झाडांवर आंबे काढण्यासाठी एक नऊ-दहा फुटांचा लांब बांबू असून त्याच्या वरच्या तोंडावर बास्केट बॉलसारख्या एका गोलाकृती लोखंडी ‘रिंगला’ किंवा ‘कडय़ाला’ एक जाळी लावलेली असते, त्या जाळीच्या टोपलीला तोंडावर टिस्को ब्लेडच्या तीनतीन इंचांची पाती तिरकस लावलेली असतात. या टोपलीत (जाळीच्या) आंबा घेऊन तो बांबू झाडावर चढलेल्या माणसाने अशा पद्धतीत आपल्याकडे ओढायचा की त्या आंब्याचे देठ टिस्को ब्लेडच्या करवतीने आपोआप कापले जाऊन आंबा अलगद जाळीत येतो.

जुनी घरे अजूनही मनात घर करून आहेत. त्या जुन्या घराचा सहवास मनातून जात नाही. ती जुनी घरे आणि संबंधित वस्तू मनाच्या कुपीत बंद झाल्या तरी त्यांची सय अधूनमधून काहीना काही निमत्ताने उफाळून येते.
जुनी घरे ही बैठीच असत. त्याला माडीही असे आणि ती कौलारू असत. वर्षभराचे ‘भात’ ज्यात साठवले जाई त्याला ‘हडपा’ म्हणत.  हा लाकडी असतो. कणगी ही बाहेरून पूर्णत: सारवलेली असते. मोठ्ठय़ा टोपलीला ‘हारा’ म्हणतात. याशिवाय एक ‘मोठ्ठा’ टोपला असतो. तो एक-दीड इंच रुंदीच्या बांबूच्या लवचीक पट्टीने विणलेला असतो, तो ‘टोपली’ किंवा ‘हाऱ्या’सारखा घट्ट न विणता त्याच्या विणकामात सबंध टोपलाभर चौकोनी किंवा षटकोनी अथवा अष्टकोनी भोकांची नक्षी तयार होते. त्यामध्ये परसातली वाळलेली पाने तसेच झाडांचा पालापाचोळा गोळा केला जातो आणि पावसाच्या आधी म्हणजे आगोटच्या दिवसांत शेतावर हा सर्व सुका कचरा पसरला जाऊन तो शेतातील तण आणि अनावश्यक गवत राब जाळण्यासाठी या पालापाचोळ्याचा उपयोग करतात. या मोठ्ठय़ा टोपल्याला ‘डालगे’ असे म्हणतात. दगडाची ‘उखळ’ जमिनीत बसवलेली असते.. थोडक्यात, तो छोटा सुबकसा (लोखंडाऐवजी) दगडाचा खलच असतो. त्याला ‘वायन’ म्हणतात. या ‘वायन’ला ‘उखळ’ का म्हटले आहे? हे मात्र समजले नाही.
जिथे पाटाचे पाणी आहे तिथे सुपारीच्या झाडाचे (ज्याला कोकणात ‘पोफळी’ म्हणतात.) उभे दोन  ws02भाग करून ‘अर्धा’ भाग पाटाच्या पाण्यापासून आपल्याला हवा तसा लावून तो आठ-नऊ फुटांचा पोफळीच्या झाडाचा ‘अर्धा’ भाग ‘बेचकी’सारख्या लाकडाच्या अडीच/एक फूट उंचीच्या खोबणीत बसवायचा त्याला ‘मेढे’ असे म्हणतात. विहिरीच्या बाजूला दगडाची एकसंध मोठी दगडी असते त्याला ‘दोणी’ म्हणतात. प्रत्येक घरी अशा दोन/तीन ‘दोणी’ असतातच.     
