प्रीती पेठे इनामदार
खरे पाहिले तर आजकाल जुन्या वस्तूंचा वापर, नवीन घरात अभावानेच केला जातो. परंतु लोखंडी जाळया, नळ, मिक्सर, वगैरेंना पुनर्विक्री मूल्य चांगले मिळते. दगडाचाही पुनर्वापर करता येतो. रहिवासी आणि विकासक दोघांनाही या मूल्याचा लाभ हवा असतो. तो आधीपासूनच एकमेकांशी बोलून, ठरवून अग्रीमेंटमध्ये घालून घेणे बरे.
विकासकाबरोबरच्या कैक मुद्दयांवरच्या सफल वाटाघाटींनंतरही ‘As Is Where Is’ हे वाक्य मात्र आमच्या डेव्हलपमेंट अॅग्रीमेंटमध्ये प्रविष्ट झालेच. म्हणजे तुमचे घर आणि तुमची इमारत, आज आहे त्याच स्थितीत सोडून जाणे. फक्त लूझ फर्निचर घेऊन जायची सूट. सदस्यांना वाटत होते की मूळ घरात नसलेल्या कित्ती तरी सोयी त्यांनी नंतर करून घेतल्या होत्या. त्या तरी काढून घेण्याची, विकण्याची मुभा असावी. विकासक मात्र ठाम होता. त्याचे म्हणणे मुभा दिली तर लोक काहीही, अगदी कमोड, विटाही उचकटून नेतात त्यामुळे त्यात बदल करू शकणार नाही.
अप्रूव्हलचे सर्व सोपस्कार आटोपल्यावर रिडेव्हलपमेंटसाठी जेव्हा आमच्यावर घर रिकामे करून सोडून जाण्याची वेळ आली; तेव्हा शेजाऱ्यांना प्रश्न पडला की, ‘‘पंखे, दिवे, कपाटं, गीझर नेऊ शकतो का? ते काही लूझ नाहीत, कायम फिक्स म्हणजे लावलेच असतात.’’ म्हटलं हो. घेऊन जाऊ शकतो. ते काही घराबरोबर येत नाहीत. घर घेतल्यावर मग आपण आपल्या पसंतीने ते लावून किंवा करून घेतो. आपलेच आहेत ते त्यामुळे ते नेऊ शकतो.
‘‘बरं, मग सेफ्टी डोअर?’’ दुसऱ्यांचा प्रश्न. अग्रीमेंटमध्ये लिहिले होते की दारे, खिडक्या, बॉक्स ग्रिल, वायिरग, सॅनिटरी फिक्सचर्स (वॉश बेसिन, कमोड), प्लिम्बग फिक्सचर्स (नळ, मिक्सर, पाइप्स), हे तुम्ही काढून नेऊ शकत नाही. पण सदनिकाधारकांचे म्हणणे, सेफ्टी डोअर आम्ही मागून लावले होते. घराबरोबर फक्त मेन डोअर आले होते. आता हा व्याख्येचा व अर्थ लावण्याचा मुद्दा व्हायला लागला. पण सर्व सदस्यांनी मिळून ठरवले की सेफ्टी डोअर काढायला हरकत नाही.
हेही वाचा >>> सावधानपणे व्यवहार करणे आवश्यक !
आता तिसरे सरसावले. ‘‘आमचा मिक्सर शॉवर खूप महागातला आहे बरं. बदलत्या तीव्रतेचे वेगवेगळया पातळयांवरून पाण्याचे फवारे सोडणारे मिक्सर-शॉवरचे इन्स्टॉलेशन आहे आमचे. इंपोर्टेड. आम्हीच लावलेले. ते आम्ही नेणार.’’ खरे तर हे उपकरण प्लिम्बग फिक्सचर्समध्ये मोडते. पण डिझाइनर पीस असल्यामुळे त्या संबंधीचा अग्रीमेंटमधला नियम त्यांना लागू होत नाही असे त्यांना वाटत होते. इतरांचे म्हणणे पडले की, ‘‘यांच्या इतके महाग नसले तरी बरेच पैसे मोजून, बाथरूमचे गरम पाण्यासाठीचे मिक्सर आम्ही स्वत: बसवून घेतले होते. त्यामुळे आम्ही पण ते काढणार.’’
