आपल्या मुलांच्या बिघडलेल्या आरोग्यासाठी सतत बाहेरच्या बदलत्या वातावरणाला दोष न देता आपल्या घरातील वायुप्रदूषणाकडेही जरा लक्ष द्या. बाहेरील वायुप्रदूषण कोणत्याही व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी घातक असते. तथापि, आपण अनेकदा आपल्या घरात असलेल्या हवेच्या प्रदूषणाबाबत दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपल्याला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. आपण दररोज श्वसनामाग्रे घेत असलेली हवा आपल्याला हळूहळू आजारी पाडू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, वायुप्रदूषणाचा लोकांना सर्वाधिक धोका आहे आणि त्याचा मुलांवर सर्वात जास्त परिणाम दिसतो. ‘ग्रीनपीस’ने अलीकडेच दिल्लीतील पाच महत्त्वाच्या शाळांमध्ये सर्वेक्षण केले. त्यातून असे दिसून आले, की तेथील हवेचा दर्जा अत्यंत वाईट आहे. त्यामुळे अंतर्गत वायुप्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत जास्त जाणीव-जागृती निर्माण करण्याची आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे. आपण दुर्लक्ष केल्यास घरातील वायुप्रदूषण धोकादायक प्रमाण गाठते आणि हळूहळू का होईना आरोग्याला धोकादायक ठरू शकते. त्याचा लहानग्यांना मोठय़ांच्या तुलनेत अनेक कारणांमुळे जास्त धोका संभवतो.
तुमच्या मुलाच्या आरोग्यावर घरातील वायुप्रदूषण कसा परिणाम करू शकते?
* वायुप्रदूषणाचा दम्याच्या आजाराने त्रस्त मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
* मुलांचा श्वसनाचा वेग हा मोठय़ांच्या श्वसनापेक्षा जास्त असतो आणि वायुप्रदूषणाचे जास्त घटक ते (शरीराच्या वजनानुसार) मोठय़ांपेक्षा अधिक प्रमाणात श्वासामाग्रे शरीरात घेतात. मुलांची फुप्फुसे अद्याप विकसित झालेली नसतात. त्यामुळे त्याचा विपिरित परिणाम होतो.
* वायुप्रदूषणामुळे श्वसन यंत्रणेची संसर्गाशी लढण्याची आणि बाहेरून आलेले घटक काढून टाकण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे मुले जास्त प्रमाणात आजारी पडतात. त्यामुळे मुलांची शारीरिक क्षमता कमी होणे, कंटाळवाणे वाटण्यासारख्या तक्रारी, अॅलर्जी, श्वसनाचे प्रश्न श्वसनातील अडथळे, गंभीर दमा इत्यादी आजार होतात.
आपल्या मुलाच्या आरोग्यातील सुधारणेसाठी आपण कोणती काळजी घेऊ शकतो?
* आद्र्र किंवा बंदिस्त घरांमुळे वाळवी आणि कीटक जास्त प्रमाणात पसरू शकतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
* धूम्रपानास प्रतिबंध, घरगुती रसायनांचा सुरक्षित वापर आणि साठवणूक आणि चांगली हवा यांच्यामुळे तुमचे मूल एका जास्त निरोगी वातावरणात वाढू शकते.
* उन्हाळ्यात जास्त काळासाठी एअर कंडिशनर चालवणे योग्य नाही, कारण हीच हवा घरात सतत फिरत राहते. त्याऐवजी चांगल्या दर्जाचा एअर प्युरिफायर उच्च कार्यक्षमतेच्या एअर फिल्टरशन फिल्टरची गरज आहे. त्यामुळे छोटे घटक आणि प्रदूषक पकडले जातात आणि हवेचा दर्जा सुधारतो.
* तुमचे मूल जास्तीत जास्त द्रवपदार्थाचे (पाणी आणि नसíगक ज्यूस) सेवन करील याची काळजी घ्या.
* उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घराची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे.
आपले मूल सतत आजारी पडत असेल तर त्यास घरातील वायूप्रदूषणही कारणीभूत असू शकते. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
डॉ. इंदू खोसला
बालरोगतज्ज्ञ
घरातील प्रदूषण आणि मुलांचे आजार
आपल्या मुलांच्या बिघडलेल्या आरोग्यासाठी सतत बाहेरच्या बदलत्या वातावरणाला दोष न देता आपल्या घरातील वायुप्रदूषणाकडेही जरा लक्ष द्या.
आणखी वाचा
First published on: 02-05-2015 at 01:27 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pollution in home and child diseases