पावसाळ्यातील अति आर्द्रतेच्या दिवसांत िभतीतून पाणी गळतीमुळे किंवा झिरपल्यामुळे केवळ इमारती अथवा घरांचीच हानी होत नाही तर तुमचे फíनचर आणि घरातील कपाटांवरही त्याचा परिणाम होता.
पावसाळ्यात घरातील फíनचर तुटणे, सोफा ओलसर होणे आणि कपाटाला कुबट वास येणे असे प्रकार नेहमी घडत असतात. कारण आर्द्रतेचा परिणाम लाकडावर होत असतो. आद्र्रतेचे प्रमाण अधिक असल्यास लाकूड फुगते तसेच लाकडी फíनचरवर बुरशीही चढते. त्यामुळे लाकडी फíनचर आणि कपाटांची लांबी अथवा रुंदी वाढते. वातावरणात बदल झाल्यानंतर हिवाळ्यात या वस्तूंना तडे जाणे, तुकडे पडणे, त्याची फिनिशिंग खराब होणे असे प्रकार घडतात. बुरशी आल्याने किंवा खराब झाल्याने फíनचरचे जोड सुटू शकतात आणि त्यावरील आवरणही जाऊ शकते.
स्वयंपाकघरात अनेक कारणांमुळे बुरशी निर्माण होण्यास खतपाणी मिळते. पाइप गळणे, आद्र्रता अधिक असणे आणि स्वयंपाक हे आणि अशी अनेक कारणे यासाठी असतात. बुरशीमुळे आरोग्याला धोकाही होऊ शकतो. मात्र, तुम्ही या बुरशीपासून मुक्तीही मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला आद्र्रतेचा स्रोतच संपवावा लागेल.
पावसाळ्यात घरातील अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून तुमच्या घराची (मग ते जुने असो वा नवीन) तपासणी करून घेणे कधीही चांगले. तुमच्या घरात पावसामुळे कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यावर उपाययोजना काय हे जाणून घेणे चांगले. एकदा का तुम्ही ही काळजी घेतली तर तुमच्या घरातील सजावट पावसाळ्यानंतरही बदलणार नाही.
पावसाळ्यात फíनचरची काळजी कशी घ्याल, याबद्दल काही सोप्या टिप्स –
* तुमच्या घरातील लाकडी फíनचर खिडकीजवळ ठेवणे टाळा. खिडकीतून पाऊस आत आल्यास ते खराब होऊ शकते. तुमची खोली कोरडी राहावी यासाठी क्रॉस व्हेंटिलेशन असणे आवश्यक आहे.
* वातावरण/ आर्द्रता/ पाण्यामुळे तुमच्या फíनचरवर ताण येऊ शकतो. अशा परिस्थितीत फíनचरचे जॉइंट निखळणे आणि चांगल्या दर्जाचे कोटिंग असूनही खराब होणे, असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे फíनचरला सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ अॅडेसिव्ह वापरणे आवश्यक आहे.
* घरातील सोफा किंवा खुच्र्या साफ करण्यासाठी ओला कपडा वापरू नका. ओलसरपणामुळे सोफा कुजू शकतो. या वस्तू साफ करण्यासाठी कोरडा आणि मऊ कपडा वापरा. सोफ्यावर जर बुरशी आली असेल तर अँटीसेप्टिक आणि टेपिड पाण्यात कपडा बुडवून बुरशी झालेल्या जागेवर घासा.
* जर तुमच्या घरात अमूल्य अशा लाकडी वस्तू असतील तर घरात दमटपणा कमी करणारी साधने जरूर वापरा. फíनचरला असा पदार्थ लावा ज्यामुळे पाण्यापासून त्याचा बचाव होईल आणि वस्तूचे आयुष्य वाढेल.
* कपडय़ांचे कपाट आणि अलमारी िभतीपासून काही इंच दूर ठेवा. कारण पावसाळ्यात िभती अधिक थंड आणि ओलसर पडतात. तुमच्या कपडय़ांच्या कपाटात कापराच्या किंवा तशा प्रकारच्या गोळ्या ठेवा. कारण या गोळ्या आतील ओलसरपणा शोषून घेतात. वाळवी लागू नये यासाठी कडुिलबाची पाने हा सर्वात चांगला उपाय आहे. कारण वाळवी लागण्याची शक्यता पावसाळ्यात अधिक असते. लवंगा ठेवणे हासुद्धा उत्तम उपाय आहे.
* पावसाळ्यात खासकरून लाकडी दरवाजे जाम होतात. त्याला चांगल्या प्रकारे हाताळता यावे यासाठी लाकडी दरवाजाला पितळेचे हँडल लावणे कधीही चांगले.
* लाकडी फ्लोरिंगला चांगल्या प्रकारे व्हॅक्सिंग करून घेणे कधीही चांगले. कारण ओलसरपणामुळे फ्लोिरगही वाकू शकते.
* बाग, बगिच्यात ठेवल्या जाणाऱ्या खुच्र्याना पावसाळ्याच्या काळात घरातच ठेवावेत. त्यामुळे खुच्र्याना तडे जाणार नाहीत आणि त्याच्यावरील रंगही खराब होणार नाहीत.
* अमेरिकेच्या पर्यावरणीय संरक्षण संस्थेच्या संशोधनानुसार बुरशीचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असतो. अॅलर्जिक रिअॅक्शन, अस्थमा, स्नीझिंग आणि इतर काही श्वसनविषयक समस्या उद्भवू शकतात. स्वयंपाकघरातील काळ्या बुरशींमुळे दम्याचा त्रास होऊ शकतो. यापासून सुटका करून घेण्यासाठी स्वयंपाकघरातील बुरशींचा स्रोत शोधा आणि तो भाग कोरडा ठेवा. स्वयंपाकामुळे स्वयंपाकघरातील वातावरणात ओलावा निर्माण होतो. त्यामुळे तेथील व्हेंटिलेशन चांगले राहील याकडे लक्ष द्या. काळी बुरशी पाणी आणि साबणाने साफ करू शकता.
* पावसाळ्यात काप्रेट वापरू नका. जर ते कापडी असेल तर त्याला स्टोअरमध्ये गुंडाळून ठेवू शकता. जर ते मौल्यवान असेल तर ते सिलिकॉन बॅग्समध्ये गुंडाळून ठेवा.
* ओलावा आणि आद्र्रता या गोष्टी फíनचरला धोका पोहोचवतात. त्यामुळे फíनचरची आधीच काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी टर्मिनेटरसारख्या सोल्युशन्सचा वापर करणे कधीही चांगले.
या छोटय़ा आणि सोप्या टिप्समुळे पावसाळ्यात तुमचे फíनचर चांगले आणि टिकावू ठेवण्यासाठी नक्कीच मदत होईल.
फर्निचर सांभाळा
पावसाळ्यातील अति आर्द्रतेच्या दिवसांत िभतीतून पाणी गळतीमुळे किंवा झिरपल्यामुळे केवळ इमारती अथवा घरांचीच हानी होत नाही तर तुमचे फíनचर आणि घरातील कपाटांवरही त्याचा परिणाम होता.
आणखी वाचा
First published on: 06-07-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protect your furniture in monsoon