या दोणींचा उपयोग गुरांना पाणी पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी किंवा उन्हाळ्यात ‘कोकम’ फोडल्यानंतर त्याचा (आंबट) रस साठवण्यासाठीही करून कोकम सोले वाळवून, परत परत त्या रसातून काढून वाळवल्यावर तेच आपण ‘आमसूल’ म्हणून वापरतो, आणि त्यालाच दोन ‘पुटं’ दिल्येत अशी भाषा येते. आमसुले जितकी (काळी) आणि आंबट तितकी त्यावर या रसाची ‘पुटे’ अधिक. गवारीला ‘बावची’ हा शब्द, तसाच कडीपत्त्याला ‘झिरंग’ म्हणतात. झाडाचं पाणी, खतं घातल्यावर पाणी साठण्यासाठी गोल मातीचा बांध असतो त्याला खळं/खळी असे न म्हणता, ‘आळं’ किंवा ‘आळी’ म्हणतात. तसंच तवस हे मोठय़ा ‘जून’ काकडीला म्हणतात, असे मला वाटते.
धान्य दळण्याच्या जात्याला जातंच म्हणतात, तर ‘घरट’ हाही दगडी प्रकार असून त्याचा ‘परीघ’ तीन फुटांच्या जवळपास असतो. शहरी जीवनामध्ये ‘टरफलं’ अथवा साल काढलेल्या ‘दाण्यांना’ आपण ‘तांदूळ’ म्हणतो. पण कोकणात याच दाण्यांना ‘भात’ असे संबोधले जाते. भात भरडायला घरटाचा उपयोग होतोच! पण एखादी व्यक्ती नदीत, समुद्रात अथवा विहिरीत पडून त्या व्यक्तीला बुडता बुडता वाचवताना त्या व्यक्तीच्या नाका, तोंडात पाणी जाऊन ती व्यक्ती बेशुद्ध झाल्यास त्या व्यक्तीला घरटावर घालून ‘घरट’ गोलगोल जात्यासारखे फिरवतात व त्यामुळे मूíच्छत झालेल्या व्यक्तीच्या पोटातले पाणी तोंडातून बाहेर येऊन ‘ती’ व्यक्ती शुद्धीवर येते. ‘घरट’ जिथे जमिनीवर ठेवले जाते बरोबर त्याच्यावर ‘दोन इंच रुंदीचे भोक’ वरील भालावर असते. त्या भालाच्या भोकामध्ये (किंवा खोवणीत) या घरटाचा ‘दांडा’ बसवतात.
प्रत्येकाच्या दाराशी ‘गोठे’ असत, त्याला वाडाही म्हणत. वाडय़ात जितकी ‘गुरे’ जास्त तितके ते घर सधन; अशा सधन कुटुंबाला ‘कुणबी’ समाजातले लोक ‘खोत’ या नावाने हाक मारीत किंवा संबोधित. या गुरांच्या वाडय़ाचे शेण, गोठा साफसफाई करण्याचे काम तसेच सकाळ-संध्याकाळ गुरांना चरायला घेऊन जाणे, त्यांना नदीवर घेऊन जाणे, नदीत बसवून त्यांना पाण्यात डुंबायला लावणे, जेणे करून नदीतल्या छोटय़ा छोटय़ा माशांनी त्यांच्या कासेजवळची ‘गोचीड’ खावी. हाही उद्देश! दूध काढताना गायी/म्हशींचे दूध ज्या भांडय़ात काढले जाते त्या भांडय़ाला ‘कासंडी’ या नावाने संबोधले जाते. म्हशींच्या शिंगाजवळचा भाग ‘सुंभा’ने पाण्यामध्ये कराकरा घासणे, पाण्यात गुरांना ‘साफ’ करणे इत्यादी कामे करणाऱ्या गडय़ाला ‘जांगळी’ हा शब्द आहे. हा शब्द हल्ली जास्त कोणाला माहीतही नसेल. रोजंदारीवर ‘बाई’ अथवा ‘गडी’ माणूस ठेवल्यास बाईला ‘पैरी’ व गडय़ाला ‘पैरा’ हा शब्द असे.
