‘वास्तुरंग’मधील (२८ जून)‘घरभरल्या आठवणी’ हा सुपर्णा कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख वाचल्यावर वाटले, त्यांनी आमच्याच घरातील पलंगाच्या बॉक्स आणि माळ्यावरील सामानाचे वर्णन केले आहे. म्हणतात ना, घरोघरी मातीच्या चुली. कधी तरी कामाला येईल, असू दे, कोकणात घरी गेलो तर नेऊन टाकू, धाकटी मोठी झाली तर पुन्हा उपयोगी पडतील, अशा अनेक समजुती मी आणि बायको दर दिवाळीला साफसफाई करताना एकमेकांना घालतो. मध्यंतरी घराला रंग लावण्याकरता सामान बाहेर काढण्याची वेळ आली तेव्हा सामान बघून मनाचा निश्चय केला की जुन्या वस्तू चांगल्या असल्या तरी पुन्हा पलंगात, कपाटात, माळ्यावर अडकवाच्या नाहीत. काटकसरीला गिळून, उदारतेचा आव आणून बऱ्याच वस्तू मोलकरणीला, कचरावालीला, वॉचमनला आणि घरी येणाऱ्या धोब्याला देण्याचा सपाटा लावला. वस्तूंचा चांगल्या प्रकारे विनियोग केला.
अगदीच ज्याची विल्हेवाट लावणे जिवावर आले, असे सामान बेडमध्ये, कपाटावर, माळ्यावर ठेवताना ‘याद्या’ केल्या व त्या त्या ठिकाणी आतल्या बाजूला चिकटवल्या, जेणे करून त्या हव्या असल्यास हमखास मिळतील.
लेखात लिहिल्याप्रमाणे जिथे जिथे आम्ही भारत फिरायला गेलो असताना आणलेल्या वस्तूंची कालांतराने अडगळ वाटू लागते, तेव्हा मला अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये विकेंडला भरत असलेल्या ‘गराज सेल’ पद्धतीची आठवण होते. तेथे बंगल्याचे मालक, नको असलेल्या, पण चांगल्या वस्तूंना किमतीचे स्टिकर लावून घरापुढे विकत ठेवतात. तेथे अशा सेकंडहॅण्ड वस्तू विकत घेणे व विकणे कमीपणाचे मानत नाहीत.
– श्रीनिवास डोंगरे, दादर
वास्तुप्रतिसाद : मन:स्पर्शी सय
‘वास्तुरंग’मधील (२८ जून)‘घरभरल्या आठवणी’ हा सुपर्णा कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख वाचल्यावर वाटले, त्यांनी आमच्याच घरातील पलंगाच्या बॉक्स आणि माळ्यावरील सामानाचे वर्णन केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-07-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers reaction on vasturang articles