लेखाचे शीर्षक बघूनच आनंद झाला की नाही? हा किंवा अशाच धर्तीवरचा मेसेज म्हणा, पोस्ट म्हणा सध्या समाजमाध्यमांमध्ये धुमाकूळ घालतोय. हल्लीच्या भाषेत बोलायचे तर व्हायरल होतोय. नवीन मंत्रिमंडळ निर्णय, जी.आर. मुळे सोसायटी अभिहस्तांतरणाची आवश्यकता नाही असा साधारण या मेसेजचा आशय आहे.

आज आपण याच मेसेजमागचा तथ्यांश समजून घेऊ या. प्रथमत: सोसायटी अभिहस्तांतरण म्हणजे काय हे लक्षात घेऊ. जेव्हा जागामालक किंवा विकासक एखाद्या जमिनीवर इमारती उभारतो, तेव्हा त्यातले बांधकाम विविध लोकांना विकण्यात येते. त्या जमीन आणि इमारतीच्या मालकी आणि व्यवस्थापनाकरिता खरेदीदारांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात येते. अंतिमत: त्या जमिनीची आणि बांधकामाची मालकी सहकारी गृहनिर्माण संस्थेकडे हस्तांतरित करणे म्हणजेच अभिहस्तांतरण अर्थात सोसायटी कन्व्हेयन्सची. आता असे अभिहस्तांतरण करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. पहिल्या मार्गात एखादा जमीन मालक किंवा विकासक स्वत: पुढाकार घेऊन असे अभिहस्तांतरण करून देऊ शकतो. मात्र जर जमीनमालक किंवा विकासक विनाकारण किंवा काही कोपी हेतू मनात ठेवून असे अभिहस्तांतरण करायचे टाळत असेल, तर आता शासकीय यंत्रणेमार्फत असे अभिहस्तांतरण करून घेता येते, ज्याला मानीव अभिहस्तांतरण अर्थात डीम्ड कन्व्हेयन्स म्हणतात. या दोन्ही मार्गाने अभिहस्तांतरण करताना अभिहस्तांतरणाचा करार आणि त्याची नोंदणी करावीच लागते, त्याच्याशिवाय असे अभिहस्तांतरण पूर्ण होत नाही.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vasturang society conveyance developer ownership of the building management amy
First published on: 22-06-2024 at 07:12 IST