संदीप धुरत
पुणे शहर हे व्यावसायिक मालमत्तेसाठी उत्तम पर्याय ठरत आहे. एैसपैस जागा, उत्तम सोयीसुविधा आणि नव्या कार्यालयांसाठी लागणारी उत्तम सेवा देण्याची क्षमता या कारणांमुळे इथली व्यावसायिक रिअल इस्टेटमधील गुंतवणूक फायदेशीर ठरत आहे. येथील व्यावसायिक मालमत्तेच्या किंमतींमध्येही सकारात्मक बदल घडून येत आहेत. करोनाकाळानंतर अनेक कंपन्यांची आर्थिक स्थिती पूर्ववत झाली आहे आणि कामगार वर्ग पुन्हा कार्यालयात परतत असल्याने, व्यावसायिक भाडेपट्टीची मागणी वेगाने वाढत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अधिक परतावा मिळवण्यासाठी श्रेणी- अ व्यावसायिक मालमत्तेमध्ये वाढत्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. २०२२ च्या तिसऱ्या तिमाहीत व्यावसायिक मालमत्तेने अतिशय चांगला उच्चांक नोंदवला. करोनाच्या आधीच्या काळापेक्षा त्रमासिक व्यवहाराचे प्रमाण ६% ने वाढले आहे आणि सध्या ते २९% ने वाढत आहे. हे एक अतिशय उत्तम स्थितीचे दर्शक आहे.
अशा प्रकारे, व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात किरकोळ आणि कार्यालय या दोन्ही क्षेत्रांमध्ये नवीन प्रकल्प सुरू करण्यात येत असताना, तसेच करोना काळात रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास जात असताना या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची ही उत्तम वेळ आहे. आणि त्यासाठी पुणे शहर हा उत्तम पर्याय आहे.
गेल्या तीन तिमाहीत, विशेषत: आयटी आणि रिटेल कंपन्यांमध्ये भाडेतत्त्वावर ऑफिस देण्याचे प्रमाण वाढले आहे. बीएफएसआय, अभियांत्रिकी, उत्पादन आणि सह-कामाच्या जागा यांसारख्या अन्य महत्त्वाच्या विभागांसाठी जागा उपलब्ध करण्याची मागणी वाढत आहे.
रिटेल व्यवसायासाठी जागा : एक उत्तम गुंतवणूक पर्याय
सध्या रिटेल रिअल इस्टेट बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. कार्यालयीन जागांच्या वाढत्या विक्रीमुळे रिटेल विक्रेत्यांमध्येही आत्मविश्वास वाढला आहे आणि ही विक्री वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २०२२ मध्ये पुणे शहराचे किरकोळ विक्रीत भाडेतत्त्वावरील व्यवहारांमध्ये ७०% पेक्षा जास्त योगदान राहिले आहे. शिवाय, रिटेल क्षेत्रात गुंतवणूक करणे हा सध्या सर्वात किफायतशीर गुंतवणूक पर्याय आहे आहे.
करोनाकाळानंतर रिअल इस्टेट मार्केटमध्ये सुधारणा झाल्यामुळे व्यावसायिक मालमत्तेचे मूल्य वाढत आहे, परिणामी त्यातून अधिक नफा कमावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारे, रिअल इस्टेट ही दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून एक उत्तम पर्याय आहे.
या व्यवसायातील सध्याच्या वाढीच्या शक्यता आणि रिअल इस्टेट क्षेत्राभोवती असलेले सकारात्मक वतावरण लक्षात घेता, गुंतवणुकीसाठी ही उत्तम वेळ आहे. सध्या रिअल इस्टेटमधील सकारात्मक परिस्थिती खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना रिअल इस्टेट मार्केटवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करत आहे. पुढील वर्षीही हीच परिस्थिती राहील. ही परिस्थिती पुण्यामध्ये व्यावसायिक मालमत्ता खरेदीच्या शोधात असलेल्यांसाठी उत्तम ठरेल.
करोनाकाळानंतर जवळपास दोन वर्षांनंतर भारतीय कंपन्यांची स्थिती सुधारत असल्याने आणि त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालये पुन्हा सुरू केल्यामुळे कार्यालयीन जागांची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. भारतीय स्टार्टअप उद्योग येत्या काही वर्षांत स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी महत्त्वाचा भाग असेल. स्टार्टअप क्षेत्राचा भाडेपट्टय़ामधला हिस्सा २०२१ मध्ये १७% वरून २०२२ च्या पहिल्या सहामाहीत २८% पर्यंत वाढला आहे. स्टार्ट-अप्समुळे पुण्यात व्यावसायिक रीअल इस्टेटमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येते. स्टार्टअप्सनंतर, कार्यालयीन कामासाठी जागेची मागणी वाढली आहे. ती परदेशी कंपन्यांनी २०% आणि इतर भारतीय कंपन्यांनी १९% इतकी नोंदवली.
sdhurat@gmail.com