|| डॉ. संजय बहादूर
घर हे कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात मौल्यवान आणि गुंतवणुकीचा सर्वात मोठा निर्णय असतो. घर म्हणजे फक्त निर्जीव विटा आणि काँक्रीटपासून तयार करण्यात आलेलं नसतं, तर ते आपल्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी दैनंदिन जीवनाचा सर्वोच्च भावनिक भाग असतो. मात्र, आजकालच्या घरांना त्याच्या बांधणीला कमकुवत करणाऱ्या विविध प्रकारच्या धोक्यांना -अंतर्गत आणि बा पातळीवरही तोंड द्यावं लागतं, आणि त्यातूनच त्यांचं आयुर्मान कमी होत असतं. आजच्या नव्याने बांधण्यात आलेल्या घरांपुढचा सर्वात मोठा धोका म्हणजे पाणी झिरपणं आणि तीव्र उष्णता- जे वर्षांनुवर्ष सुरू राहतं आणि त्याची परिणिती पाण्याची गळती आणि त्याच्याशी संबंधित भिंतीला चिरा पडणं, ओलावा, बुरशीचा प्रादुर्भाव, गंज चढणं अशा समस्यांमध्ये होते. ‘वेळेवर घातलेला एक टाका, पुढचे सात टाके वाचवतो’, या प्रसिद्ध म्हणीप्रमाणे धोका कमी करण्यासाठी दर्जेदार साहित्य आणि तज्ज्ञ कारागिरी वापरून केलेले वॉटरप्रूफिंग नंतरचा बराच त्रास कमी करणारे ठरते.
या सर्व समस्यांमुळे घरमालकांना त्यांच्या नव्याने बांधलेल्या घरासाठीही वॉटरप्रूफिंग आणि इतर संरक्षक उपाययोजना करण्याची गरज भासू लागते. फक्त थोडय़ाच नवीन घरांमध्ये मूलभूत वॉटरप्रूफिंग असते, तर काही घरांमध्ये ते फक्त छपरापुरते मर्यादित असते. त्यामुळे आपलं घर ‘फाइव्ह पॉइंट लीक- फ्री होम’ बनावं यासाठी पाणी येतं त्या सर्व जागी वॉटरप्रूफिंग करणं आवश्यक ठरतं. पाच ठिकाणी गळतीमुक्त घर वॉटरप्रूफ करणं म्हणजे वॉटरप्रूफिंग केवळ छपरापुरतं मर्यादित राहत नाही, तर अंतर्गत ओलसर जागा (बाथरूम, स्वयंपाकघर आणि बाल्कनी), बा भिंती, काँक्रीट पाण्याच्या टाक्या आणि जमिनीखालच्या जागाही त्याअंतर्गत वॉटरप्रूफ केल्या जातात.
पारंपरिक पद्धतीनुसार, वॉटरप्रूफिंग ही उपाययोजना मानली जाते, जी केवळ गळती झाल्यावरच येते आणि बहुतेक नवे घरमालक रासायनिक वॉटरप्रूफिंगच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उभे करतात आणि विशेषत: त्यांचे घर बांधले जात असताना. त्यामुळे गेल्या काही वर्षांत घरबांधणी क्षेत्रात वाळू, विटा आणि एकत्रित साहित्याचा मोठय़ा प्रमाणावर दर्जा घसरत असल्याचा दिसून येते. त्याचबरोबर हवामानात होणाऱ्या बदलांमुळे बांधकामासाठी हवामान तीव्र ठरते. या घटकांमुळे पारंपरिक वॉटरप्रूफिंग पद्धती उदा. कोबासारख्या साहित्याची बांधणी क्षमता कमी झाली आहे.
बांधकामादरम्यान वेगवेगळ्या पृष्ठभागांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करायला देणं आवश्यक असतं. घरात पाणी येऊ शकतं अशा पाचही जागा जेव्हा योग्य पद्धतीने वॉटरप्रूफ केल्या जातात तेव्हाच घर पूर्णपणे संरक्षित होते. हे पाच पृष्ठभाग अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याची काही कारणे-
- जमिनीअंतर्गत- काळानुसार जमिनीअंतर्गत पाणी वाढते आणि ते घरात शिरून अंतर्गत भिंतींचे नुकसान करते.
- अंतर्गत ओलसर जागा- (बाथरूम, स्वयंपाकघर आणि बाल्कनी)- या भागात ३६५ दिवस पाणी असणं अपेक्षित असल्यामुळे पाणी झिरपणं होत राहतं आणि अंतर्गत भिंतींवरील रंग निघायला लागतो.
- छप्पर- हवामान बदलते, तसेच काळानुसार झीज होऊन छताच्या पृष्ठभागावर चिरा पडतात व त्यातून तुमच्या सुंदर छतावर पाणी गळती आणि ओलसरपणा तयार होतो.
- काँक्रीट पाण्याचे टँक- पाण्याच्या या टाक्यांना चिरा पडत असल्यामुळे त्याच्या पृष्ठभागातून गळती होते. हा भाग योग्य पद्धतीने वॉटरप्रूफ करणे आवश्यक असते.
- बा भिंती- हवामानातील बदलांमुळे बा भिंतींवर भेगा पडतात, ओलसरपणाचे पट्टे उठतात आणि पर्यायाने तुमच्या घराचे रूप खराब होते.
- पाच ठिकाणच्या या वॉटरप्रूफिंगशिवाय करण्यात आलेल्या कोणत्याही बांधकामामुळे तुमच्या घरात पाण्याचा प्रवेश होऊन एकंदर बांधणीला धोका तयार होतो. त्याची दुरुस्ती करणं अतिशय महागडं आणि वेळखाऊ होतं. त्याहीपेक्षा घर खराब होते आणि पुनर्वक्रिीची किंमत कमी होते.
- वॉटरप्रूफिंग प्रक्रियेमुळे घर अधिक मजबूत होतं. म्हणूनच बांधकामाच्या टप्प्यावरच सर्वसमावेशक रासायनिक वॉटरप्रूफिंग करणं तुमच्या स्वप्नातील घराला पुढची कित्येक वर्ष गळतीमुक्त आणि सुंदर ठेवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं.