घर छान, प्रशस्त असलं तर स्वतंत्र अशी फॅमिली रूम डिझाइन करण्याबाबत अनेक जणं विशेष आग्रह धरतात. घरात एखादा असा सुरेखसा कोपरा असला की त्या ठिकाणी कुटुंब, नातलग, मित्रपरिवाराबरोबर काही क्षण मस्त आनंदात घालवता येतात. मुळात फॅमिली रूमचा जन्मच या संकल्पनेतून झालेला आहे. पूर्वी वाडा संस्कृतीत एक तरी खोली अशी असायचीच- जिथे सण, समारंभ साजरे केले जायचे. किंवा महत्त्वाच्या चच्रेसाठी किंवा रात्री जेवणं आटोपल्यावर गप्पा मारण्यासाठी सर्व कुटुंबीय एकत्र जमायचे. तीच खोली आज फॅमिली रूम या नावाने ओळखली जाते. घराचं आकारमान मोठं असेल तर अशी फॅमिली रूम सहज निर्माण करता येते. मात्र इथलं इंटीरिअर हेसुद्धा खास असावं लागतं.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही खोली मोकळीढाकळी असावी. सामान, फíनचर यांची खूप गर्दी नको. इंटीरिअर डिझायिनगच्या दृष्टीने फॅमिली रूममध्ये फíनचरची रचना फॉरमलपेक्षा इनफॉरमलमध्ये केली जाते. नुसतंच वुडन फ्लोअरिंग करून त्यावर गाद्या टाकून बसण्याची व्यवस्था केलीय किंवा छानपकी कारपेट टाकलंय, अशी रचना ही इनफॉरमलमध्ये येते. फॅमिली रूममागचा मुख्य उद्देश कुटुंबीयांची प्रायव्हसी जपणं हा असला तरी या रूमचा वापर खूप वेगवेगळ्या पद्धतीने (मल्टिपर्पज) आपल्याला करता येतो. सगळ्यांबरोबर सेलिब्रेशन करण्याबरोबरच ही एक प्रकारची गेस्ट रूम, लहान मुलांची खेळण्याची रूम किंवा आपला छानसा छंद जोपसण्याची रूम अशा विविध भूमिका बजावू शकते. अनेक जण याठिकाणी पुस्तकांचं कलेक्शन करतात. म्युझिक सिस्टीम, टीव्ही बसवून घेतात किंवा सकाळच्या वेळेत आपलं व्यावसायिक काम करण्यासाठीसुद्धा या रूमचा वापर करता येतो. मात्र या गोष्टींसाठी खोलीतला एखादाच कोपरा असावा,
घरात एकाच वेळी भरपूर पाहुणे आले की ही खोली गेस्ट रूमसारखी वापरता येते. यासाठी सोफा कम बेड आणि भारतीय बठक ही मांडणी सोयीची आहे. खोलीचं आकारमान कसं आहे यावरून बठकीची मांडणी कशी करायची हे ठरवावं. एकदा का बठकीची मांडणी पक्की झाली की इतर सजावटीकडे लक्ष द्यावं. या खोलीतल्या िभती, पडदे, कुशन्स यांची रंगसंगती एकमेकांना पूरक असावी. भडक रंगांचा वापर कमी प्रमाणात असावा. कारण ही खोलीसुद्धा प्रसन्न, आरामदायी भासली पाहिजे. वॉल हँगिंग्ज, वॉल पेन्टिंग्ज किंवा आपल्या कुटुंबीयांचे फोटो लावण्यासाठी एखादा कोपरा या खोलीत नक्की ठेवा. या खोलीत कारपेट, र्दीज् किंवा वुडन फ्लोअरिंग करून घ्यावं, यामुळे खोलीत उबदारपणा निर्माण होतो. इथे प्रकाशयोजना नीट असावी. खोलीत नसíगक उजेड फारसा येत नसेल तर अनसíगक प्रकाशयोजना करावी. खोलीत भरपूर उजेड भासेल अशी रंगसंगती असणं गरजेचं आहे. आजच्या जीवनशैलीला साजेशी अशी ही फॅमिली रूम तितक्याच आकर्षक आणि सुरेख प्रकारे सजवावी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा