली गेली असावी.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 10-01-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen renovation