डॉ. मनोज अणावकर

आजच्या काळात अनेकदा केवळ वर्तमानपत्रं आणि विविध वाहिन्यांसारख्या प्रसारमाध्यमांवरच नव्हे, तर अगदी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांवर किंवा अगदी आपल्या मोबाईल फोनच्या एसएमएसच्या माध्यमातूनही घर बांधण्याकरता भूखंडांच्या जाहिराती आपण वाचतो. लाखो किंवा कोटय़वधी रुपयांच्या किमती असलेल्या सदनिकांच्या तुलनेत बऱ्याच कमी किमतीत असलेले हे भूखंड आपल्याला भुरळ न घालतील, तरच नवल! आधी आर्थिदृष्टय़ा आवाक्यात असलेला भूखंड तर घेऊ, आणि मग टप्प्याटप्प्यानं जसे पैसे जमतील तसं घर बांधू किंवा वाढवू, असा विचार अपल्यापैकी अनेकजण करतात. त्यात काही गैरही नाही. पण भूखंड घेताना ते खार जमिनींवर नाहीत ना याची खातरजमा करून घ्या. शक्य झालं तर भूखंडाच्या जमिनीवरची माती आणि त्याखाली असलेल्या पाण्याची क्षार चाचणी करून घेतलीत तर ती खार जमीन आहे की नाही, ते तुम्हालाही कळू शकेल.इमारतीखालच्या जमिनीतल्या मातीचं परीक्षण कसं करावं याबाबतचे काही नियम तसंच जमिनींचे प्रकार आपल्या अगदी पुरातन ग्रंथांमधूनही ‘समरांगण सूत्रधार’ किंवा ‘शिल्परत्न’ यांसारख्या काही वास्तुशास्त्राबाबत माहिती देणाऱ्या प्राचीन ग्रंथांमध्ये याबाबची माहिती आढळते. त्यात खारट जमीन ही बांधकामासाठी निकृष्ट समजावी असं म्हटलं आहे. आधुनिक काळात बांधकामासाठी काँक्रिटचा वापर व्हायला लागल्यानंतरही ‘क्लोराइड’ आणि ‘सल्फेट’ हे क्षार जर जमिनींमध्ये असतील तर ते काँक्रिटसाठी किती हानिकारक आहेत हे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आपले पूर्वज किती ज्ञानी आणि प्रगत होते हे दिसून येतं. त्याकाळी वास्तू बांधण्यासाठी जमीन निवडताना अशा खारट जमिनींवर बांधकाम केलं जात नसे. परंतु आता वाढत्या लोकसंख्येबरोबर जागेची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. मग यावर उपाय काय? आजच्या काळात जमिनीची टंचाई असली, तरीही इमारतीच्या सुरक्षेसाठी अशा जमिनींचा वापर टाळावा? की, जागेची टंचाई आहे म्हणून इमारतींना धोका असला, तरीही हा धोका पत्करून खार जमिनींवर बांधकाम करावं? की, यावर आणखीही काही तिसरा पर्याय उपलब्ध आहे, याबाबत जाणून घेण्याआधी आपल्याला हे पाहावं लागेल की मूळात हा धोका नेमका कशा स्वरूपाचा असतो?

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

काँक्रिटमध्ये असलेल्या अल्कामुळे त्यातल्या सळय़ांवर एक प्रकारचं संरक्षक आवरण असतं. हे आवरण या सळय़ांचं गंजण्यापासून संरक्षण करतं. परंतु इमारतीचा पाया हा जमिनीखाली असतो आणि या पायासभोवताली असणाऱ्या माती आणि भूजलात जर क्लोराइडचे क्षार असतील, तर पाणी आणि प्राणवायूच्या उपस्थितीत हे क्लोराइड या संरक्षक आवरणावर हल्ला करतं. त्यामुळे ते आवरण नष्ट होण्याची शक्यता असते.

हे आवरण नष्ट झालं, तर सळय़ा गंजण्याची प्रक्रिया वेग घेते. त्यामुळे ज्या जमिनींमध्ये एका ठराविक मर्यादेपलीकडे क्लोराइड आढळतं, तर त्या जमिनींवरच्या बांधकामासाठी काँक्रिट तयार करताना पाण्याचं सिमेंटशी असलेलं गुणोत्तर कमीत कमी ठेवण्याबरोबरच फ्लाय अ‍ॅश म्हणजे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये कोळसा जळल्यानंतर त्याची अतिसूक्ष्मकण असलेली एका विशेष प्रकारची राख, दळलेली ‘ब्लास्ट फरनेस स्लॅग’ म्हणजे झोतभट्टीतली धातुची सुरुंगी खडी किंवा सिलिकाचा (वाळू, गारगोटी, इत्यादीचा) वाफारा यांचा काँक्रिटमध्ये वापर करणं आवश्यक आहे. अशा काँक्रिटची अछिद्रता किंवा निर्भेद्यता वाढल्यामुळे त्यात पाण्याद्वारे क्लोराइड्सच्या क्षारांना प्रवेश करणं कठीण जातं आणि सळय़ांचं गंजण्यापासून रक्षण होण्याची शक्यता असते.

द्रावणाच्या स्वरूपात मातीत किंवा भूजलात असलेले सल्फेटचे क्षार तर थेट काँक्रिटवरच हल्ला करतात. अशा हल्ल्यामुळे आधी काँक्रिटच्या आकारमानात वाढ होते, म्हणजेच त्याची घनता कमी होते आणि नंतर हळूहळू (ज्वालामुखीतून मिळणाऱ्या पदार्थासदृश्य) या पदार्थाचा वापर किंवा उच्चदाबाखाली वाफेच्या सहाय्यानं काँक्रिटचं क्युअरिंग (म्हणजे संघट्टन- म्हणजे नवीन काँक्रिटला तडे जाऊ नयेत, म्हणून त्यावर पाणी मारणं) यासारखे उपाय आवश्यक त्या परिस्थितीनुसार केलेत, तर होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेमुळे सल्फेटपासून काँक्रिटचा बचाव होऊ शकतो.

खार जमिनींवर इमारती बांधताना करायचे हे उपाय जर केले गेले नाहीत, तर मग इमारतींना वर उल्लेख केल्याप्रमाणे धोका उद्भवू शकतो. त्यामुळे खार जमिनींवर बांधकामं करताना हे उपाय करणं आवश्यक आहे. त्याबरोबरच महापालिकेकडे नोंदणी कलेल्या अधिकृत इंजिनिअरमार्फत बांधकामाच्यावेळी देखरेख करून योग्य ती काळजी घेणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे तुमचं स्वप्न सुरक्षितरित्या अस्तित्वात यायला मदत होईल.

(लेखक इंटिरिअर डिझायनर आणि सिव्हिल इंजिनीअर आहेत.)

 anaokarm@yahoo.co.in