वैशिष्ट्यपूर्ण वैथिश्वरनकोईल
‘वास्तुरंग’ पुरवणी परिपूर्ण बनविण्यात अत्यंत माहितीप्रद अशा लेखांचा मोठा वाटा आहे. त्यातील ‘वैथिश्वरनकोईल’ हा लेख विशेष वाटतो. दक्षिण भारतीयांचे धर्म वा संस्कृतीचे प्रेम तसेच विविध ज्ञानशास्त्रांचे जतन व त्यात वाढ करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या हे या लेखावरून स्पष्ट होते. लेख वाचून तेथे जाऊन आल्यासारखे वाटते, तरी एखाद्या वेळी अशा स्थानांना भेट अवश्य द्यावी असे वाटते. पर्यटन संस्था मात्र अशा गोष्टींची ओळख का करून देत नाहीत? लेख उपयुक्त वाटला.
– समीधा मराठे, ठाणे.

माझ्याही मनाला रुखरुख लागली
‘वास्तुरंग’ पुरवणीतील (२० ऑक्टोबर) मीनाराणी प्रमोद यांचा ‘घर.. मनातलं’ हा लेख वाचला. लेखातील घराचं वर्णन वाचून डोळ्यांसमोर घराचं चित्र उभं राहतं. हा लेख वाचून लेखिकेनेही हे घर घ्यायला हवे होते, अशी रुखरुख माझ्या मनाला लागून राहिली.
– दीप्ती

परिपूर्ण कुटुंबाचं मनोज्ञ दर्शन
‘वास्तुरंग’मधील १३ ऑक्टोबर ‘घरकुल पार्वतीचं’ हा लेख खूपच आवडला. लेखिकेने लेखात पार्वतीच्या घराचं केलेलं वर्णन अप्रतिमच होतं. ‘घराला भिंती असोत वा नसोत, घर बनतं त्यातल्या माणसांनी, त्यांच्यातल्या परस्पर प्रेमभावांनी, असं हे संसारचित्र तर घरघरांत आढळणार. हे सुरेख पूर्ण कुटुंबचित्र बघायला भिंतीला कान लावायला नाकोत की खिडकीला डोळे लावायला नकोत..’ लेखिकेनं केलंलं हे मनोज्ञ वर्णन मनात रेंगाळत होतं.
– सविता पाटील

खूपच मस्त लेख
‘वास्तुरंग’मधील १३ ऑक्टोबर ‘घरकुल पार्वतीचं’ हा लेख अप्रतिम होता. या लेखाची संकल्पना आवडली. हा लेख खूपच मस्त वाटला.
– सुजाता नरसाळे

अनोख्या घराची ओळख
‘वास्तुरंग’मधील १३ ऑक्टोबर ‘घरकुल पार्वतीचं’ हा लेख वाचून सध्या एका वाहिनीवर शंकरावर आधारित मालिकेची दृश्ये तरळली. लेख खूपच सुंदर होता.
– शर्वरी टिळक

लोभसवाणे घरकुल
‘वास्तुरंग’मधील १३ ऑक्टोबर ‘घरकुल पार्वतीचं’ हा लेख म्हणजे सर्वाच्या मनातील लोभसवाणे हवेहवेसे वाटणारे घरकुल आहे. या घरकुलाची कल्पना खूपच आवडली.
– स्मिता गोडबोले

Story img Loader