राजन बुटाला

सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजेच सहकार. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ असेच उद्दिष्ट असायला हवे, पण प्रत्यक्षात चित्र दिसते मात्र वेगळे! सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये वेगवेगळे, काही वेळा विक्षिप्त, विचित्र असे अनुभव पहायला, ऐकायला मिळतात. त्यातील एक : ठाण्यातील एका गृहनिर्माण संस्थेमधील ही खरी घटना आहे. फ्लॅटमध्ये सुरू झालेली गळती वरच्या मजल्यावरील फ्लॅटधारकाच्या निदर्शनास आणून दिली असता प्रथमत: ती मान्यच करण्यात आली नाही, होत असलेली गळती आमच्याकडून नाहीच असा ठाम पवित्रा घेतला गेला. गळतीचं गंभीर स्वरूप दुसऱ्यांदा निदर्शनास आणून दिले असता मी सिव्हिल इंजिनीअर आहे, कुठून गळती होत आहे हे मला चांगलं माहीत आहे, तुम्ही खाली सिमेंट लावून घ्या अशी मुक्ताफळे उधळण्यात या आडमुठय़ा सदस्याचा हात! आपल्याकडून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी याची जाणीव अशा आडमुठय़ा सदस्यांना नसावी याचंच वैषम्य वाटतं. सरतेशेवटी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचं सूतोवाच करण्यात येताच अशा आडमुठय़ा व उर्मट सदस्याचं डोकं ठिकाणावर येतं, मुळात अशी पाळी आपल्यावर येणार नाही याची दक्षता आधी घेतली असती तर ही वेळच आली नसती. असो, वेळेवर जाग आली हेही नसे थोडके!

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Pune builders , Pune air pollution, Pune,
बांधकाम व्यावसायिकांवर का होणार कारवाई?
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास

अनेक गृहनिर्माण संस्थांमधल्या अशा आडमुठय़ा सदस्यांकडून समस्या जाणीवपूर्वक निर्माण होत असल्याची असंख्य उदाहरणे सापडतील. यापूर्वी कन्सिल्ड पाइिपग करताना जीआय पाईपचा वापर होत असे, कालांतराने पाइपचे थ्रेड गंजल्याने त्यातून गळती होत असे, पण आता चांगल्या दर्जाचे प्लास्टिक पाइप उपलब्ध असल्याने उत्तम प्रकारे काम करता येते. पाइप कोणताही असो, कायद्यानुसार ज्याच्या घरातून गळती होत आहे त्यानेच ती गळती कायमस्वरूपी थांबवायची आहे. ज्याच्या घरात गळती होत आहे त्याच्याकडून खर्चाची कोणतीही मागणी करता येत नाही. ज्या सभासदाच्या घरातून गळती होते त्या सभासदाला त्रास होत नसला तरी ती गळती कोणताही आडपडदा न ठेवता त्वरित थांबवावी. कारण खाली राहणाऱ्या व्यक्तीला त्रास होतोच, शिवाय स्लॅबमधून गळती झाल्याने स्लॅबचं स्ट्रक्चर खराब झाल्यास  इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी संपूर्ण इमारत खाली करण्याची पाळी बाकीच्या सभासदांवर केव्हाही येऊ शकते म्हणून प्रथम आपल्या इमारतीचं स्ट्रक्चर सुरक्षित कसं राहील हे पाहणं आपणा सर्वाचं कर्तव्य असलं पाहिजे.   

घरामध्ये गळती होते ती म्हणजे चुकीचं कन्सिल्ड, टॉयलेट, बाथरूम व कीचनचं नानी ट्रॅप. या नानी ट्रॅपची दर दोन वर्षांनी प्लंबरकडून घोटाई करून घेतल्यास नानी ट्रपमधून गळतीची समस्या उद्भवत  नाही. नानी ट्रॅपला घोटाई करण्यासाठी फारसा खर्च येत नाही, मात्र ती वेळेवर व्हायला हवी. राहता राहिला प्रश्न  नूतनीकरणाचा! एकदा नूतनीकरण झाल्यानंतर दीर्घकाळ ही समस्या उद्भवत नाही; नूतनीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चाएवढी रक्कम लगेच फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवल्यास आवश्यकता भासल्यास नूतनीकरणाच्या खर्चाचा भार मोठय़ा प्रमाणात हलका होण्यास मदत होईल. मात्र आठवणीकरिता नूतनीकरण अशी नोंद असावी (आता डिजी लॉकर्स हा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे ) म्हणजे पुढील नूतनीकरणापर्यंत मुदत वाढवता येते.

अशा प्रकारे नियोजन करून सहकार्य केल्यास आपल्याबरोबर इतरांचाही आनंद द्विगुणित होईल. समाधान व लक्ष्मी, दोघांचंही वास्तव्य आपणाकडे राहो, ही सदिच्छा.

Story img Loader