भातशेतीच्या कामाला नांगराला बैल जोडी लागत असे. काही काही शेतं एवढी मोठ्ठी असत की एका वेळी त्या शेतासाठी दोनदोन, तीनतीन नांगर लागत त्याला ‘जोतं’ हा शब्द आहे. अलीकडे या नांगराच्या जोत्यांचे भाव न परवडण्यासारखे झाले आहेत. गावांकडे हल्ली पूर्वीसारखे शेतमजूर राहिले नाहीत आणि गुरे सांभाळायला दाराशी माणूस नसल्यामुळे गावांकडे गुरांची संख्या कमी झाली आहे. सबब- (नांगर) जोत्याचे भाव कडाडले आहेत.
ws03हल्ली तसे बघितले तर.. ‘खेडी’ ही ‘खेडी’ राहिली नसून या खेडय़ांवर शहरीकरणाची छाप पडत आहे. पूर्वी एखाद्या बारमाही वाहणाऱ्या छोटय़ाशा ओहळाला किंवा नदीपेक्षा छोटय़ा प्रवाहाला पऱ्ह्य़ा म्हणत. आजही कोकणात अशा प्रवाहाला पऱ्ह्य़ाच म्हणतात.. या पऱ्ह्य़ाला पावसाळी भरपूर पाणी असते, पलीकडच्या गावचा रोजचा जाण्या-येण्याचा संबंध राहावा म्हणून पावसाळा चालू होण्यापूर्वी वर म्हटल्याप्रमाणे मेढीचे उंच बांबू जमिनीत मजबूत ठोकून आणि १०/१२ फूट उंचीवर बांबूच्या छोटय़ा कामटय़ांनी पलीकडच्या गावाला जाण्यासाठी किंवा पलीकडच्या भागात जाण्यासाठी वीस-पंचवीस फुटांचा एक सेतू बांधत त्याला ‘साकव’ म्हणत. आता खेडोपाडी पक्के सिमेंटचे ‘ब्रीज’ बांधले आहेत. यामुळे ‘साकव’ हा शब्दसुद्धा पुढील पिढीला अनभिज्ञच राहणार आहे.
झाडांवर आंबे काढण्यासाठी एक नऊ-दहा फुटांचा लांब बांबू असून त्याच्या वरच्या तोंडावर बास्केट बॉलसारख्या एका गोलाकृती लोखंडी ‘रिंगला’ किंवा ‘कडय़ाला’ एक जाळी लावलेली असते, त्या जाळीच्या टोपलीला तोंडावर टिस्को ब्लेडच्या तीनतीन इंचांची पाती तिरकस लावलेली असतात. या टोपलीत (जाळीच्या) आंबा घेऊन तो बांबू झाडावर चढलेल्या माणसाने अशा पद्धतीत आपल्याकडे ओढायचा की त्या आंब्याचे देठ टिस्को ब्लेडच्या करवतीने आपोआप कापले जाऊन आंबा अलगद जाळीत येतो. याला झेला असा शब्द आहे. जास्वंदीची फुले किंवा लिंबाच्या झाडावरची लिंबे काढताना उंचीवरील ‘लिंबे’ एका काठीच्या टोकाला एक तिरका टेकू बांधतात आणि त्या टेकूच्या आकडीत लिंबाची अथवा उंच असलेल्या फुलांची फांदी आपल्याजवळ ओढण्यासाठी सुलभ जाते. याला ‘गरकू’ म्हणतात. एक नक्षीदार चौकट सबंध घरासाठी बसवतात त्याला ‘पान’ हा शब्द प्रचलित आहे.
हे शब्द आजही कायम स्मरणात आहेतच, आणि त्यांच्याभोवती गुंफलेल्या आठवणीही..

monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Raigad district administration will implement bamboo cluster scheme planting 35 lakh bamboos
रायगडात ३५ लाख बांबूची लागवड होणार
Gold and silver ornaments worth 15 lakhs on idol of goddess were robbed
देवीच्या मूर्तीवरील १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
Lucky bamboo plant care
बांबूचे रोप सुकत चाललयं? ‘या’ सोप्या पद्धतीने घ्या काळजी
Loksatta kutuhal Historic buildings Hard to find without stones
कुतूहल: पाषाणांशी जडले नाते…
Dadar-Ratnagiri Railway , Konkan , train to UP,
दादर-रत्नागिरी सुरू करण्यासाठी प्रवासी एकवटले, कोकणात जाणारी गाडी बंद करून यूपीची गाडी
Story img Loader