हळूहळू शेपूट वाढायला लागले. बॉक्स ग्रिल, फरश्या, कमोड अशा स्वखर्चाने मागाहून बसवलेल्या गोष्टींचे काय? तेवढयात खालच्या मजल्यावरच्यांची भक्कन टय़ूब पेटली. म्हणाले, ‘‘अगदी २ वर्षांपूर्वीच आम्ही सगळया घराचे वायरिंग बदलून, सर्वोकृष्ट दर्जाचे तांब्याचे करून घेतले. मग ते आम्ही का काढून घेऊ नये?’’ प्रश्न गुंतागुंतीचा व्हायला लागला.
अग्रीमेंटमधला नियम फक्त जुन्या वस्तू किंवा स्वस्त सिस्टीम्सना लागू करायचा की काय? आणि जुन्या म्हणजे किती वर्षे जुन्या, स्वस्त म्हणजे किती रुपयांपर्यंतच्या? ही घरे लोकांनी ५०-५५ वर्षांपूर्वी घेतलेली असल्याने टाइल्स, किचनचा ओटा, इतकंच काय तर दारे खिडक्यांपर्यंत कित्येक गोष्टी त्यांच्या बदलून झाल्या होत्या. म्हणजे, त्या मूळ घरासोबत आलेल्या नव्हत्या.
आता हे तर शिप ऑफ थिसियसच्या पॅराडॉक्ससारखे मला वाटायला लागले. एखाद्या शिपचे एक एक करून सर्वच्या सर्व घटक बदलून टाकले, तर ती, तीच शिप (जहाज) राहाते का? स्टॅनफर्ड एन्सायक्लोपेडिया ऑफ फिलॉसॉफीचे म्हणणे असे की ‘शिप ज्या पासून घडवली जाते ते घटक आणि ती शिप, हे भिन्न आहेत पण या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस एकच अवकाश व्यापून असतात. आणि म्हणूनच, मूळ जहाज, ज्याला आठवणी नाहीत, पण मूळ शरीर आहे आणि घटक बदलल्यानंतरचे जहाज, ज्याला आठवणी आहेत पण एक नवीन वेगळेच शरीर आहे, ही दोन्ही जहाजे खरी आहेत. दोन्ही एकच आहेत. गरगरायला लागले ना? आता घरातल्याही कितीही भिंती, झडपा बदलल्या तरी ते तुमचेच पूर्वीचे घर राहाते. खरे पाहिले तर आजकाल जुन्या वस्तूंचा वापर, नवीन घरात अभावानेच केला जातो. परंतु लोखंडी जाळया, नळ, मिक्सर, वगैरेंना पुनर्विक्री मूल्य चांगले मिळते. दगडाचाही पुनर्वापर करता येतो. रहिवासी आणि विकासक दोघांनाही या मूल्याचा लाभ हवा असतो. तो आधीपासूनच एकमेकांशी बोलून, ठरवून अग्रीमेंटमध्ये घालून घेणे बरे.
आमच्या विकासकाचा युक्तिवाद सरळ होता. त्याच्या मते तो नवीन घरात आम्हाला बॉक्स ग्रील, दारे, खिडक्या, टॉयलेट्स, किचन देणारच होता. त्यामुळे या सिस्टीम्स कुणी जुन्या घरातून काढून घेण्याची गरजच नव्हती. त्याच्या मते सबंध घरच सर्वांनी स्वखर्चाने घेतले होते. म्हणून विटा, खांबांसकट सगळे घरच घेऊन जाणार का? शेवटी भरपूर तर्क वितर्क आणि समजावणी केल्यानंतर, रहिवाशांचे एकमत झाले. या मतमतांतरांच्या क्लिष्ट जंजाळात न शिरता, सगळयांनी मिळून ठरवले की, नव्याने बदललेले असो नाहीतर स्वखर्चित डिझाइनर पीस असो. जे जे म्हणून अग्रीमेंटमध्ये न नेण्याच्या यादीत आहे, ते सगळे इथेच सोडून जायचे. ‘As Is Where Is..’
(नगर नियोजन तज्ज्ञ व वास्तुविशारद)
preetipetheinamdar@gmail.com