वास्तुरंग (८ मार्च)मधील शब्दमहाल सदरातील ‘शाळा उभारताना’ हा मीना गुर्जर यांचा लेख वाचला.  यात ताराबाई मोडक यांनी स्वत:च्या हिमतीवर गरीब, गरजू लोकांसाठी मेहनतीने उभारलेल्या शाळेबाबत वाचून आनंद झाला. ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ या दोघींनी मोलाचे कार्य केले आहे.

आठवणींना उजाळा
वास्तुरंग (१५ मार्च) मधील चिऊताईचे अंगण हा डॉ. नागेश टेकाळे यांचा लेख वचला. या लेखामुळे बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. जे कधीही पुन्हा परत येणार नाहीत. जिथे चिमण्यांचा वावर होता अशा भागात मी वाढलो याचा मला अभिमान आहे. हा लेख वाचून खूपच आनंद झाला.
– शरद साने

Story img Loader