श्रीराम ओक

पुण्यातल्या पेठा असोत वा विस्तारणारी क्षितिजे, इथल्या सगळय़ांतच एक आपलेपणा जपलेला आहे. पुण्यातल्या अनेक बागा, जिम सकाळच्या वेळेत तुडुंब भरलेल्या असतात. बागांमध्ये चालून आणि जीममध्ये घाम गाळून पुणेकर वाढलेली चरबी वितळवण्यात पटाईत झाला आहे. पुण्याच्या अवतीभोवती जशा पर्वतरांगा आहेत तसेच पुण्यातील पर्वती, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, तळजाई अशा अनेक टेकडय़ा व्यायामपटूंनी सकाळी फुललेल्या असतात. दुपारच्या झोपेच्या बाबतीत आता पूर्वीपेक्षा पुणे नक्कीच बदलले आहे बरं!

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

‘विद्येचे माहेरघर’ असणाऱ्या पुण्यात कशाचीच कमतरता नाही, हे पुण्यात राहणारा प्रत्येकजण अगदी सहजपणे सांगू शकतो. त्यामुळेच तो ‘पुणे तेथे काय उणे’ हेदेखील तितक्याच सहजतेने म्हणतो. खवय्येगिरीपासून मनोरंजानापर्यंत आणि पुणेरी पाटय़ांपासून ते भ्रमंतीपर्यंत पुण्यात सगळय़ांचीच रेलचेल. स्वच्छ, सुंदर आरोग्यदायी हवा, पाण्याची मुबलकता असलेले हे पुणे शहर. सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात दुचाकींची संख्या मुबलक असली, तरीही मेट्रोसारख्या सुखसाधनांचा पर्याय आता नव्याने उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा >>> दसरा.. घरखरेदीचा सुवर्णकाळ

आरोग्य उत्तम राखण्यासाठी बागांची आणि टेकडय़ांची उपलब्धता यामुळे पुण्यात राहणे निश्चितच सुखावह. मनोरंजनाच्या साधनांमध्ये म्हणजेच नाटय़ आणि चित्रपटगृहांची उपलब्धता भरपूर असल्यामुळे, या दोन्हींची आवड असणाऱ्याला पुण्यात कंटाळा येऊच शकत नाही. छोटी-छोटी नाटय़गृहे आणि चित्रपटगृह रसिकांना आकर्षित करतात. कलाकाराला, त्याच्या अभिनय कौशल्याला जवळून निरखणे छोटय़ा नाटय़गृहांमुळे सहजशक्य झाले आहे. या सगळय़ांच्याबरोबरीनेच वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी अनेकानेक सुखसोयींनी युक्त अशी वाचनालयेदेखील आहेतच. या सगळय़ाबरोबरच पुण्यातील आरोग्य यंत्रणादेखील तेवढीच सक्षम. ही यंत्रणा पुणेकरांसाठी तर सोयीची आहेच, पण त्याबरोबरच परदेशस्थ पुणेकरांनाही ती तेवढीच आकर्षित करते. उत्तम सेवा आणि डॉक्टर्स, हे पुण्याचे आणखी एक वैशिष्टय़. केवळ इतकेच नाही, तर परदेशस्थ मंडळी आपली लग्नकार्य, मुंजी या पुण्यात येऊनच करतात म्हणजेच पुण्यातील कार्यामध्ये उत्साह किती असेल ना! एक ‘इव्हेंट हब’ असणाऱ्या या पुण्यात सुरक्षिततेलादेखील तेवढेच महत्त्वाचे स्थान दिले जाते. पुण्यातील गणेशोत्सवासारखा उत्सव पाहण्यासाठी जशी बाहेरगावची मंडळी येतात, तसेच पुण्याजवळील किल्ले सर करण्यासाठी अनेक ट्रेकर्स उत्सुक असतात. पुण्यात मिळणारे विविध प्रकारचे चहा आणि ज्यांची सहज उपलब्धता हेदेखील पुण्यासाठी महत्त्वाचेच. चहाचे भरलेले कप रिचवत मारलेल्या गप्पांना पुण्यात कमी नाही. त्यामुळे चौकाचौकांत चहाच्या सुसज्ज टपऱ्या आणि वैविध्यपूर्ण चहाची पुणेकरांसाठी केलेली सोय म्हणजे क्या कहेना.

हेही वाचा >>> भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्रात चॅटजीपीटीची भूमिका!

शिक्षणानिमित्त पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहनांची वाढलेली संख्या, घरटी प्रत्येकाला एक वाहन ही गरज, काही रस्ते पूर्वीचेच असल्यामुळे, वाहतूक कोंडी काही वेळा होते, तरी त्यातून सहनशक्ती सहजच वाढू शकते हे पुण्याबाहेरच्याला सहजच जाणवेल. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मिळालेला उत्तम पर्याय म्हणजे मेट्रो. सुरुवातीला आकर्षणाचा केंद्रबिंदू झालेल्या मेट्रोचा प्रवास पुणेकरांनी कुटुंबीयांसह तेवढय़ाच उत्सुकतेने आणि आनंदाने अनुभवला. या मेट्रोची उपयुक्तता लक्षात आल्यानंतर पुणेकर सोयीसाठी म्हणून मेट्रोकडे वळला आहे. पूर्वी वाहतूक कोंडीत पुण्यातल्या पुण्यात तास- दीड तास प्रवास करणारा पुणेकर मेट्रोमुळे कमी वेळेत आपल्या कुटुंबात जातो आहे, ही किती आनंदाची गोष्ट पुणेकरांसाठी!

पुण्यातल्या पेठा असोत वा विस्तारणारी क्षितिजे, इथल्या सगळय़ांतच एक आपलेपणा जपलेला आहे. पुण्यातल्या अनेक बागा, जिम सकाळच्या वेळेत तुडुंब भरलेल्या असतात. बागांमध्ये चालून आणि जीममध्ये घाम गाळून पुणेकर वाढलेली चरबी वितळवण्यात पटाईत झाला आहे. पुण्याच्या अवतीभोवती जशा पर्वतरांगा आहेत तसेच पुण्यातील पर्वती, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, तळजाई अशा अनेक टेकडय़ा व्यायामपटूंनी सकाळी फुललेल्या असतात. दुपारच्या झोपेच्या बाबतीत आता पूर्वीपेक्षा पुणे नक्कीच बदलले आहे बरं!

एखाद वेळेस पुणेकरांची सकाळ त्यांच्या-त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्यांनुसार थोडीशी उशिराने होत असेल, पण सकाळी एकदा का कामाला माणूस जुंपला की तो रात्रीपर्यंत त्याच्या कार्यात व्यस्त असतो. पाच दिवस भरपूर काम करायचे आणि दोन दिवस सुट्टीचे एन्जॉय करायचे याचा आनंद मनापासून घेणारा पुणेकर. जोडून सुट्टय़ा आल्या की आम्ही पुणेकर लगेचच भ्रमंतीला निघतो. सांगायचा मुद्दा काय तर, आमच्या अवतीभोवती इतकी समृद्धताच आम्हाला हा आनंद घेण्यासाठी सहाय्यभूत करते. पुण्यातील विविध पुनर्विकास प्रकल्प उद्याच्या पुण्याला सुखसोयींनी अधिक संपन्न करतील हे निश्चित. shriram.oak@expressindia.com