राहत्या घरातील स्टेअरकेस आणि सार्वजनिक ठिकाणच्या जसे की, मॉल, कॉर्पोरेट ऑफिसेस, हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशनचे जिने, फूट ओव्हर ब्रिज, स्कायवॉक वगरे, स्टेअरकेस यात फरक असतो. सार्वजनिक ठिकाणच्या जिन्यांची रुंदी मोठी असते कारण तिथे माणसांची ये-जा जास्त प्रमाणात होत असते. या झाल्या स्टेअरकेस संदर्भातल्या तांत्रिक गोष्टी. आता जरा सजावटीकडे वळू या.
स्टेअरकेस कशी आहे, कोणत्या आकाराची आहे त्यानुसार तिथली सजावट ठरत असते. तिथला रूक्षपणा टाळण्यासाठी त्यावर जाजम, कारपेट्स अंथरता येतात. त्यामुळे घसरण्याची शक्यतासुद्धा कमी होते. स्टेअरकेस जवळच्या िभतीवर पेंटिंग्ज, फोटो फ्रेम्स, वॉल हँिगग्ज् लावून तिथली जागा आकर्षक, सुशोभित करता येते. ही भिंत अधिक उठावदार करण्यासाठी ती वेगळ्या रंगात रंगवून त्यावर पेंटिंग्ज्, फ्रेम्स लावाव्यात खूप सुंदर दिसतं. छोटी झाडं ठेवून तिथे एक प्रकारचा जिवंतपणा आणता येतो. स्टेअरकेसच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने लाइट्सचा उपयोग करणं खूप महत्त्वाचं आहे. सुरक्षितता आणि स्टेअरकेसचं सौंदर्य अधिक खुलून येण्यासाठी सीिलगच्या ठिकाणी स्पॉट लाइट्सचा वापर करावा. तसंच पायऱ्यांच्या ठिकाणीसुद्धा फ्लोअर लाइट्स देऊन स्टेअरकेसचं सौंदर्य खुलवता येतं. काही वेळा तर स्टेअरकेसच्या खाली स्टोअरेज, बुकशेल्फ आणि पायऱ्यांमध्ये ड्रॉवर्सही बनवता येतात.
स्टेअरकेसच्या ठिकाणी आभासी प्रतिमा निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कारण घरात ज्येष्ठ व्यक्ती, मुलं असतील तर अशा वेळेस ते धोकादायक ठरूशकतं. म्हणून अशी रचना शक्यतो करू नये. तसंच स्टेअरकेस ही फ्लोअिरगच्या रंगापेक्षा वेगळी असावी. ही खबरदारी घेतली की, घसरण्याची, पडण्याची शक्यता राहत नाही. स्टेअरकेस बनवताना ती अतिशय काळजीपूर्वक व तज्ज्ञ व्यक्तीकडूनच करून घ्यावी. स्टेअरकेस सुरक्षित, आरामदायी व एकूणच अंतर्गत सजावटीच्या सौंदर्यात भर टाकणारी ठरेल, अशा प्रकारे तिची रचना केलेली असावी.
उत्तरार्ध
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा